शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

संपादकीय - म्हणूनच महामानव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 1:34 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आठवण आपल्याला सामाजिक आणि राजकीय या दोन दृष्टीनेच येते; पण अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांची ओळख तशी मर्यादितच राहिली.

कोरोनाने सारे जग व्यापले, बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु या विषाणूने मांडलेल्या संहारापेक्षा चिंता दिसते ती अर्थव्यवस्थेची. कारण सगळीकडेच चर्चा झडताना दिसतात त्या कोरोनानंतरच्या आर्थिक अरिष्टाच्या. हा सगळा परिणाम जागतिकीकरणाचा आहे, म्हणूनच मानवतेऐवजी चर्चेचा रोखही नफ्या-तोट्याकडे वळलेला दिसतो. उद्योगांचे काय होणार, कोणते उद्योग टिकून राहणार, लोकांच्या सवयी बदलणार असल्याने कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार, नोकऱ्यांचे काय होणार, बेरोजगारी किती वाढणार, अर्थव्यवस्थेचा दर किती घसरणार, अशा अनेक मुद्द्यांना उधाण आले आहे. तेथे मानवी मनाचा, सामाजिक दायित्वाचा उल्लेखही दिसत नाही. कारण ‘वापरा आणि फेकून द्या’ या सूत्रावर खुली अर्थव्यवस्था चालते. तीस वर्षांपूर्वीच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या या जागतिक मांडणीला मानवी चेहरा नाही, हे अनेक वेळा स्पष्ट झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही तेथे राहणाºया अतिसामान्य माणसाच्या उद्धारासाठी असते आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा चेहरा मानवी असायला पाहिजे. सार्वजनिक कल्याण हा तिचा अंतिम हेतू असला पाहिजे. असे आग्रहाने मांडणाºया महापुरुषाची आज जयंती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आठवण आपल्याला सामाजिक आणि राजकीय या दोन दृष्टीनेच येते; पण अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांची ओळख तशी मर्यादितच राहिली. आजच्या संकटकाळात सर्वांना अर्थव्यवस्थेच्या चिंतेने घेरले आहे. रुपयाचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात किती घसरणार. आधीच घरंगळणारा रुपया कोसळणार तर नाही, अशा भीतीने ग्रासले असताना रुपयाच्या स्थिरीकरणाच्या त्यांच्या सिद्धांताचे महत्त्व पटते. ज्यावेळी सगळे जग केर्न्सच्या चलनाविषयीच्या सुवर्ण विनिमय पद्धतीच्या सिद्धांताचे समर्थन करीत होते, त्याचवेळी त्याला विरोध करीत सुवर्ण आधार पद्धतीचा पुरस्कार केला. जेवढे सुवर्ण ठेव म्हणून असेल तेवढ्याच मूल्याचे चलन बाजारात आणणे हा या सिद्धांताचा मूळ गाभा होता. यामुळे चलन फुगवटा होणार नव्हता. रुपया स्थिर राहणार म्हटल्यानंतर महागाईला आपोआपच अटकाव लागणार आणि सामान्य माणूस महागाईत भरडला जाणार नाही. यालाच वेगळ्या भाषेत अर्थव्यवस्थेचा मानवी चेहरा म्हणतात. कितीही सत्ता हातात असली तरी सरकारला चलनफुगवटा करता येणार नाही. आज आपल्यासमोर आव्हान आहे ते रुपया स्थिर ठेवण्याचे. तो स्थिर ठेवता आला तर कोरोनानंतरच्या काळातही आपली अर्थव्यवस्था टिकून राहील. भविष्याचा वेध घेण्याची बाबासाहेबांची क्षमता होती, म्हणूनच केंद्र आणि राज्य संबंधात आर्थिक मुद्दा कसा कळीचा ठरतो हे त्यांनी ‘इव्होल्यूशन आॅफ पेनिनसुला फायनान्स’ या ग्रंथात स्पष्ट केले. केंद्राकडून राज्यांना कशा प्रकारे निधी वाटपाची पद्धत असावी, ती स्पष्ट केली व यातूनच वित्त आयोगाचा जन्म झाला. विरोधी पक्षाचे राज्यांमध्ये सरकार असेल, तर केंद्र कशी मुस्कटदाबी करते हे त्यांनी त्याचवेळी ओळखले होते. अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असणाºया कामगारांना निवृत्तिवेतन, भविष्य निर्वाह निधीची तरतूद, कामाचे तास निश्चित करणे, महिला कामगार, कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा, पाळणा घर, औद्योगिक सुरक्षा कायदा, अशा अनेक गोष्टी या महामानवाने व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना आणल्या. आजच्या गटशेतीची कल्पनाही त्यांचीच. कामगारांचे शोषण होऊ नये वा अकारण संपाचे हत्यार कामगारांनी उपसू नये यासाठी औद्योगिक लवादाचीही कल्पना त्यांचीच.

आजच्या संदर्भात हे सर्व विषय ज्वलंत आहेत. त्यावर त्यांनी मार्गही सांगितले; पण जगाच्या मागे पळताना तो रस्ता आपण सोडला आणि फार दूर निघून आलो. कालौघात अनेकांनी अर्थव्यवस्थेची मांडणी केली. कोणी त्याला समाजवादी चेहरा देण्याचा प्रयत्न केला. कोणी गांधीवादाचा आभास दाखवला. आता तर सर्वांनी अर्थव्यवस्थेचे दरवाजेच मोकळे केले; पण या प्रयोगांमध्ये अर्थव्यवस्थेला केंद्रीभूत म्हणून अभिप्रेत असलेला ‘माणूस’ हरपत गेला. कोरोनानंतर नव्या मांडणीची गरज पडल्यास पुन्हा बाबासाहेबच मदतीला येतील, हे मात्र खरे.‘१९१५मध्ये वयाच्या२४ व्या वर्षी त्यांनी ‘एशियंट इंडियन कॉमर्स’ हा प्रबंध लिहून ईस्ट इंडिया कंपनी अनुत्पादक कर लावून देशाचे कसे शोषण करते यावर प्रकाश टाकला.’ छुपे अनुत्पादक कर लावले जातात?

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरLokmatलोकमत