शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

अश्लील पटांचा ऑक्टोपस; प्रतिबंधासाठी सायबर ऍक्टमध्ये सुधारणा आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 6:34 AM

अश्लीलतेचा मोठा उद्योग बिनबोभाट सुरू असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, त्याला प्रभावीपणे पायबंद घालण्यासाठी प्रयत्न आणि नियोजन कुणीच करताना दिसत नाही.

पॉर्नोग्राफिक व्हिडिओचे चित्रण करून ते वेबसाइटवर अपलोड करण्याचे रॅकेट मुंबईत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अभिनेत्री गहना वशिष्ठसह सात जणांना अटक झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी आहे. केवळ एक प्रकरण उघडकीस आले असले तरी हे हिमनगाचे टोकच आहे. जगभरात देहविक्री आणि अमली-पदार्थांच्या व्यापारानंतर सर्वाधिक उलाढालीत पॉर्नोग्राफी उद्योगाचा क्रमांक लागतो. जगात पॉर्नोग्राफीत दरवर्षी १२ बिलियन डॉलर्सची, तर इंटरनेटवरील पॉर्नोग्राफी इंडस्ट्रीद्वारे २.५ बिलियन डॉलर्सची उलाढाल होते. यावरून जगभरातील या व्यापाराच्या पसाऱ्याची कल्पना येते. पॉर्न व्हिडिओंचा भलामोठा प्रेक्षकवर्ग आणि त्यामार्फत होणाऱ्या भरभक्कम कमाईच्या गणिताचा विचार करून असे अश्लीलपट तयार करणारा एक मोठा वर्ग सक्रिय आहे. हे प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. पॉर्न व्हिडिओ तयार करण्याच्या कारवाया खुलेआम होत असताना त्यासोबत अन्य गंभीर गुन्हेही त्याला चिकटत आहेत.

बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींना हेरून त्यांना वेब सिरीजमध्ये संधी मिळवून देण्याच्या बहाण्याने हे तथाकथित प्रॉडक्शन हाऊस त्यांचे शोषण करीत आहेत. चित्रपट क्षेत्रात अपयश आल्याने नैराश्य आलेली मंडळी यांचे लक्ष्य ठरत आहेत. काम मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांना वाममार्गाला लावण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. कधी काळी पिवळ्या पुस्तकांच्या आडून सुरू झालेली पॉर्नोग्राफी काळाच्या ओघात बदलत आता विद्युत वेगाने इंटरनेटद्वारे जगभरात पसरली आहे. आता त्याला अ‍ॅपची जोड मिळाल्याने मोबाइल फोनमध्ये थिएटरनेच शिरकाव केला आहे. वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ तयार करून मोठा प्रेक्षकवर्ग खेचण्याची स्पर्धा मनोरंजन जगतात सुरू झाली आहे. वैश्विक आणि व्यभिचाराची ठासून भरलेली दृश्ये असलेल्या या वेब सिरीज युवावर्गाचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रेक्षकवर्ग मिळविण्याच्या लालसेतूनच लष्करी गणवेशाचाही एका आक्षेपार्ह दृश्यात वापर केला गेला. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला गेला.
या वेब सिरीजच्या उद्योगावर नाममात्र नियंत्रण असले तरी यातून प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता हे नियंत्रण नामधारीच आहे. चित्रपटांसाठी असलेली सेन्साॅरशिप येथे पूर्णपणे हतबल झाली आहे. ॲपमध्येच या वेब सिरीज पाहिल्या जात असल्याने त्या कोणत्या वयोगटातील प्रेक्षकांनी पाहाव्यात यावरही बंधन राहिलेले नाही. संबंधित प्रॉडक्शन हाऊस केवळ अठरा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी ही वेब सिरीज असल्याची टीप टाकून आपली सुटका करून घेत आहेत. यावर बंधन घालण्याबाबतही अद्याप कुठल्याही यंत्रणेने विचार केलेला नाही. या अश्लील वेब सिरीजसोबतच दिवसागणिक हजारो पॉर्न व्हिडिओ इंटरनेटवर टाकले जात आहेत.गेल्या पाच महिन्यांत लॉकडाऊनच्या कालावधीत भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित तब्बल २५ हजार मटेरियल अपलोड करण्यात आले आहेत. त्यात दिल्ली आघाडीवर असून, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. चाइल्ड पॉर्नाेग्राफीत सहभाग आणि प्रेक्षकवर्ग असलेला भारत हा एक मोठा देश असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत सरकारने अशा हजारो पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. मात्र, तरीही या ऑक्टोपसला आवर घालण्यात यश आलेले नाही. पॉर्नाेग्राफिक वेबसाइट केवळ आपल्या वेबसाइटचे युआरएल बदलून भारतीय कायदा आणि न्याययंत्रणेसोबत खेळत आहेत. मात्र, अश्लील पटांच्या या उद्योगाला इतर अनेक नेटवर्कचेही पाठबळ असल्याचे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे हा उद्योग खूप वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणणे अजून शक्य झालेले नाही.कोट्यवधी रुपये कमावणारा हा उद्योग असे नेटवर्क बऱ्यापैकी बाळगून आहे. म्हणूनच अद्याप त्यांच्याविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही, असा समज पसरणे साहजिकच आहे. केवळ शोषण झालेल्या तरुण-तरुणींकडून तक्रार आल्यानंतरच एखादे प्रकरण उघडकीस येते. अन्यथा अश्लीलतेचा हा मोठा उद्योग बिनबोभाट सुरू असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, त्याला प्रभावीपणे पायबंद घालण्यासाठी प्रयत्न आणि नियोजन कुणीच करताना दिसत नाही. कलेच्या नावाखाली चाललेला हा काळा धंदा नेस्तनाबूत करण्यासाठी सायबर ॲक्टमध्ये सुधारणा करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.