शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धोरण नेमके कुठे चुकतेय? साखर कडू का ठरतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 5:22 AM

कोणत्याही मालासाठी आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बेभरवशाचे पुरवठादार ठरू शकतो. त्याचा फटका बसण्याचा धोका अधिक असतो, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

आपल्या देशाला वर्षाकाठी २६० लाख टन साखर लागते. चालू ऊस गळीत हंगामाच्या अखेरीस ३१० लाख टन साखरेचे उत्पादन होणार आहे. पन्नास लाख टन अतिरिक्त साखर, शिवाय चालू हंगामाच्या  सुरुवातीला ११० लाख टन साखरेचा साठा शिल्लक आहे. भारत सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून किमान सरासरी प्रतिमाह वीस लाख टन साखर लागते. त्याप्रमाणे तीन महिने पुरेल इतका साठा (साठ लाख टन) कायम ठेवला जातो. गेल्या काही वर्षांतील उत्तम पर्जन्यमानाने उसाचे उत्पादन चांगले येत आहे. शिवाय उसाला चांगला भाव मिळतो, बाजारपेठेची शाश्वती आहे. परिणामी अधिकाधिक शेतकरी ऊस लागवड करतो आहे. पुढील वर्षीदेखील बंपर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे साखर निर्मिती करणारे साखर कारखाने अडचणीत येऊ लागले आहेत.

आखाती देश तसेच आशिया खंडातील अनेक देशांमध्ये साखरेचे उत्पादन होत नाही. त्या बाजारपेठांसाठी निर्यात करून भारत साखरेचा साठा संपवू शकतो; पण आपल्या साखरेचा उत्पादन खर्च अधिक असल्याने १८ ते २० रुपयांनी साखर विक्री करणे तुटीचा व्यवहार ठरतो. ही तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त ठरलेली साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान द्यावे हा उपाय निवडण्यात आला. १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या वर्षात साठ लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरवून प्रतिटन १० हजार ४५० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्या वर्षभरात ५८ लाख टन साखरेची निर्यात झाली. त्या अनुदानापोटीची सर्व रक्कम केंद्र सरकारने साखर कारखान्यांना अद्याप अदा केलेली नाही. मार्चपर्यंत ती दिली जाईल असे सांगण्यात येते. चालू हंगामातदेखील अतिरिक्त उत्पादन होणार याची स्पष्ट कल्पना होती, म्हणून केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाने पुढील वर्षासाठीदेखील अनुदान योजना जाहीर करावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीला निर्णय घेण्यास सवड मिळाली नाही. त्यात दोन महिने निघून गेले. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. दरम्यानच्या काळात वीस लाख टन साखर निर्यातीचे करार होऊ शकले असते. ते झाले नाहीत.
भारताचे निर्यात धोरण अनिश्चित असल्याने काही देशांनी ब्राझीलसारख्या देशाकडून साखर मागविली. आपण निर्णय घेण्यास उशीर केला. वास्तविक साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर १८ ते २० रुपयांवरून २७ रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे प्रतिटन १० हजार ४५० रुपयांऐवजी सहा हजार रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय  सप्टेंबरमध्येच घ्यायला हवा होता. त्यात मोठी दिरंगाई झाली. तसेच मागील वर्षाचे  थकीत अनुदानही अदा करायला हवे होते. सरकारचा मतिमंद कारभार एखाद्या व्यवसायाला कसा फटका देऊन जातो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणतात त्याप्रमाणे आता सरकारने निर्णय घेतला आहे. यावर्षीही किमान ६० लाख टन साखर निर्यात करावी लागेल, शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या साखरेच्या दराचा लाभ उठवावा लागेल. ब्राझील हा सर्वांत मोठा साखर धंद्यातील स्पर्धक आहे. गतवर्षी साखरेचे दर घसरल्याने त्या देशाने इथेनॉल उत्पादनावर भर दिला होता. आता दर वाढल्याने पुन्हा या वर्षी साखरेचे उत्पादन वाढविले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दरावर उत्पादनात चढ-उतार करण्याचे त्या देशाचे उत्तम नियोजन होते आहे. आपण साखरेपासून इथेनॉल करण्याचे धोरण ठरविण्यात अनेक वर्षे घालविली. साखर उत्पादनात आता आपण स्वयंनिर्भर झालो आहोत. दुष्काळ पडला तरच थोडी समस्या निर्माण होऊ शकते, अन्यथा साखरेच्या बाजारपेठेस धक्का लागत नाही.
साखर उद्योगातून दरवर्षी पाच ते सहा हजार कोटींचा महसूल सरकारला मिळतो. त्यामुळे बाजारपेठेतील चढ-उतारासाठी काही रक्कम बाजूला काढून त्याचा शुगरफंड निर्माण करण्यास हरकत नाही. इथेनॉलच्या उत्पादनाचेही नियोजन नीट केले तर अतिरिक्त साखरेची समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षता घेता येईल. एकूण उत्पादनाच्या साखरेला देशांतर्गत बाजारपेठच आपली मोठी असल्याने नियमन करणे सोपे आहे. यासाठी बाजारपेठ, इतर देशांचे उत्पादनाचे अंदाज, दरातील चढ-उतार, आदींचा विचार करून तातडीने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा कोणत्याही मालासाठी आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बेभरवशाचे पुरवठादार ठरू शकतो. त्याचा फटका बसण्याचा धोका अधिक असतो, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.