शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मरणासन्न रामनदी पुन्हा जिवंत व्हावी, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 1:41 AM

आता आपल्या नदीचे आरोग्य आपल्या हाती घ्यायची वेळ आली आहे. पुण्यातल्या नागरिकांनी पहिले पाऊल  उचलले आहे, त्याबद्दल...

- अनिल गायकवाड, संस्थापक सदस्य, ‘रामनदी पुनरुज्जीवन अभियान’ 

सर्वांना शुद्ध पाणी हवे असेल तर ते नदीच आपल्याला आजवर देत आली आहे. परंतु ४५० कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या आयुष्यात गेल्या पन्नास ते साठ वर्षांत फक्त मानवी कृतीने प्रगतीच्या नावाखाली प्रचंड प्रदूषण केले आणि या जीवनदायिनी नद्या मरणासन्न केल्या. आपले अस्तित्व या पृथ्वीवर टिकवायचे असेल, तर या नद्यांना त्यांच्या पूर्वीच्या, नैसर्गिक अवस्थेमध्ये पुन्हा आणावे आणि ठेवावे लागेल.

किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून पुणे शहरात रामनदी पुनरुज्जीवन अभियानाचा जन्म झाला आहे. नागरिकांच्या प्रयत्नातूनच नदीचे अस्तित्व टिकू शकते आणि नदीचे प्रदूषण करणारे सर्व स्रोत थांबविले, तरच नदी शुद्ध होऊ शकते. त्यासाठी व्यापक जनजागृती, तसेच प्रत्यक्ष प्रयत्नातून नदी स्वच्छतेचे परिपूर्ण प्रारूप तयार करावे या उद्देशाने सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत. पर्यावरण संवर्धन या कामामध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या पुणे येथील बारा संस्था, तज्ज्ञ, सुमारे पस्तीस महाविद्यालयांमधील हजारो  ‘इको रेंजर्स’, पुण्यातील तीन किर्लोस्कर कंपन्यांचे कर्मचारी-त्यांचे कुटुंबीय, तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहयोगाने पहिल्या वर्षात मोठ्या प्रमाणात कृती कार्यक्रम राबविण्यात आले. 

पुण्यातून वाहणारी राम नदी १९ किमी लांब असून, या नदीच्या खोऱ्यामधे तीन ते साडेतीन लाख नागरिक राहतात. खाटपेवाडी परिसरात पडणारे पावसाचे पाणी घेऊन प्रत्यक्ष रामेश्वर मंदिर भुकूम या ठिकाणी रामनदी उगम पावते व तेथून गांव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी असा प्रवास करत, बाणेर येथे मुळा नदीमध्ये समाविष्ट होते.  जनजागृती अभियानाच्या दरम्यान नदी प्रदूषित करणाऱ्या गोष्टींची यादी करण्यात आली. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रदीर्घ विचारमंथन करून काम सुरू झाले. रामनदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत नऊ भाग पाडून संस्थापक सदस्य संस्थांनी एकेका भागाच्या कृती कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जबाबदारी घेतली. घरांघरांतून, संस्थांमधून, सार्वजनिक मंडळ, बचतगट, शाळा-कॉलेज, वेगवेगळ्या संस्था व उद्योग यांसाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. यामध्ये नदीची ओळख, परिक्रमा, पर्यावरणपूरक घरगुती वस्तू प्लॅस्टिक प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धिकरण, भूजल व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, परसबाग, छत शेती, मधमाशी पालन, सुती कपडे, विषमुक्त अन्न अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. 

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पहिला  ‘रामनदी’ महोत्सव (ऑनलाइन)  दिनांक ८  ते १० जानेवारी, २०२१ दरम्यान संपन्न होणार आहे. पुण्यातील नदीचा शास्रीय अभ्यास करून, सादर होणारा हा पहिलाच ऑनलाइन महोत्सव असेल. सुमारे १९ कि.मी. लांबीची ही नदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे.  ‘या नदीचा इतिहास, भूगोल, जैवविविधता इत्यादी बरोबरच वेगवेगळ्या समस्यांविषयी नदीप्रेमींना जागृत करावे, तसेच सक्रिय सहभागासाठी प्रेरित करावे,’  हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

पाच भागांच्या या महोत्सवात, अनेक मान्यवरांची दृक-श्राव्य व्याख्याने, गेल्या दीड वर्षांत झालेल्या प्रत्यक्ष कामांवर आधारित लघुपट, नागरिकांच्या आठवणी, सागर कुलकर्णी निर्मित रामनदीचे भारुड, रामनदी संगमाचा आभासी  ‘इको टेल’ इत्यादींचा समावेश आहे.सध्या सर्वच नद्यांची अवस्था रामनदीपेक्षा वेगळी नाही. ज्या त्या शहरातल्या-गावातल्या लोकांनीच आता आपल्या नदीचे आरोग्य आपल्या हाती घ्यायची वेळ आली आहे. त्याचा प्रारंभ रामनदीच्या उदाहरणाने व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून हे जाहीर निमंत्रण. या, आपल्या नद्या आपणच वाचवू या!- सहभागी होण्यासाठी :  ‘किर्लोस्कर वसुंधरा’चे फेसबुक पेज- Kirloskar vasundhara interanational film festival 

टॅग्स :Puneपुणेriverनदी