शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

निवडणूक प्रचारातील चिखलफेक बंद व्हायला हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:54 AM

यूं पगड़ियां न उछालो दूसरों की कभी वक्त उनका भी आएगा.

विजय दर्डाचेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहयूं पगड़ियां न उछालोदूसरों कीकभी वक्त उनकाभी आएगा.बात करो मुद्दों की ऐ दोस्तजमाना पलटते देर नहीं लगती...!कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल ईव्हीएममध्ये बंद झाला असून मंगळवारी त्याचा निकाल जाहीर होईल. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वात मोठी शक्ती असून कर्नाटकच्या जनतेने निकाल दिला आहे. निकाल जाहीर होताच जय आणि पराजयाची कारणमीमांसा सुरू होईल! एक पक्ष जल्लोष करेल तर दुसरा गप्प बसेल. प्रत्येक निवडणुकीनंतर असेच होते, कर्नाटकातही तेच होईल!पण महत्त्वाची गोष्ट अशी की ज्याप्रकारे निवडणुकीचा प्रचार झाला त्यावर क्वचितच कुणी चर्चा करताना दिसेल. पण यावर चर्चा व्हायला हवी. कारण निवडणूक प्रचारात जे काही झाले त्यावर चर्चा न करण्याचा परिणाम थेट आपल्या लोकशाहीवर होणार आहे. आज झालेल्या चुका भविष्यात सुधारल्या नाहीत तर उज्ज्वल भवितव्याची शक्यताही उरणार नाही. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांचे बडे नेते हिरीरीने उतरल्याने त्या प्रचाराकडे माझे बारकाईने लक्ष होते.काँग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान होते तर भाजपा आणखी एक मैदान मारण्याच्या ईर्षेने पेटली होती. या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत होणे स्वाभाविक होते व जनतेला आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोघांकडूनही निकराचे प्रयत्न केले गेले. यात काही गैर नाही. परंतु यासाठी नेत्यांनी जे मार्ग अनुसरले ते पाहून लोकशाहीच्या पावित्र्यावर विश्वास असणारे घोर चिंतेत पडले. केवळ कर्नाटकच नव्हे तर अन्य राज्यातील लोकांचीही अपेक्षा होती की, सरकारी पक्ष आपल्या कामगिरीवर मते मागेल व विरोधक सरकारच्या चुका आणि उणिवांवर बोट ठेवेल. दोन्ही पक्ष कर्नाटकसाठी एक स्वप्न पुढे मांडतील व जनतेला त्यापैकी जे आवडेल त्यांना ती मते देईल. परंतु कर्नाटकचा निवडणूक प्रचार दिवसेंदिवस अधिक कटु होत गेला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप सुरू झाले की, सद्विवेकी नागरिकांना देशातील लोकशाहीची चिंता वाटू लागली. इतिहासाची तर अशी काही मोडतोड केली गेली की, अशाप्रकारे चुकीचे अर्थ लावण्याचे कारण काय, असा प्रश्न थोडाबहुत इतिहास जाणणाऱ्यांना पडला. इतिहासही बदलण्याचा प्रयत्न होतोय असे वाटू लागले. जुन्या प्रतिकांना निवडणुकीत निष्कारण ओढले गेले आणि सत्याचा विपर्यास करून भाषणबाजी केली गेली. शेवटी असा खोटेपणा करून काय साध्य होणार? हल्लीचे युग माहिती क्रांतीचे आहे व कोणताही खोटेपणा लगेच पकडला जाऊ शकतो याचे तरी भान बोलणाºयांनी ठेवायला हवे होते.यापेक्षा कर्नाटकच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढविणे अधिक चांगले झाले नसते? कर्नाटकला दुष्काळाचे संकट सारखे भेडसावत असते. राज्यातील ७२ टक्के तळी व तलाव आटून गेले आहेत. ग्रामीण भागांमध्ये बेकारीची गंभीर समस्या आहे. कावेरी व म्हादयी नद्यांच्या पाणी वाटपाचे तंटे सुटत नसल्याने कर्नाटकची अडचण होत आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये रस्ते जीर्ण झाले आहेत. पण या सर्व विषयांना प्रचारात अगदीच किरकोळ स्थान मिळाले. भविष्यातील कर्नाटक कसे असेल याच्या निश्चित योजना दोन्ही पक्षांनी जनतेसमोर ठेवल्या असत्या तर देशभर एक चांगला संदेश गेला असता. पण याऐवजी जात आणि धर्माच्या आधारे जनतेचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न झाले. कर्नाटकात विविध संप्रदायांचे अनेक मठ आहेत. एकट्या लिंगायतांचे ४०० हून अधिक व वोक्कालिगांचे सुमारे १५०. हे मठ खूप प्रभावशाली असल्याचे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक पक्षाच्या नेत्याने या मठांवर लक्ष केंद्रित करून धर्माच्या नावे मते मिळविण्याचे प्रयत्न झाले. निवडणुकीच्या राजकारणात धर्माचा वापर करणे कोणत्याही स्थितीत लोकशाहीला हितावह नाही.देशाच्या इतर राज्यांप्रमाणे शेतकºयांच्या आत्महत्या हा कर्नाटकमधील एक गंभीर प्रश्न आहे. पण कोणत्याही नेत्याने या विषयाला हात लावला नाही. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला यावरून कोंडित पकडण्याचे धार्ष्ट्य भाजपाने दाखविले नाही कारण भाजपाशासित राज्यांमध्येही शेतकरी आत्महत्या सुरू आहेत! विज्ञान आणि विकासाच्या आजच्या युगात सामान्य माणसाचे अधिक कल्याण कसे करता येईल याची चर्चा व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने कर्नाटकात असे होताना दिसले नाही. खरे तर सामान्य माणसाशी संबंधित प्रश्नांवर समाधानकारक असे बोलायला काही नसते तेव्हाच तर हे राजकीय नेते इतरांची उणी-दुणी काढून आपली कॉलर ताठ करून घेत असतात. कर्नाटकात तेच झाले व यानंतर होणाºया निवडणुकांमध्येही नेतेमंडळी याहून अधिक घाणेरडी चिखलफेक करतील. परस्परांच्या टोप्या उडवायचा हा खेळ थांबणार कसा? मला वाटते की, राजकीय पक्षांनी लोकशाहीच्या शालीन मर्यादा आधी समजून घ्यायला हव्यात व तोंडाला कसा लगाम घालायचा हे आपसात बसून ठरवावे लागेल.हे लिखाण संपविण्यापूर्वी...लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या सीमेवरील शौर्यगाथा आपण नेहमीच ऐकत असतो. पण तेव्हा ते गणवेश उतरवून सामान्य नागरिक म्हणून वावरत असतात तेव्हाही ते बहादुरी दाखवतच असतात. लेफ्टनंट आशिष गेल्या आठवड्यात अमृतसर-दादर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. हजरत निजामु्द्दीन स्टेशनवर पहाटे ३ वाजता दोन लुटारू प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटत होते. ते पाहून लेप्टनंट आशिष वरच्या बर्थवरून उडी मारून लगेच खाली आले. झटापटीत लुटारूंनी त्यांच्यावर चाकूने वार केला. पण लेफ्टनंट आशिष यांच्यापुढे डाळ शिजत नाही हे पाहून धावत्या गाडीतून उड्या मारण्याखेरीज लुटारूंना गत्यंतर उरले नाही. लेफ्टनंट आशिष यांना माझा सलाम!

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८