शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महाराष्ट्रातील शिक्षणाचा आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 6:37 AM

दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले.

- हेरंब कुलकर्णीमाजी पंतप्रधान नरसिंहराव आणि राज्यातील अनेक माजी मुख्यमंत्री ज्यांना आदर देत होते, असा एक शिक्षक या महाराष्ट्रात होता. शिक्षक हृदयाचा अधिकारी. महाराष्ट्रातील आज गती घेतलेल्या शिक्षणाला ज्यांनी वळण दिले, त्यातील प्रमुख नाव सरांचे आहे. अनेकांना संचालक म्हणजे वि. वि. चिपळूणकर असेच आजही वाटते. त्या काळात आजच्यासारखे प्रत्येक विभागाला संचालक नव्हते, सचिवमहात्म्य इतके वाढले नव्हते. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांखालोखाल शिक्षण संचालकच सर्व निर्णय घेत. आज अधिकारी सामान्य शिक्षक विद्यार्थ्यांना माहीत नाहीत, कारण भेटी खूप कमी होतात. सर त्या काळात दुर्गम असलेल्या महाराष्ट्रात गावोगाव फिरले. अनेक खेड्यांत रात्री मुक्काम केला. रात्री पारावर पालकसभा घेऊन शिक्षणाचे महत्त्व निरक्षर पालकांना समजावून सांगितले. ही तळमळ होती. डहाणू तालुक्यातील ग्राममंगल संस्थेने काढलेल्या बालवाड्या बघायला डोक्यावर टॉवेल गुंडाळून ते पानसे सरांसोबत पायी डोंगरात फिरले. हा माणूस अधिकारी होता की, समाजसेवक असा प्रश्न पडतो.दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले. ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधणारी विद्यानिकेतन त्यांनी मधुकरराव चौधरीसोबत स्थापन केली. त्यातील बुद्धिमान मुले ही त्या घरातली शिकणारी पहिली पिढी होती. त्यातून शिकलेली मुले पुढे जीवनाच्या किती क्षेत्रात पुढे आली, हा खरेच सर्वेक्षण करण्याचा कौतुकाचा विषय आहे. विद्यानिकेतनच्या धर्तीवर जवाहर नवोदय योजना ही नंतर खूप वर्षांनी आली हे या योजनेचे द्रष्टेपण होते.‘वंचितांचे शिक्षण’ हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. जे. पी. नाईक यांनी शाळाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाची कल्पना मांडली. त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी सरांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे केली. त्यातून हजारो मुले मुख्य प्रवाहात आली. मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सावित्रीबाई फुले याच प्रेरणादायी असू शकतात हे ओळखून, त्यांनी नायगावला सावित्रीबाई जन्मदिन कार्यक्रम तर सुरू केलाच, पण गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देणारी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू केली. त्यातून हजारो मुली शिकल्या. रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न होताच ते आक्रमक झाले, यात बालकामगारांची काळजी होती. पहिली, दुसरीला नापास करू नका, या आदेशामागे डोळ्यासमोर खेड्यात शिकणारी बहुजनाची पहिली पिढी होती. वंचितांच्या शिक्षणाबाबत ही त्यांची कणव होती. कागदी कामात अधिकारी म्हणून हरवून न जाता, हा माणूस महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत फिरून अधिकारी, शिक्षक आणि गावकरी या जिवंत माणसांशी बोलत फिरला. फोन किंवा वीज चांगले रस्ते नसताना बहुजनांना शिक्षण मिळावे, यासाठी तळतळ करणाऱ्या महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, जे. पी. नाईक यांचे स्वप्न तो साकार करीत होता आणि अंत:करणात साने गुरुजींची प्रेमाची भाषा होती.आज स्पर्धा परीक्षेतून आलेले तरुण अधिकारी झाले आहेत, त्यांना तंत्रज्ञान समजते. अतिशय वेगाने ते माहितीची जुळवाजुळव करतात, पण चिपळूणकर सरांची तळमळ आणि कणव कोणत्या वेबसाइटवरून डाउनलोड करायची, हा प्रश्न आहे. सरांची तळमळ अधिकारी आणि शिक्षकांत संक्रमित करणे हेच आजच्या शैक्षणिक प्रश्नाला उत्तर आहे.(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत)

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र