शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

ड्रॅगनची भारतात हेरगिरी; देशापुढे नवी ‘तरंगती’ समस्या, श्रीलंकेत आलेल्या चीनी जहाजाचा मागचं राजकारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 7:26 AM

आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे.

गणेश देवकरमुख्य उपसंपादकआर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे. शेजारच्या सर्वच देशांना चीनच्या वर्चस्ववादी आणि विस्तारवादी धोरणाची झळ बसली आहे. भारतासोबत गेल्या काही दिवसांपासून डोकलामच्या निमित्ताने संघर्ष सुरु आहे. सीमा भागात घुसखोरी, गावे वसवणे, मोठे रस्ते आणि पुलांची उभारणी आदी वर्तनामुळे भारताच्या मनात चीनबाबत संशय निर्माण झाला आहे. अशातच चीनने भारताची हेरगिरी करण्यासाठी अत्याधुनिक बनावटीचे स्पाय शिप श्रीलंकेत तैनात केल्याने भारतापुढे नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.

भारताची चिंता का वाढली?   - हंबनटोटा तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ४५१ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतानेया जहाजावर करडी नजर ठेवली आहे. - दक्षिणेतील भारताचे प्रमुख लष्करी व अण्वस्त्र तळ कल्पकम आणि कुडनकुलम हे जहाजाच्या ट्रॅकिंग रेंजमध्ये येतात. - केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील अनेक व्यापारी बंदरे याच्या रडारमध्ये येतात. संरक्षण तज्ज्ञांच्या मते भारताचे दक्षिणेतील नौदलाचे तळ आणि आण्विक तळांची हेरगिरी करण्यासाठीच चीनने हे जहाज जाणीवपूर्वक पाठवले आहे. - कर्जाच्या बोजामुळे लंका सध्या चीनच्या एकप्रकारे अधीन आहे. याचा फायदा घेत हिंदी महासागरात आपला दबदबा वाढावा, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करीत आहे. 

शीतयुद्धकाळात वापर वाढला- १९२० ते १९३० या कालखंडात अमेरिकेच्या वतीने गोल्ड स्टार या स्पाय शिपला जपान, चीन आणि फिलिपिन्स या देशांची हेरगिरी करण्यासाठी पाठवल्याचे आढळते. जपानच्या पर्ल हार्बरवर अणुबाॅम्बचा हल्ला करण्याआधी याच जहाजाने त्या परिसराची इत्यंभूत माहिती पुरविली होती.- दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका व रशिया या २ महासत्तांमध्ये विभागले गेले. या महासत्तांनी एकमेकांना सामर्थ्याची चुणूक दाखवून देण्याची, एकमेकांना जोखण्याची तसेच शह-काटशह देण्याची एकही संधी पुढच्या काळात सोडली नाही. हाच कालखंड शीतयुद्धाचा म्हणून संबोधला जातो. - या काळात एकमेकांच्या देशात गुप्तहेर पाठवून हेरगिरी करणे, माहिती चोरण्यासाठी धाडसी मोहिमा आखणे, महत्त्वाकांक्षी उपक्रम हाणून पाडण्यासाठी कट. कारस्थाने रचणे आदी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यासाठी स्पाय शिपचा वापरही होऊ लागला. - अण्वस्त्र चाचणी, क्षेपणास्त्र चाचणी, संहारक अस्त्राची चाचणी यावर लक्ष ठेवणे, हा हेरगिरीचा प्रमुख उद्देश असायचा. हेरगिरी करताना शत्रू देशांच्या व्यापारी तसेच मालवाहू जहाजांसोबत किनारपट्टी आणि महत्त्वाच्या बंदरांवर होणाऱ्या हालचालींच्या नोंदीही ठेवल्या जाऊ लागल्या. श्रीलंका हतबल  जहाजाला इथे येण्यास चीनला परवानगी नाकारणे लंकेच्या हातात नव्हते. चीनकडून घेतलेल्या १.५ अरब डॉलरच्या कर्जाची परतफेड न केल्याने चीनने श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या लीजवर नियंत्रणात घेतले आहे. चीनने कोणतेही पाऊल उचलल्यास त्याविरोधात आवाज उठवता येईल, अशी स्थिती सध्या श्रीलंकेत नाही.  नेमके काय आहे?देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संशोधन, माहिती संकलन, माहिती विश्लेषण, शत्रूदेशात हेरगिरी आदी विशेष हेतूने स्पाय शिप तयार केली जातात. याच हेतूने चीनने बनविलेले युआन वांग ५ हे स्पाय शिप मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाले. २२ ऑगस्टपर्यंत तिथेच थांबणार आहे. हे २९ सप्टेंबर २००७पासून चीनच्या सेवेत आहे. जियांगन शिपयार्डमध्ये याची बांधणी झाली. ५,२२२ मीटर लांब, २५.२ मीटर रुंदवजनवाहक क्षमता: २५ हजार टन- शक्तिशाली ट्रॅकिंग शिपवर उच्च क्षमतेचे रडार, पॅराबोलिक ट्रॅकिंग अँटेना तसेच अनेक प्रकारचे सेंसर्स आहेत. - ७५० किमी दूर अंतरावरील माहिती हे जहाज गोळा करु शकते. उपग्रह, रॉकेट, क्षेपणास्त्र यांची माहिती अचूकपणे गोळा करू शकते. - विशेष मोहिमा सुरु नसताना जहाजे चीन सरकारला अंतराळ संशोधन मोहीम, इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन, दूरसंचार सेवा व संशोधन आदी पातळ्यांवर महत्त्वाची माहिती गोळा करणे, नोंदी टिपणे ही मदत करते, अशी कामे करणाऱ्या विभागाला स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स असे म्हणतात. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत