शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

सहकार ‘जोडण्या’साठी भाजपकडे नेते आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 8:18 AM

दोन्ही काँग्रेसने सहकार मोडला, असे भाजपचे म्हणणे असावे; पण सहकाराची समृद्धी थांबली असताना व कारखाने विकले जात असताना हे कोठे हरवले होते?

सुधीर लंके

‘मी सहकार तोडण्यासाठी नव्हे, जोडण्यासाठी मंत्री झालो आहे’, अशी हमी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे दिली. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना ज्या भूमीवर उभा राहिला तेथेच शहा यांनी हे विधान केले. त्यामुळे हे विधान ऐतिहासिक ठरते. त्याला महत्त्वाचे संदर्भही आहेत. शहा सहकार जोडणार हे उत्तम. पण, कुणाच्या मदतीने ते ही जोडणी करणार?, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी या सहकार परिषदेचे आयोजन केले होते. ‘मधल्या काळात सहकाराचे नुकसान झाले’ अशी टीका परिषदेत विखेंनी केली. राष्ट्रवादीचे नेते व साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनीही ‘मधल्या काळात महाराष्ट्रात सहकाराची समृद्धी थांबली होती’ असे विधान केले. परिषदेला देवेंद्र फडणवीसही होते. ‘राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावात विकले गेले’, असा त्यांचा आरोप होता.

या नेत्यांच्या बोलण्यात तथ्यांश आहे. पण, सहकाराची समृद्धी थांबली असताना व कारखाने विकले जात असताना हे नेते कोठे हरवले होते?, इतक्या उशिरा ही उपरती का?, तेव्हा जर, ही मंडळी सहकाराला वाचवू शकली नाहीत तर, आता यांच्याकडे कोणती जादूची कांडी आली आहे?

देवेंद्र फडणवीस हे राज्यात मुख्यमंत्री असताना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याची २०१५ साली विक्री झाली. त्यावेळी शेतकरी फडणवीस व विरोधी पक्षनेते विखे या दोघांनाही भेटले. पण, ही विक्री थांबली नाही. ना शरद पवारांनी ही विक्री थांबवली ना फडणवीस-विखेंनी.त्यामुळे सहकार जोडायचा म्हणजे नेमके काय करायचे आहे?, शहांच्या सहकार परिषदेच्या व्यासपीठावर बसलेले हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, पिचड, कोल्हे असे अनेक नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस - राष्ट्रवादीचे आहेत. दोन्ही काँग्रेसने सहकार मोडला, असे भाजपचे म्हणणे असेल तर, त्या पापात भाजपने आयात केलेली ही मंडळी वाटेकरी होतीच. आता हेच लोक सहकाराला वाचवू पाहात असतील तर, त्याचे स्वागत केले पाहिजे.

या परिषदेत अत्यंत स्पष्टपणे सहकाराची खरी कारणमिमांसा केली ती, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी. ते म्हणाले, ‘सहकारात समृद्धी आली. पण, ती मूठभर लोकांची.’ ‘गिने-चुने लोक समृद्ध हुए’ असे नेमके वाक्य त्यांनी वापरले. सहकारात सभासदांपेक्षा खरे समृृद्ध झाले ते मूठभर नेते व घराणी असे त्यांना यातून सूचित करायचे असावे.

आज शेतकरी हे साखर कारखान्यांचे सभासद आहेत पण, नावाला. मूठभर नेते कारखान्यांचे मालक आहेत. सहकारी कारखाने व संस्था ताब्यात असल्याशिवाय आमदार, खासदार होता येत नाही, असा पायंडा महाराष्ट्रात पडला आहे. तेथील पैसा, नोकर-चाकर हे सर्व निवडणुकीत वापरता येते. सहकाराला माहिती अधिकार कायदा लागू नसल्याने कुणी हिशेब मागण्याचा प्रश्न नाही. आमदारच समोर बसलेले असल्याने सर्वसाधारण सभेत हिशेब मागण्याची हिंमत सभासद दाखवू शकत नाहीत. कुणी हिंमत केलीच तर, त्याची अडवणूक ठरलेली. सहकार विभागाचे अधिकारीही यामुळेच या संस्थांच्या चौकशीला धजावत नाहीत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत विशिष्ट मतदार असतात. त्यामुळे या निवडणुका खिशात घालणे सोपे असते. सहकाराचे मॉडेल असे गुलामीच्या मार्गाने निघाले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांचे ‘साखर गुलामी’ नावाचे पुस्तक अलीकडे प्रकाशित झाले. त्यात ते म्हणतात ‘वसंतदादा मुख्यमंत्री असताना विनाअनुदान तत्त्वावर  इंजिनिअरिंग कॉलेज सुरु करण्याचे धोरण दादांनी घेतले. त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. पण, पुढे या संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या न राहता नेत्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या झाल्या. आता शेतकऱ्यांची मुले प्रवेशासाठी या कुटुंबांचे उंबरठे झिजवतात’. - यातील काही कुटुंब आता भाजपमध्येही  आहेत. सहकार जोडायचा म्हणजे या मूठभर कुटुंबांचे कल्याण करायचे, असे जर, भाजपचे धोरण असेल तर, त्यातून भाजपही अशा सम्राटांचा पक्ष बनेल इतकेच. तसा तो काही प्रमाणात बनलाही आहे. 

टॅग्स :BJPभाजपा