शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

संपादकीय - माध्यमांचा करंटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 7:22 AM

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले

सेवाग्राम ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आहे. (खरे तर आज सेवाग्रामला विश्वग्रामाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे.) त्या लढ्याचे सर्वोच्च सेनापती म.गांधी १९३६ मध्ये तेथे राहायला आले आणि त्यानंतरचे, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनापर्यंतचे सगळे महत्त्वाचे निर्णय तेथे घेतले गेले. परवा २ आॅक्टोबरला झालेल्या बापूंच्या १५० व्या जयंतीचे व कस्तुरबांच्या ७५ व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून काँग्रेस पक्षाने आपला राष्ट्रीय मेळावा तेथे भरविला. राहुल गांधी, सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह त्या पक्षाचे देशभरातील सर्व नेते व कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित होते. पदयात्रा व जाहीर सभा असे सारे होऊन सुमारे पाऊण लाखांचा तो प्रचंड जनमेळावा गांधीजींना अभिवादन करून व २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकून अत्यंत उत्साही वातावरणात समाप्त झाला. आश्रमाच्या नियमाप्रमाणे सारे नेते जमिनीवर बसून जेवले व देशाच्या या नेत्यांनी नंतर त्यात स्वत:ची ताटेही धुतली! प्रार्थनेत सहभाग घेतला.

गांधीजींचे सारे यमनियम पाळून या मेळाव्याचा शेवट जाहीर सभेत झाला. तेव्हा तीत यापुढची निवडणूक गांधी वि. गोडसे या सूत्रावरच लढविण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भागीदार आहेत अशी घणाघाती टीकाही त्यांनी या वेळी केली. त्यातील प्रचाराचा भाग वगळला तरी गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीला देशातून एवढ्या साऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करणे हीच मुळात एक विलक्षण व देशाच्या एकात्मतेएवढेच गांधीजींवरील त्यांच्या निष्ठेचे दर्शन घडविणारी बाब होती. एवढी मोठी घटना देशाच्या हृदयस्थानी घडत असताना व तिने देशात एक शांती व अहिंसेचा संदेश महात्म्याच्या नावासोबत पोहचविला असता त्या महाघटनेची घ्यावी तशी दखल देशातील प्रकाश व मुद्रित अशा दोन्ही माध्यमांनी फारशी घेऊ नये या करंटेपणाला काय म्हणायचे असते? देशभक्तीहून पक्षभक्ती आणि पक्षभक्तीहून पदभक्ती येथे मोठी झाली आहे काय? देशाच्या मध्यवर्ती स्थानी एवढे महाभारत घडत असताना या माध्यमांची तोंडे कुठे दिल्लीत, कुठे औरंगाबादेत तर कुठे शेजारच्या नागपुरात घडणाºया बारीकसारीक घटनांकडे व तेथील मध्यम वजनांच्या पुढाºयांकडे असावी हा काळाचा महिमा नसून सरकारने चालविलेल्या माध्यमांच्या गळचेपीचा व विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांना दिलेल्या निर्देशाचा परिणाम आहे. क्वचित एखाद दुसरे मराठी वृत्तपत्र सोडले तर या महान घटनेला कोणत्याही वृत्तसंस्थेने व पत्राने न्याय दिला नाही. देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या अवतीभवतीच घडत असतात. सामान्य माणूस सरकारचे हे अपयश त्याला दाखविले नाही तरी प्रत्यक्ष अनुभवत असतो. नेमक्या अशावेळी गांधीजी व कस्तुरबांसारख्या राष्टÑनिर्मात्यांच्या पुण्यस्मरणाकडे जनतेची म्हणविणारी माध्यमे दुर्लक्ष करतात आणि मोदीराजच्या कथा गाथेसारख्या आळवताना दिसतात तेव्हा त्यांचेही ढोंग जनतेच्या लक्षात येतच असते. त्यामुळे गांधी व कस्तुरबांसाठी नाही आणि काँग्रेस वा अन्य कुणासाठी नाही, तर केवळ स्वत:ची विश्वसनीयता टिकवायला तरी या माध्यमांनी जनतेच्या जवळ व तिच्या भावनांच्या आसपास राहिले पाहिजे. फार पूर्वी ‘विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना तुमची पत्रे त्यांच्या बातम्याही देत नाहीत असे का’ असा प्रश्न एका बड्या इंग्रजी दैनिकाच्या महाव्यवस्थापकाला पत्रकारांनी विचारला तेव्हा तो निगरपट्टपणे म्हणाला, ‘ते मरणारे शेतकरी आमचे वर्तमानपत्र वाचत नाहीत?’ वृत्तपत्रांना जनतेशी संबंध राखायचे नसतील आणि केवळ सरकारचे गुणगान गाऊन त्याच्या जाहिरातीच तेवढ्या मिळवायच्या असतील तर त्या वृत्तपत्रांचा आधार न घेताही त्यांना जगता येईल. मात्र, त्यामुळे लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नुसता पोखरलाच जाणार नाही तर एक दिवस तो उन्मळून जमिनीवर पडलेलाही जनतेला दिसेल.देशाला या माध्यमांची तशी फारशी गरज नाही. माध्यमांच्या बातम्या व वृत्ते वाचून लोक त्यांचे मत बनवीत नाहीत. प्रत्यक्षात लोकमत घडविणाºया असंख्य गोष्टी त्यांच्या भोवतीच घडत असतात. सामान्य माणूस ते अनुभवत असतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी