पित्रोदांना कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:10 AM2019-05-15T05:10:41+5:302019-05-15T05:11:23+5:30

राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले.

Do not admire Rahul Gandhi, who gave the impression of Pitroda? | पित्रोदांना कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

पित्रोदांना कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

Next

राहुल गांधींनी सॅम पित्रोदा या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला; त्याने शीखविरोधी दंगलीविषयी अपमानकारक उद्गार काढल्याबद्दल केवळ दटावलेच नाही, तर क्षमा मागायलाही भाग पाडले. ज्या माणसाने सारा भारत तारांवाचून जोडून दिला त्या विज्ञानवादी संशोधकाबाबत राहुल गांधींनी एवढी कडक भूमिका घेतली असेल; तर त्यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले असल्याचा तो संकेत आहे. त्याचवेळी पक्ष व त्याची प्रतिमा जपण्यासाठी कोणत्याही प्रबळ व्यक्तीला ठणकावण्याची त्यांची तयारी आहे हेही त्यातून साऱ्यांच्या लक्षात येणारे आहे.

या तुलनेत नरेंद्र मोदी आणि त्यांचे साथीदार अमित शहा यांच्या भाषणातला जोर आणि वागण्यातील दुबळेपणही समजून घ्यावे असे आहे. त्यांच्या पक्षातील गिरिराजसिंगांपासून स्मृती इराणीपर्यंत आणि प्रज्ञासिंह ठाकूरपासून रावसाहेब दानवेंपर्यंत अनेकांनी आजवर जे अकलेचे तारे तोडले व पक्षाची प्रतिमा डागाळली त्यांना साध्या शब्दांनीही या पुढाºयांनी कधी सुनावले नाही. उलट त्यांच्या पोरकट व वाचाळपणाचा त्यांना आनंदच झाला असावा असे वाटायला लावणारे त्यांचे वर्तन राहिले. गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणारी मूर्ख स्त्री आणि तिचा सत्कार करणारे मूर्खजन किंवा ‘गोडसेने गांधीजींऐवजी नेहरूंना मारले असते तर बरे झाले असते’ असे बेशरम उद्गार काढणारे त्यांच्या पक्षाचे पुढारी, कोणत्याही दटावणीवाचून मोकळे राहिले. परिणामी त्यांची ग्रामपातळीवरची बालके आणखीच बेताल बोलताना व वागताना दिसली.

उत्तर प्रदेशातील हत्यांकाडे, गुजरातमधील नरसंहार, ओडिशामधील जळीत कांड, झारखंड आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे या सा-या गोष्टी मोदींना ठाऊक असणा-याच आहेत आणि त्यावर त्यांनी जराही नापसंती दाखविली नसेल तर त्या त्यांना मान्य होणाºया व पसंत पडणा-या आहेत असेच समजले पाहिजे. संघटनेतील सगळ्या ब-यावाईट प्रकाराबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जात नसेल तर त्या सा-यांची जबाबदारी नेतृत्वावर येते ही बाब मोदींना माहीत नसावी असे कोण म्हणेल? स्वत: मोदींनीच महात्मा गांधींपासून राहुल यांच्यापर्यंत जी शेलकी भाषा त्यांच्या भाषणात वापरली, शरद पवार, ममता बॅनर्जी किंवा नवीन पटनायक यांना ज्या तºहेची नावे ठेवली तो सारा प्रकार त्यांच्या अनुयायांना आवडला असावा व त्याचमुळे त्यांनी त्याविषयी नाराजी न दर्शविता त्यावर टाळ्या वाजवल्या असाव्या. नेते पक्ष दुरुस्त करतात आणि नेतेच पक्ष बिघडवितातही.

जगातील अनेक देश, समाज, पक्ष व संघटना नेत्यांच्या चिथावणीमुळे किंवा प्रोत्साहनामुळे कशा बिघडल्या याची अनेक उदाहरणे येथे सांगता येतील. भारताच्या सभ्य राजकारणाला हे विकृत वळण ज्यांनी दिले त्यांना काय म्हणायचे? आणि तसे वळण देऊ पाहणा-यांना जे घाबरतात व सुखावतात त्यांची प्रशंसा किती करावी? टाइम या जागतिक नियतकालिकाने मोदींना ‘देशाचा दुभंगकर्ता पुढारी’ म्हटले व तसा त्यांचा फोटो आपल्या मुखपृष्ठावर छापला. त्या चित्राचा व विशेषणाचा अर्थ समजूनही न घेता महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष दानवे म्हणाले, ही जगाने केलेली मोदींची प्रशंसा आहे अशी समजूतदार व शून्य बुद्धीची माणसे ज्या पक्षात प्रदेशाध्यक्ष असतात त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्याला म्हणायचे तरी काय? आणि ते समजतील तरी काय? विरोधी पक्षांना नावे ठेवली, त्यांच्या पुढा-यांना मोठीमोठी नावे ठेवली आणि इतिहासाचे खोटे दाखले दिले तरी ज्यांचे पक्ष सुखावतात त्या नेत्यांचे एक बरे असते. त्यांना अभ्यास लागत नाही, वाचन लागत नाही, काही समजून घ्यावेसे वाटत नाही.

कारण त्यांनी कोणतीही मुक्ताफळे उधळली, चुकीचे संदर्भ दिले किंवा त्यांच्या माहितीत विसंगती- तफावत आढळली, तरी समोरच्या आज्ञाधारकांचा वर्ग टाळ्याच वाजवीत असतो. या पार्श्वभूमीवर पित्रोदासारख्यांना जाहीर कानपिचक्या देणाऱ्या राहुल गांधींचे कौतुक करायचे की नाही?

Web Title: Do not admire Rahul Gandhi, who gave the impression of Pitroda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.