शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

स्वप्न व स्वप्नरंजन

By admin | Published: January 05, 2017 2:01 AM

आजपासून तेरा वर्षांनी देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे

आजपासून तेरा वर्षांनी देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे. स्वप्न बघणे तसे वाईट नसते. नरेंद्र मोदींना आपला देश सगळ्याच बाबतीत मोठा झालेला बघायचा आहे व तसे ते नेहमीच बोलून दाखवत असतात. त्यामुळे त्यांना भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता झालेला बघावासा वाटावा, यामध्ये वावगे काहीच नाही. फक्त स्वप्न आणि स्वप्नरंजन यामधला फरक त्यांनी ध्यानी घ्यायला हवा. गत काही वर्षात भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात निश्चितपणे आपली छाप उमटवली आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या १५ वर्षात, संशोधन प्रबंधांच्या प्रकाशनांमध्ये भारताने फ्रांस, रशिया, इटली, कॅनडा यासारख्या देशांना मागे टाकले आहे. ही निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे; पण त्याचवेळी ही बाबदेखील लक्षात घेतली पाहिजे, या बाबतीत केवळ संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक प्रगती महत्त्वाची असते. भारतात ज्या संशोधनांचा स्वामित्व हक्क (पेटंट) नोंदविला जातो, त्यापैकी बहुतांश संशोधने कधीच प्रत्यक्ष वापरात येत नाहीत; कारण त्यात तो दर्जाच नसतो! भारतात केल्या जाणाऱ्या बहुतांश शास्त्रीय संशोधनांमागे केवळ आचार्य (पीएचडी) ही पदवी आणि त्यायोगे वेतनवाढ, बढती, विदेश प्रवास इत्यादी लाभ पदरात पाडून घेणे हाच उद्देश असतो. इतर देशांमधील प्रबंधांची एका अक्षराचाही बदल न करता नक्कल करून आचार्य ही पदवी मिळविल्याच्या बातम्या अनेकदा उमटल्या आहेत. एवढे करूनही दर दहा हजार लोकसंख्येत संशोधकांची संख्या किती, या निकषावर भारत केनियासारख्या अविकसित आफ्रिकी देशाच्या तुलनेतही माघारलेला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे किती स्वामित्व हक्क नोंदविले गेले, या निकषावर स्थिती तपासू जाता, भारत विकसित राष्ट्रांच्या पासंगालाही पुरत नाही. भारतात २०१३ मध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे १७ स्वामित्व हक्क नोंदविले गेले होते, तर दक्षिण कोरियात ४,४५१! भारताचा शेजारी अन् प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्ये नोंदविल्या गेलेल्या स्वामित्व हक्कांची संख्या होती ५४१! संशोधन आणि विकास (आर अ‍ॅण्ड डी) या क्षेत्रावर विकसित देशांच्या तुलनेत केला जाणारा अत्यल्प खर्च हे त्यामागचे कारण आहे. जोपर्यंत ही परिस्थिती बदलली जाणार नाही, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा संशोधकांना उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. संशोधन न करता उचलेगिरी करून सादर केलेल्या प्रबंधांच्या संख्येच्या आधारे पंतप्रधान देशाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील पहिल्या तीन देशांमध्ये नेऊन बसविण्याचे स्वप्न बघत असतील, तर मग दुर्दैवाने त्याला स्वप्नरंजनच म्हणावे लागेल!