शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

वारकऱ्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 8:13 AM

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.

कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसून आठजणांचे बळी गेले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं वाटत असतानाच भरधाव वेगाचे हे वारकरी बळी ठरले. वर्षानुवर्षे वारीची परंपरा सुरू आहे. वाटेत अनेक विघ्ने आली तरी सुखनैव वाटचाल करणारे वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात. होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी म्हणत हा वैकुंठाचा मेळा विठुरायाच्या चरणी लीन होतो. अवघ्या दीनांचा हा नाथ, गरिबांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. अशा गरीब वारकऱ्यांचा पायी पंढरपूरला जाण्याकडे ओढा असतो. मात्र, वाहनांची गर्दी, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं. यापूर्वीही दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत असे अनेक अपघात झाले आहेत.

अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आषाढीसाठी वारकऱ्यांना विशेषत: मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांना पोलीस संरक्षण मिळते. मात्र, लहान-मोठ्या गावांमधून येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असते. उत्तर भारतात कावड यात्रा मोठ्या प्रमाणावर निघतात. त्यांचीही सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असते. तरीही अपघात होतच असतात. त्या प्रमाणात सुरक्षेचे उपाय दिसत नाहीत. रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे काही भान राहिलेले नाही. शासनाच्या आकडेवारीनुसार २०२० साली रस्ते अपघातात १ लाख ३१ हजार ७१४ लोकांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेत सांगण्यात आले होते. भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेसंदर्भात प्रशासन निर्देश देते, त्या प्रमाणात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या काळजीबाबत प्रशासन तितकेसे जागरूक आहे, असे वाटत नाही. पंढरपूरकडे येणारे रस्ते आता मोठे झाले आहेत.

अनेक महामार्ग तयार झाले आहेत. मात्र, रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने मदत कशी मिळेल, याची उपाययोजना अद्यापही झालेली नाही. रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची गर्दी वाढली असली तरी त्यांच्यासाठी वेगळे मार्ग उपलब्ध नाहीत. वाहनांचे आयुष्यमान, वाहनांची वाढती गर्दी, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्त्यांचे योग्य पद्धतीने नियोजन नसणे, खड्ड्यांचे वाढते प्रमाण ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दरवेळी अपघात झाल्यानंतर त्याची कारणे शोधली जातात. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. परदेशात अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळते. तशी परिस्थिती भारतात नाही. त्यामुळे वाहतूक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. वारीच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांची वाढती संख्या.

दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या महिला वारीच्या निमित्ताने बाहेर पडतात. त्या विठुराया-रुक्मिणी मातेला साकडे घालून आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. ही वारी म्हणजे आयुष्याचे सार आहे. आपल्या आयुष्यातील सारी दु:खे बाजूला सारून आनंदाचे चार क्षण आपल्या पदरात पडावेत म्हणून भाविक त्या विठुरायाकडे धाव घेतात. त्याच्या चरणी आपला माथा टेकवतात. केवळ धार्मिक भावनेतून नव्हे तर या जगाचा त्राता असणाऱ्या विठुरायाने आपले आयुष्य अधिक सुखकर करावे, ही त्यामागची आंतरिक तळमळ असते. त्यासाठी तेे मैलोनमैल, उन्हातान्हाची, पावसाची तमा न बाळगता चालत येतात. निर्मळ मनाने येणाऱ्या भाविकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचे काम अशा अपघातांनी होते.

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपये आपण रस्त्यांसाठी खर्च करीत आहोत, त्याचवेळी नागरिकांना रस्त्यावरून निर्धोकपणे जाता यावे, यासाठी उपाययोजना मात्र आपण करीत नाही. एखादा अपघात झाल्यानंतर आपण त्याकडे काही काळापुरते पाहतो, मृतांना मदतही करतो. ही अल्पावधीची मलमपट्टी फार काळ उपयोगी पडणार नाही. रस्त्यांचा विकास झाला, त्याने वाहनांचा वेग जरूर वाढला असेल. मात्र, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागणार असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. गर्दीचे नियोजन करताना सामान्य नागरिकांच्या जिवाचेही मोल अधिक प्रभावीपणे जपणे गरजेचे आहे. दरवर्षी किती अपघात होतात आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा अशा निष्पाप जिवांचे हकनाक बळी जातच राहतील. वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू