शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

शैक्षणिक प्रगती महत्त्वाची

By admin | Published: May 01, 2015 2:13 AM

उच्च व तंत्रशिक्षण हे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचे साधन बनले आहे. २१वे शतक हे ज्ञानावर आधारित समाजाचे आविष्कारक मानले जाते.

उच्च व तंत्रशिक्षण हे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचे साधन बनले आहे. २१वे शतक हे ज्ञानावर आधारित समाजाचे आविष्कारक मानले जाते. ज्ञानातून संपत्ती निर्माण करणे ही जगातील सर्व विकसित, विकसनशील व गरीब देशांमध्ये महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. भारतात आजमितीस २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आहेत. एका दृष्टीने जगातील श्रीमंत आणि गरीब देशांची प्रतिमा भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. या कारणाने भारताचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. ल्या ६२ वर्षांमध्ये देशाची उच्च शिक्षणाची चौकट संपूर्णत: बदललेली आहे. साधारणत: १९८0 सालापासून उच्च शिक्षण हे फक्त सार्वजनिक विद्यापीठात आणि त्यांना संलग्न असणाऱ्या विद्यापीठात दिले जात होते. पण १९८0 नंतर जगामध्ये तीन मोठे वैज्ञानिक आणि तांत्रिक बदल घडले. ते विशेषत: संदेश दळणवळणाशी निगडित असलेल्या गोष्टींमध्ये विरघळले होते. कारण त्याच काळामध्ये संगणकशास्त्र, संदेश दळणवळणशास्त्र आणि संदेश एका गावातून दुसऱ्या गावाला किंवा एका देशातून दुसऱ्या देशाला देण्याची साधनव्यवस्था जगामध्ये वापरली जाऊ लागली आणि तिचा विस्तार होऊ लागला. या सर्वांच्या मागे उच्च शिक्षण आणि गतीने वाढणाऱ्या तंत्रशिक्षणामध्ये झालेल्या संशोधनांच्या गतिमानाचा वाटा होता. त्या कारणानेच ज्ञानाचे वर्धन करण्यासाठी केले जाणारे संशोधन आणि शिक्षण व संशोधन यांचा संगम करून सामाजिक व आर्थिक विकासाकरिता शैक्षणिक पातळीवर एक वेगळीच प्रणाली जगातील सर्वच विद्यापीठांत निर्माण झाली. भारतात मात्र याबाबतीत प्रगती फारच कमी गतीने होऊ लागली. याचं कारण असं होती की, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ४0-४५ वर्षांमध्ये शिक्षण व्यवस्थेची वाढ करणे ही एवढीच कल्पना केंद्र आणि राज्य पातळीवर वेगाने राबविली गेली. महाराष्ट्रात बघायचे झाले तर आजघडीला विद्यापीठ पातळीवर ४२ संस्था आहेत. त्यात २२ सार्वजनिक विद्यापीठे, जिच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने निर्माण केलेली विद्यापीठे येतात. तसेच केंद्र पातळीवर निर्माण झालेली अभिमत आणि संशोधन करणारी विद्यापीठे आहेत. यापेक्षा महाराष्ट्रात आता हजारो महाविद्यालये असून, त्यातील ७५ टक्के महाविद्यालये कला, वाणिज्य, विज्ञान या विषयांमध्ये, तर इतर २५ टक्के महाविद्यालये ही अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मेडिकल व तत्सम व्यावसायिक विषयांशी निगडित आहेत. आपण सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, आजची तरुणाई ही ९0च्या दशकानंतरची तरुणाई आहे. त्यांना जागतिक पातळीवर काय चाललंय याची जाण आहे. आणि याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तरुणाई मागील ४0-५0 वर्षांत घडलेल्या सामाजिक चक्रात अडकून पडू इच्छित नाही. त्यांना पाहिजे आहेत बदल. त्यांच्या दृष्टीने भारताला मिळालेले स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यपूर्व घडलेल्या घटना हा एक महत्त्वाचा इतिहास आहे; परंतु हा इतिहासच आहे. त्याचा मोठेपणा तरुणाईला भावतो. पण त्यात ते अडकून राहू इच्छित नाहीत. भारताचा खऱ्या अर्थाने सामाजिक, मानसिकदृष्ट्या विस्तार करण्यासाठी आणि त्याचबरोबर जागतिक पातळीवरील ज्ञानाचा आधार घेऊन अभ्यासू आणि अनुभवी अशी तरुणाई भारतात निर्माण होऊ शकेल. पुढील १0 ते १५ वर्षांत २५ वयोगटातील भारतातील तरुणाई ही सर्वाधिक ५0 ते ५५ टक्क्यांपर्यंत जाऊन ठेपेल. ही तरुणाई भारतातील शेकडो लोकांचा विचार करतील. तेव्हा पुढील काळात शिक्षणाचे महत्त्व आधी जाणले पाहिजे, तसेच त्यांचा विस्तार केला पाहिजे. (लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.)महाराष्ट्रात बघायचे झाले तर आजघडीला विद्यापीठ पातळीवर ४२ संस्था आहेत. त्यात २२ सार्वजनिक विद्यापीठे, जिच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने निर्माण केलेली विद्यापीठे येतात. तसेच केंद्र पातळीवर निर्माण झालेली अभिमत आणि संशोधन करणारी विद्यापीठे आहेत. यापेक्षा महाराष्ट्रात हजारो महाविद्यालये असून, त्यातील ७५ टक्के महाविद्यालये कला, वाणिज्य, विज्ञान या विषयांमध्ये, तर इतर २५ टक्के महाविद्यालये ही अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मेडिकल व तत्सम व्यावसायिक विषयांशी निगडित आहेत.- डॉ. अरुण निगवेकर