शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

द्वेषाचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 3:28 AM

हातात असतील तेवढी सगळी हत्यारे चालवून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या दिल्ली सरकारला जखमी करीत राहणे हा मोदींच्या सरकारचा हिंस्र उद्योग गेली दोन वर्षे देशाने पाहिला आहे

हातात असतील तेवढी सगळी हत्यारे चालवून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या दिल्ली सरकारला जखमी करीत राहणे हा मोदींच्या सरकारचा हिंस्र उद्योग गेली दोन वर्षे देशाने पाहिला आहे. मूळात दिल्लीचा केंद्रशासित प्रदेश केजरीवालांच्या पक्षाने भाजपला निवडणुकीत पराभूत करून जिंकला तेव्हाच मोदींचा त्यावेळी संताप अनावर झाला. तेव्हापासून एका मागोमाग एक आरोप, चौकशांची लचांडे आणि बडतर्फीची कुºहाड असे सारे मोदींनी त्या सरकारविरुद्ध या काळात केले. नायब राज्यपालाकडून त्या सरकारचे निर्णय अडविले, नियुक्त्यांची मान्यता रोखणे आणि वर त्या सरकारचे अधिकार त्याचे नसून नायब राज्यपालाचे आहे असे जाहीर करणे हेही त्यांनी केले. त्यांच्या आमदारांवर एकामागोमाग एक आरोप लादून त्यातील सतरा जणांना मोदींनी तुरुंगात धाडले. नंतर केजरीवालांनीच त्यांच्या सरकारचा राजीनामा देऊन दिल्लीची निवडणूक पुन्हा लढविली. तीत विधानसभेच्या ७० पैकी ६६ जागा जिंकून दिल्लीची जनता कोणासोबत आहे हे केजरीवालांनी मोदींना दाखवून दिले.ज्या शहराने सात पैकी सातही खासदारांच्या जागा भाजपला दिल्या त्या भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळविणे जमले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाक कापले गेल्यानंतरही केंद्र सरकार गप्प राहिले नाही. त्याच्या सुडाची धार आणखी तीव्र झाली आणि आता त्याने केजरीवालांच्या २० आमदारांचे सदस्यत्व, ते सांसदीय सचिव असल्याचा आरोप ठेवून रद्द केले. त्या कारवाईने केजरीवालांचे सरकार पायउतार होत नाही आणि मोदींच्या किर्तीतही कोणती भर पडत नाही. उलट त्यामुळे त्यांचा सूडभरला चेहराच देशाला दाखविला आहे. मुळात सांसदीय सचिवाचे पद लाभाचे नाही. ते मंत्र्यांना सहकार्य करण्याचे आहे. एकेकाळी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण हे मोरारजी देसाई या ज्येष्ठ मंत्र्यांचे सांसदीय सचिव होते हे येथे आठवावे. उपमंत्र्याच्याही खालचा दर्जा असलेले हे पद मंत्र्याची साधी कारकुनी मोबदल्यावाचून करण्यासाठी निर्माण केले आहे. असे सचिव नेमण्याचा अधिकार पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना आहे. इंग्लंड आणि कॅनडा या संसदीय लोकशाह्यांमध्ये सांसदीय सचिव आहेत. खुद्द भारतातही कर्नाटकात त्यांची संख्या दहा आहे. मणिपूर, हिमाचल, मिझोरम, आसाम, राजस्थान आणि गोवा या राज्यातही सांसदीय सचिव आहेत. आपच्या सभासदांचे सदस्यत्व त्याच कारणासाठी रद्द करताना निवडणूक आयोगाने हे सचिव मंत्रालयाची जागा वापरत होते व मंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करीत होते असा फुटकळ व अनाकलनीय आरोप लावला आहे. तो खरा मानला तर यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंतचे सारे सांसदीय सचिव अपात्र होते असेच म्हणावे लागेल.मोदींच्या माणसांनी तक्रार करावी, निवडणूक आयोगाने केजरीवालांची बाजू ऐकूनही न घेता ती मान्य करावी आणि या आयोगाच्या शिफराशीवर राष्ट्रपतींनी त्यांचा रबरी शिक्का उमटवावा हा सारा प्रकारच कायद्याचा, घटनेचा वा परंपरेचा नसून राजकीय सूडबुद्धीचा आहे असे म्हणावे लागते. २० आमदारांचे सदस्यत्व त्यांची बाजू ऐकूनही न घेता एका सरकारनियुक्त आयोगाने रद्द करणे हा प्रकार तर लोकशाही संकेतांचाही भंग करणारा आहे. मात्र केंद्र ताब्यात, आयोग नियंत्रणात आणि राष्ट्रपती रबरी शिक्का बनलेले या गोष्टी मोदींच्या व भाजपच्या लाभाच्या आहेत. त्यामुळे केजरीवालांना न्याय मागता येईल असे दुसरे व्यासपीठही देशात नाही. मात्र अशी पीठे नसतात तेव्हा जनता असते. केजरीवालांचा पक्ष पुन्हा त्या २० जागांवर निवडणूक लढवील आणि दिल्लीची सुबुद्ध जनता त्याला न्यायही देईल. मात्र हा प्रकार पुढचा आहे. आतापर्यंत जे घडले ते मोदी सरकारची सूडभावना, भाजपचा आप-द्वेष आणि त्या दोघांनाही दिल्लीत झालेल्या पराभवाचा न पडलेला विसर सांगणारे आहे. ही घटना देशभरातील नागरिकांनाही केंद्र सरकारच्या सूडबुद्धीचा परिचय करून देणारी व त्याचा खरा चेहरा दाखविणारी आहे. एखाद्या लोकनियुक्त सरकारला त्याहून बलिष्ठ असणाºया दुसºया सरकारी यंत्रणेने कोणत्या पातळीपर्यंत छळावे आणि तसे करताना निवडणूक आयोगासह साºया शासकीय यंत्रणांचा कसा राजकीय वापर करावा याचा हा कमालीचा दुष्ट म्हणावा असा नमुना आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी