शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

धडधाकट कर्मचारी एकाएकी कसे होतात ‘दिव्यांग’?

By सुधीर लंके | Published: December 27, 2023 8:35 AM

बढती व बदलीच्या लाभासाठी बनावट प्रमाणपत्र घेऊन ‘दिव्यांग’ होण्याचे प्रकार वाढलेले दिसतात. राज्यातील ‘दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्या’ची चिकित्सा!

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

राज्यात सरकारी नोकरीत दिव्यांगांची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा २०२२चा माहितीकोष जाहीर झाला, त्यानुसार राज्यात गट ‘अ’ ते गट ‘ड’ या संवर्गात एकूण ४ लाख ८४ हजार शासकीय कर्मचारी आहेत. यापैकी १ हजार ६७९ कर्मचारी हे मूळ नियुक्तीच्या वेळेस दिव्यांग होते. मात्र जुलै २०२२ अखेर एकूण कर्मचाऱ्यांपैकी ७ हजार ४१० कर्मचारी दिव्यांग झाले.

याचा अर्थ, नोकरी लागल्यानंतर अनेक कर्मचारी दिव्यांग बनले. याची दोन कारणे असू शकतात. एकतर अपघात अथवा आजारपणामुळे कर्मचाऱ्याला दिव्यांगत्व आले. दुसरे कारण हे की, नोकरीतील बढती व बदलीच्या लाभासाठी बनावट प्रमाणपत्र घेऊन कर्मचारी दिव्यांग बनले. दुसरी शक्यता अधिक आहे. कारण राज्यात बहुतांश जिल्ह्यांत जिल्हा परिषदेत बदल्यांचा फायदा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी आहेत. दिव्यांग व्यक्तीला नोकरीत आरक्षण असते. बदली व बढतीतही सवलत असते. बीड जिल्हा परिषदेने दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर यावर्षी ७८ शिक्षक निलंबित केले. कारण या शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीत त्यांची मूळ प्रमाणपत्रे आक्षेपार्ह आढळली. पुढे औरंगाबाद खंडपीठाने या निलंबनाला स्थगिती दिली.

बहुतांश जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीची मागणी आहे. दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातही दोन प्रकार आहेत. जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, महापालिकांची रुग्णालये अथवा केंद्र शासनाच्या वैद्यकीय संस्था येथे तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र काढता येते. या वैद्यकीय आस्थापनांचे प्रमुख, या संस्थांतील अधीक्षक अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व ज्या प्रकारचे दिव्यांगत्व असेल त्या क्षेत्रातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी अशा तिघांच्या स्वाक्षरीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळते. दिव्यांगपणाचे प्रमाण ४० टक्के असेल तर व्यक्तीला लाभ मिळतात. पूर्वी हे प्रमाणपत्रच रुग्णालयाबाहेर बनावट बनविले जात होते. आता शासनाने ते ऑनलाइन केले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या प्रकारचा घोटाळा सुरू झाला आहे. सरकारी रुग्णालयातील तीन सदस्यांनाच हाताशी धरून ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र घ्यायचे. एकदा प्रमाणपत्र घेतले की त्याची सहसा पुन्हा पडताळणी होत नाही. पडताळणी झाली तरी ती इतर रुग्णालयांतील शासकीय वैद्यकीय अधिकारीच करतात. हे अधिकारी आपल्या अगोदरच्या यंत्रणेला सहसा खोटे ठरवत नाहीत. फेरतपासणीत दिव्यांगपण कमी आढळले तरी सदर व्यक्तीचा दिव्यांगपणा नंतर उपचारांती कमी झाला अशी सबब सांगण्यास वाव असतो.

पुण्यातील ससून रुग्णालयात दिव्यांगाची बनावट प्रमाणपत्रे दिले जातात, वरिष्ठ अधिकारीच दिव्यांगत्वाची टक्केवारी वाढवितात याबाबत २०२२ साली विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यात असे प्रकार होत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनीच लेखी उत्तरात मान्य केलेले आहे. यावर्षी अहमदनगर जिल्हा परिषदेने आपल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी ससूनमध्ये पाठवली आहेत. त्यामुळे ही फेरपडताळणी योग्य होईल का? हा संशय आहेच. राज्यात जातीचे दाखले बनावट तयार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यावर उपाय म्हणून जात पडताळणी समिती आली. दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठीही प्रणाली आणण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दिव्यांगांबाबत काम करणारे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. 

खरे तर, दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे शंभर टक्के अधिकार सरकारी रुग्णालयांना दिले आहेत तेथेच घोळ आहे. या वैद्यकीय बोर्डात इतर विभागांचे शासकीय अधिकारीही हवेत. या प्रमाणपत्रांची फेरपडताळणीही लगेच हवी. फेरपडताळणीनंतरच लाभ मिळायला हवेत. फेरपडताळणीत खासगी तज्ज्ञ डॉक्टर, केंद्र शासनातील अधिकारी व स्वयंसेवी संस्था यांचाही समावेश हवा. कर्मचारी जेथे काम करतो त्या विभागप्रमुखांचा अभिप्रायही घेतला जाणे आवश्यक आहे. कारण कर्मचारी धडधाकट असल्याचे विभागप्रमुख व समाज पाहतो. मात्र त्याच्या हातात दिव्यांग प्रमाणपत्र असल्याने सर्वच हतबल आहेत. सरकारी रुग्णालयांना अमर्याद अधिकार दिल्याने ते त्याचा दुरुपयोग करत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. हा भ्रष्टाचारच आहे. 

मूळ दिव्यांग व कर्मचारी संघटनांना हाताशी धरून बनावट दिव्यांग  फेरपडताळणीस विरोध करताना दिसताहेत. हे प्रकार पाठीशी घालायचे का?- यावरून संघटनांतही मतभेद आहेत. हे रोखले नाही तर राज्य लाभासाठी आणखी दिव्यांग बनत जाईल. sudhir.lanke@lokmat.com 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार