शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

...तरच भारत विश्वगुरू होईल अन् या भूमीतून सोन्याचा धूर पुन्हा निघेल

By विजय दर्डा | Published: April 25, 2022 10:12 AM

आंतरराष्ट्रीय कूटनीतीत भारताने आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या नजरेला नजर देण्याची, उपेक्षा करण्याची कोणाची हिंमत नाही.

विजय दर्डा

पाहा दुनिया किती बदलते, किती वेगाने बदलते. अवघ्या ७५ वर्षांपूर्वी आपण ज्या देशाचे गुलाम होतो, त्या देशाचा पंतप्रधान मोठ्या अपेक्षा घेऊन भारतात येतो, आपल्या पंतप्रधानाना स्वत:चे खास दोस्त म्हणतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या टेचात बरोबरीने त्यांच्याशी बोलणी करतात. एक मजबूत आणि स्वतंत्र शक्ती म्हणून भारत आज जगात उभा आहे आणि कोणी आपली उपेक्षा करू शकत नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे.

ब्रिटनबद्दलच बोलायचे तर एकेकाळी या देशाच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे; पण तो आजही महत्त्वाचा देश आहे. त्याचे म्हणणे सगळे जग ऐकते. बोरिस जॉन्सन दोन दिवस भारतात आले तर सर्वांच्या मनात हा प्रश्न की का आले? दौऱ्यामागचा हेतू काय?  मोदींशी काय बोलले? - आता हे जगजाहीर आहे की, जागतिक राजकारणात काही गोष्टी उघड केल्या जातात,  काही नाही. बोरिस यांनी सांगितले की, त्यांनी भारताशी भूमी, समुद्र, वायू, अंतरीक्ष आणि सायबर क्षेत्रात संरक्षण सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही देश नव्या जटील धोक्यांशी लढत आहेत. आपल्या दौऱ्याविषयी ते फारच भावुक झाले होते. ‘या देशात मला मिळालेली प्रसिद्धी पाहून मला सचिन तेंडुलकर झाल्यासारखे वाटले. अमिताभ बच्चनसारखा माझा चेहरा सगळीकडे झळकत होता...’ असेही ते म्हणाले आणि हो, भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना जॉन्सन भारतभेटीवर आले, हे मोदींचे म्हणणेही महत्त्वाचे आहे. या दौऱ्याच्या पडद्यामागची कहाणी भारताला आकृष्ट करण्याची, आपल्या जवळ आणण्याची आहे, हे तर उघडच दिसते.

ब्रिटनच नव्हे तर अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देश भारताला जवळ करू इच्छितात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नजीकच्या काळात पंडित नेहरू यांनी अलिप्तता धोरण स्वीकारून भारताच्या विदेश नीतीचा शानदार पाया रचला. इंदिराजींनी त्यांची स्वभावगत दृढता आणि भारदस्त कूटनीती यामुळे भारताच्या धोरणाला मजबुती आणली. इंदिराजी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या अणुचाचण्यांनी आपला सन्मान वाढवला. अनेक दबाव असताना अणुऊर्जा तंत्रज्ञान लागू करण्यात मनमोहन सिंग यशस्वी झाले. मधल्या काळात पंतप्रधानांनी स्वतंत्र नीतीचा तोच रस्ता अवलंबला आणि आता मोदी यांनी त्यावर चार चांद लावले आहेत. आंतरराष्ट्रीय कूटनीतीत अंतर्गत राजकीय मुद्दे आणता कामा नये, असे मी नेहमी म्हणत आलो आहे. मंदिर, मशिदीसारख्या अडचणीतून  उफाळलेले वाद अकारण वाटेत  असतानाही नरेंद्र मोदी यांनी विदेश नीतीत चांगली दृढता दाखवली, असे म्हणण्यात मला जराही संकोच वाटणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी खूप चांगले वातावरण तयार केले आहे. भगवान महावीर, बुद्ध, महात्मा गांधी यांचे सद्विचार घेऊन ते जगाच्या व्यासपीठावर गेले. आम्ही शांतता आणि अहिंसेवर विश्वास ठेवतो, असे त्यांनी विविध निमित्ताने स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र, कोणी आपली खोडी काढावी आणि आपण गप्प राहावे, असा मात्र याचा अर्थ मुळीच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांपासून जगातल्या सर्व व्यासपीठांवर भारताची स्थिती मजबूत केली. एका बाजूला चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर ‘क्वाड’मध्ये सामील झाला. तर दुसरीकडे अमेरिकेला लगाम घालण्यासाठी शांघाय सहयोग संघटनात सामील झाला. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा भारताने आपले धोरण स्वतंत्र ठेवले. असे करणे जवळपास अशक्य होते; पण भारत ते करू शकला ते केवळ आपल्या देशाच्या ठामपणामुळे. रशियाकडून खनिज तेल आणि हत्यारांची खरेदी सुरू आहे. भारत-रशियाकडून महिनाभरात जितके खनिज तेल घेतो, तेवढे तेल  युरोपियन देश  अर्ध्या दिवसात खरेदी करतात, असे भारताच्या विदेश मंत्र्यांनी स्पष्ट केले, तेव्हा त्यांना प्रत्युत्तर  देण्याची कोणाची हिंमत झाली नाही. याआधी रशियाकडून एस ४०० खरेदी करण्याबाबत तुर्कस्तानवर अमेरिकेने निर्बंध लावले; पण भारतावर तसे निर्बंध लावण्याची आगळीक अमेरिका करू शकली नाही. आपल्यालाही भारताची गरज आहे, हे त्या देशाला हे ठाऊक आहे. याच कारणाने पाकिस्तानचा पंतप्रधान असूनही इम्रान खान यांनी भारताची स्वतंत्र नीती आणि जागतिक स्तरावर भारताने कमावलेल्या ऐपतीची प्रशंसा केली.

नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिमा मजबूत केली. २०१७ मध्ये डोकलाम वाद उभा झाला, तेव्हा चिनी सैन्यासमोर अडीच महिने आपली सेना पाय रोवून उभी होती. अखेरीस चीनला झुकावे लागले. गलवानमध्ये काय झाले, हे अख्ख्या जगाने पाहिलेले आहेच! तेथील संघर्षात आपलेही सैनिक मारले गेले, हे चीनला अखेरीस मान्य करावे लागले. विवाद अजूनही संपलेला नाही, पण  ‘आजचा भारत हा १९६२चा भारत नाही,’ हे आपण चीनला ठणकावून सांगितलेले आहे.  मागच्या महिन्यात चीनने विदेशमंत्री वांग यी यांना भारतात पाठवले. ते पंतप्रधानांना  भेटू इच्छित होते; पण मोदी यांनी नकार दिला. आज भारताचे विदेशमंत्री, संरक्षणमंत्री किंवा अन्य वरिष्ठ मंत्र्यांना भेटायला जगभरात कोणी नकार देत नाही. एकेकाळी केवळ अमेरिकेचा वट होता, आज आपला आहे.

याबरोबरच मोदी यांनी जगाला हे दाखवून दिले की गुंतवणुकीसाठी आज भारत हीच सर्वोत्तम बाजारपेठ आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी भांडवल येत आहे.   अनेक अडचणी असतानाही देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. आपल्याला एकत्र येऊन ही ताकद अधिक वाढवावी लागेल. आपल्यासमोर  असलेली संधी न गमावता आपण हे  करू शकलो, तरच भारत विश्वगुरू होईल. या भूमीतून सोन्याचा धूर पुन्हा निघेल.

(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनNarendra Modiनरेंद्र मोदी