शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

‘कर’नहीं तो डर काहेका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:44 PM

सामान्य नागरिकांचा विविध कामांसाठी महापालिकेशी संबंध येतो. काहीवेळा प्रश्न सहज सुटतात, पण बुहतांश वेळी प्रश्न सुटण्याऐवजी अनागोंदी कारभार व मारावे लागणारे हेलपाटे यातून होणा-या मनस्तापामुळे ते अधिक क्लिष्ट होत जातात.

सामान्य नागरिकांचा विविध कामांसाठी महापालिकेशी संबंध येतो. काहीवेळा प्रश्न सहज सुटतात, पण बुहतांश वेळी प्रश्न सुटण्याऐवजी अनागोंदी कारभार व मारावे लागणारे हेलपाटे यातून होणा-या मनस्तापामुळे ते अधिक क्लिष्ट होत जातात. मालमत्ता कर आकारणीचे असेच एक भूत सध्या नागपूरकरांच्या मानगुटीवर बसले आहे. ते उतरविण्यासाठी महापालिका मात्र ठोस पावले उचलण्यास तयार नाही. नागरिकांना कराच्या भरमसाठ डिमांड पाठविल्या जात आहेत. काहींना डिमांडच मिळालेल्या नाहीत. कर न भरणा-यांना मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचे इशारे देणे सुरू आहे. तर दुसरीकडे कराची आकारणी कशी केली हे समजावून सांगण्यात यंत्रणेला रस नाही. कर विभागाला घरघर लागली आहे. यात भरडल्या जात असलेला सामान्य नागपूरकरही आता संतप्त होऊ लागला असून चुकीच्या पद्धतीने आकारलेला कर भरणारच नाही, जे होईल ते पाहिले जाईल, अशी आक्रमक भूमिका घेत आहे. ‘कर’ नहीं तो डर काहेका..! असे तो ठासून बोलू लागला आहे. शहराचा विकास हवा असेल तर कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे सर्वमान्यही आहे. मात्र, कोणत्याही कर प्रणालीत सुसूत्रता असली, पारदर्शकता असली की नागरिकांमध्येही विश्वास निर्माण होतो. खिशातून जाणारा एक-एक रुपया नेमका कशासाठी व कसा आकारण्यात आला याचा हिशेब पटला की लोक आनंदाने कर भरतात. या पारदर्शकतेमुळे महापालिकेची तिजोरी भरण्यासही मदत होते. मात्र, अविश्वास निर्माण झाला की अर्थचक्रच खोळंबते. तसाच काहीसा प्रकार महापालिकेच्या कर आकारणीत झाला आहे. महापालिकेने पाठविलेल्या मालमत्ता कराच्या डिमांड नागरिकांकडे पोहचताच अनेकांना धडकी भरली. गेल्या दोन वर्षांची टॅक्स डिमांडची तुलना केली असताना अनेकांना यावर्षी तिप्पट ते चौपट डिमांड पाठविण्यात आली आहे. काही भागात तर हा आकडा २० पटींपर्यंत पोहचला आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. महापालिकेने आक्षेप नोंदविण्यासाठी ३० डिसेंबरची मुदत दिली असली तरी सर्वच मालमत्ताधारक तक्र्रार करतातच असे नाही. त्यामुळे महापालिकेनेच डिमांड पाठविण्यापूर्वी मे. सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात केलेल्या त्रुटी दूर केल्या असत्या तर आज पुन्हा आकडेमोड करण्याची वेळ आली नसती. आज महापालिकेची तिजोरी रिकामी आहे. मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. प्रशासकीय चुकांमुळे, नियोजनशून्यतेमुळे आता उत्पन्नाचा हा झराही आटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठलीही शासकीय थकबाकी भरू नका, असे राजकीय आवाहन केल्यामुळे नागरिकांनाही बळ मिळाले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका