शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

नकाशामुळे बिघडलं वातावरण; पण भारत-नेपाळ संबंधात कटुता येण्यामागचं नेमकं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 5:45 AM

भारत आणि नेपाळमधले मधुर संबंध बिघडायला लागलेले आहेत. त्यामागे नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारला असलेली चिनी फूस, हे कारण असले तरी भारताने सामंजस्याने चर्चेद्वारे द्विपक्षीय मतभेदांचे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

नेपाळसारखा दुबळा आणि अनेक बाबतीत भारतावर अवलंबून असलेला देश सीमावाद उकरून काढत आपल्याला आव्हान देऊ लागला असल्याची नोंद याच स्तंभातून याआधी घेण्यात आली होती. आता नेपाळने संघर्षाच्या दिशेने आणखीन काही पावले टाकली आहेत. त्या देशाच्या संसदेने एक घटनादुरुस्ती विधेयक एकमताने संमत करून देशाच्या नव्या नकाशाला मान्यता दिलेली आहे. या नकाशात असा भूभाग आहे, जो प्रत्यक्षात भारतात आहे. दोन्ही देशांदरम्यानचे शेकडो वर्षांचे ऋणानुबंध नेपाळी सांसदांना या धाडसापासून परावृत्त करू शकलेले नाहीत. अर्थातच यामागे चिनी चिथावणी आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली आणि त्यांचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष चीनच्या इशाऱ्यावर चालतो, हे आता गुपित राहिलेले नाही.

ओली यांची लोकप्रियता हल्ली कमालीची घसरली होती, पण या नकाशाच्या निमित्ताने त्यांनी भारतविरोधी वातावरण तयार करून आपल्या मागे लोकमत उभे केले आहे. भारताने विचारपूर्वक पावले टाकली असती तर ओली यांना ही संधी लाभलीच नसती. नेपाळी प्रसारमाध्यमांच्या म्हणण्याप्रमाणे, भारताच्या पंतप्रधानांना १९ मे रोजी नेपाळी पंतप्रधानांशी संवाद साधायचा होता. या संवादातून तप्त वातावरण शमले असते. मोदी यांनी याआधीही थेट हस्तक्षेप करत द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत केली होती, पण कोविडविरोधी उपाययोजनेत गुंतल्यामुळे असेल, मोदी यांनी संवादाचा बेत लांबणीवर टाकला. परिणामी इतके दिवस नवा नकाशा आणायचे मनसुबे बोलून दाखविणाऱ्या नेपाळने २० मे रोजी नकाशा सार्वजनिक अवलोकनार्थ प्रकाशितही केला. २६ मे रोजी त्याला सर्वपक्षीय बैठकीत मान्यता मिळाली आणि ३१ मे रोजी नेपाळी संसदेच्या एकमुखी संमतीची मोहर लागली.
नेपाळचे हे कृत्य आततायी असले तरी भारताकडेही बराच दोष जातो, हे मान्य करावे लागेल. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या सीमावादातले ९८ टक्के मुद्दे गेल्या २६ वर्षांतील चर्चेने निकालात काढलेले आहेत. तरीही काही विवादास्पद भूभाग आहेत. विशेषत: कालापानी आणि सुस्ता या परिसरासंदर्भात नेपाळ सरकारच्या भावना तीव्र आहेत. त्यावर चर्चा व्हावी असा आग्रह तो देश गेले काही महिने सातत्याने धरत आलेला आहे. मात्र, भारताची घाईघाईत चर्चा करायची तयारी नव्हती. त्यावर नेपाळने आक्रमक पवित्रा घेतला. त्यासाठी त्या देशाला निमित्त मिळाले ते भारताच्या संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लिपुलेखा-मानसरोवर रस्त्याचे. गेले एक तप या रस्त्याचे बांधकाम चालू असताना नेपाळने साधी हरकतही घेतली नव्हती, पण यावेळी मात्र पंतप्रधान ओली यांच्यासह सगळेच सत्ताधारी भारतावर तुटून पडले.

त्याआधी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरचा खास दर्जा काढत त्या राज्याचे विभाजन झाल्यानंतर भारताने आपला जो नकाशा प्रसिद्ध केला होता, त्यात भारत-नेपाळदरम्यानची नैसर्गिक सीमा असलेल्या काली नदीचा नामोल्लेख टाळला होता. त्यावरूनही नेपाळमध्ये वातावरण तप्त ठेवण्यात ओली यांनीच पुढाकार घेतला होता. नेपाळी पंतप्रधानांची पावले ओळखण्यात केंद्र सरकार कमी पडले की, भारताच्या आढ्यतेतून विसंवादाला वाव मिळालाय, हे सांगणे अवघड असले तरी एक जुना सोबती आपण गमावण्याच्या बेतात आहोत, हे नक्की.
आपल्याला हवा तसा नकाशा पाकिस्तान आणि चीनही प्रसिद्ध करत असतात, पण हे दोन देश आणि नेपाळ यांत फरक आहे. भारत आणि नेपाळच्या सैन्यदलांमधले संबंध अत्यंत घनिष्ट आहेत. गुरखा सैनिकांनी वेळोवेळी भारतासाठी प्राणांची आहुती दिलीय. आपले सरसेनापती नेपाळी सैन्याचेही मानद जनरल असतात आणि त्या देशाच्या सरसेनापतीला आपल्या सैन्यानेही तो बहुमान दिलेला आहे. नेपाळवरच्या कोणत्याही आपत्तीत पहिल्याप्रथम धावून जातो तो भारतच. आताही कोविडकाळात भारताने नेपाळला आपत्ती निवारणासाठी तब्बल २५ टन औषधे पुरवली आहेत. छोटा भाऊ म्हणूनच नेपाळकडे भारत पाहात आला आहे. कुणाच्या तरी चिथावणीने हे संबंध भाऊबंदकीत परावर्तित होत असतील तर सावध होण्याची जबाबदारी मोठ्या भावाचीच नाही का?

 

टॅग्स :NepalनेपाळchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी