शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

अमेरिकेत मातृशक्तीचा जागर; यंदाच्या निवडणुकीत महिलांचा कौल निर्णायक असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 7:13 AM

जगाला व्यक्तिस्वातंत्र्याचा उपदेश करणाऱ्या अमेरिकेत अजूनही सगळीकनी गर्भपाताचा अधिकार मान्य नाही, राज्याराज्यांमध्ये वेगळे कायदे आहेत.

जेमतेम दोन महिन्यांतर येऊन ठेपलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बुधवारी दोन म्हत्वाच्या, कदाचित निर्णायक ठरू शकतील अशा गोष्टी घडल्या लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट हिने विद्यमान उपाध्यक्ष हेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटींच्या घरात आणि टेलरचे इन्स्टाग्रामवर २८ कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स यावरून तिची लोकप्रियता लक्षात यावी. पहिल्या दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी उभे असलेले एएलन मस्क यांना हा पाठिंबा जिव्हारी लागला असावा ते फटकळ आहेतच टेलरच्या पाठिंब्यावर स्वतःच्या फाटकेपणाची आणि एकूणच सभ्यतेची मर्यादा ओलांडताना मस्क यांनी अत्यंत वाह्यात प्रतिक्रिया दिली. तिची जगभर निंदा होतेय.

दूसरी घटना ट्रम्प कमला यांच्यातील पहिल्या वादविवादाची. ट्रम्प यांच्यासाठी हा डिबेट दुसरा, तर कमला यांचा पहिला, कारण जूनमधील पहिल्या डिबेटनंतर जो बायडेन यांनी माघार घेतली आणि कमला हॅरिस रिंगणात उतरल्या, एबीसी न्यूजने फिलाडेल्फिया येथे दोन्ही उमेदवारांना एकर मंचावर आणले होते. त्यांचा हायव्होल्टेज डिबेट संपूर्ण जगाने पाहिला. एरव्ही ट्रम्प यांचा अत्यंत वाईट लौकिक प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडण्याचा, कंबरेखालचे वार करण्याचाच आहे. तथापि, कमला हॅरिस यांच्याशी वाद घालताना त्यांना मूळ स्वभावाला मुरड घालावी लागली. २०१६च्या अशाच डिबेटमध्ये हिलरी क्लिंटन यांची भंबेरी उडविणाऱ्या ट्रम्प यांनी यावेळी बऱ्यापैकी सभ्यपणाचा बुरखा पांधरला असला तरी बहुतेक मुद्द्यांवर गॅलरी शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला.

रशिया-युक्रेन युद्ध, इस्त्रायल-हमास संघर्ष, गाझापट्टीतील नरसंहार आदींच्या अनुषंगाने अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि अर्थकारण या नेहमीच्या मुद्द्यांवर ट्रम्प व हॅरिस वा दोघांनी अनुक्रमे रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक या आपापल्या पक्षांच्या भूमिका या चर्चेत मांडल्या, दूम्प आता अध्यक्ष असते तर त्यांचे मित्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन एव्हाना युक्रेनची राजधानी कीव्ह येथे असते, हा कमला हॅरिस यांचा टोला आणि कमला हॅरिस अध्यक्ष बनल्या तर दोन वर्षांत इस्त्रायलचे अस्तित्व संपेल हे ट्रम्प यांचे भाकीत हेच रंजक असे काही नवे होते.

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस घांना टेलर स्विफ्ट हिचा पाठिंबा आणि या वादविवादातील गर्भपाताच्या अधिकारावर झालेले रणकंदन, या दोन बाबी अध्यक्षपदाच्या लढतीला नवे निर्णायक वळण देणाऱ्या ठरू शकतील दोन्ही मुद्दे महिला मतदारांशी संबंधित आहेत जगू अमेरिकेत मातृशक्तीचा जागर सुरू झाला आहे. निवडणुकीच्या रिंगणात महिला असल्याचे काय काय परिणाम होऊ शकतात हे यातून स्पष्ट होते. गर्भपात हा पूर्णपणे स्त्रीच्या भावविश्वाचा स्त्रीत्वाचा व खासकरून मातृत्वाचा विषय आहे. दोन पुरुष उमेदवार या विषयावर वाद करीत असले तर कमला हॅरिस यांनी ज्या संवेदनशीलपणे स्त्रीच्या शरीरावरील तिच्या हक्काचा मुद्दा मांडला तितका क्वचितच तो पुढे केला गेला असता. आपल्या शरीराशी संबंधात काय करायचे, यावर स्त्रीला पूर्णपणे हक्क आहे आणि गर्भातील अंकुराधी वैद्यकीय गुंतागुंत किंवा गर्भवतीच्या आरोग्याच्या मुद्द्यावर न्यायालयदेखील तिचा तो हक्क हिरावून हरकत नाही, अशा शब्दात कमला हॅरिस यांनी गर्भपाताच्या अधिकाराचे जाहीर समर्थन केले आहे. त्यांच्या मते शरीराविषयीच्या निर्णयाप्रमाणेच गर्भवती व मातांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने त्यांनी इस्रायल-हमास संघर्षात गाझापट्टीत मृत्युमुखी पडलेल्या महिला व बालकांबद्दल दुःख व्यक्त केले.

याउलट ट्रम्प वा विषयाकडे कडव्या धर्मवादी भूमिकेतून पाहतात गर्भवतीच्या जिवापेक्षा अजून जन्माला येणान्या तिच्या गर्भातील जिवाची ट्रम्प यांना अधिक काळजी दिसते. गर्भपात म्हणजे त्या जिवाला जन्माआधीच फाशी देण्याचा प्रकार असल्याची टिप्पणी त्यांनी याचदरम्यान केली आणि स्वाभाविकपणे कमला यांनी हा समस्त अमेरिकन महिलांचा अपमान आहे, अशा शब्दात त्यांনা ठणकावले. जगाला व्यक्तिस्वातंत्र्याचा  उपदेश करणाऱ्या अमेरिकेत अजूनही सगळीकनी गर्भपाताचा अधिकार मान्य नाही, राज्याराज्यांमध्ये वेगळे कायदे आहेत. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार राज्यांना दिला आहे. ट्रम्प यांनी त्या निकालाचे समर्थन केले होते. आताच्या निवडणुकीत किमान दहा राज्यांमध्ये हा मुद्दा निर्णायक ठरेल असे म्हणतात बरि, कमला हॅरिस यांच्यामुळे यंदा अमेरिकेच्या निवडणुकीत महिलांचा कौल निर्णायक असेल. त्याच शक्यतेचे कवडसे या वादविवादात उमटले.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिस