शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

इराणच्या लक्ष्यवेधी निवडणुकीचा अन्वयार्थ

By admin | Published: March 02, 2016 2:50 AM

मजलिस ए शुरौ ए इस्लाम या इराणच्या संसद आणि ‘कौन्सिल आॅफ एक्स्पर्टस’ (तज्ज्ञांचे मंडळ) यांच्यासाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या

प्रा.दिलीप फडके (ज्येष्ठ विश्लेषक)मजलिस ए शुरौ ए इस्लाम या इराणच्या संसद आणि ‘कौन्सिल आॅफ एक्स्पर्टस’ (तज्ज्ञांचे मंडळ) यांच्यासाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. ओबामांनी इराणशी आण्विक सहकार्याचा नवा अध्याय लिहायला घेतल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आले होते. तिथे कोणत्या प्रकारची राजवट येते, यावर आण्विक सहकार्याचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच निवडणूक महत्वाची होती. अन्यथा मध्यपूर्वेतल्या कोणत्याही इस्लामी देशाप्रमाणे ही निवडणूकदेखील लुटुपुटीची मानली जाऊन तिच्याकडे कुणी फारसे गांभीर्याने पाहिले नसते. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार या निवडणुकीत सहा हजारांपेक्षा जास्त उमेदवार होते व त्यात महिलांची संख्या जवळपास पाचशेच्या आसपास होती. येथील निवडणूक बरीचशी नियंत्रित पद्धतीने आणि पाश्चात्य देशांप्रमाणे मोकळ्या वातावरणात होत नाही. राजकीय रचनासुद्धा बरीच गुंतागुंतीची आहे व सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनाई यांच्या मर्जीवर निवडणूक बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. निवडणुकीत कुणी उभे रहायचे हे देखील नियंत्रित केले जाते. त्यामुळे निवडणुकीबाबत खऱ्या बातम्या बाहेरच्या जगाला कितपत समजू दिल्या जातात हेदेखील कोडेच असते. हे सगळे खरे असले तरीसुद्धा जवळपास साडेपाच कोटी इराणी मतदार मतदान करीत असतात आणि त्यामुळे तिथल्या जनमताचा काहीसा अंदाज घेण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. यावेळच्या निवडणुकीवर जगातल्या प्रसारमाध्यमांची नजर होती कारण इराणमध्ये कोणत्या प्रकारची राजवट येते, यावर इराणशी झालेल्या आण्विक कराराची यशस्विता ठरणार आहे. एका बाजूने उत्तर कोरियामधला भस्मासुर बळावत असताना इराणशी झालेला आण्विक करार फसून चालण्यासारखे नाही. म्हणूनच इराणी निवडणुकीबद्दल जगभरात ज्या प्रतिक्रि या उमटत आहेत त्या पाहणे उद्बोधक ठरणारे आहे. ‘वॉलस्ट्रीट जर्नल’मध्ये अरेसू इक्बली आणि असा फित्च यांनी दिलेल्या वृत्तानुसार मध्यममार्गी मानले जाणारे इराणचे सध्याचे अध्यक्ष रौहानी यांचे समर्थक असणाऱ्यांं उमेदवारांनी वरच्या सभागृहात (ज्याला तज्ज्ञांचे मंडळ मानले जात) सोळापैकी पंधरा जागा जिंकल्या आहेत आणि २९० सभासदांच्या इराणच्या संसदेतही अशा मध्यममार्गी उमेदवाराना बहुमत मिळाले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार इराणमध्ये ६२ टक्के मतदान झाले. त्यात कट्टरपंथीयांच्या पक्षाला ५९ जागा मिळाल्या आहेत. अमेरिकेशी झालेल्या आण्विक कराराचे समर्थन करणाऱ्या तसेच जगातल्या इतर देशांशी वाढते आर्थिक आणि राजनैतिक संबंध ठेवण्यास उत्सुक असणाऱ्या उदारपंथीय पक्षांना एकत्रितपणाने १५८ जागांसह बहुमत मिळाले आहे. अजून ५९ जागांची निवडणूक एप्रिलमध्ये व्हायची आहे.‘गार्डियन’च्या संपादकीयात हे रौहानी यांचे व्यक्तिगत यश असले तरी त्यांना यापुढच्या काळात अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत, असा सूर लावला गेला आहे. इराणमधल्या परंपरावादी शक्तींचा पूर्णपणे पाडाव झाला असल्याचे मानता येण्यासारखे नाही. रौहानींना सुधारणेच्या मार्गावर जायला बरीचशी नाराजीनेच संमती देणाऱ्या आयातुल्ला खामेनाई यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सुधारणा घडवण्याचा वेग त्यांना फारसा वाढवता येणार नाही. पुढील काळात इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवड होईल त्यावेळीही रौहानींची परीक्षा होईल. पण आपल्याला काय हवे आहे याची स्पष्ट दिशा इराणी जनतेने दाखवली असल्याचे गार्डियनचे सांगणे आहे. अझादेह मोवेनी या महिला, इराणी-अमेरिकन किंग्जन विद्यापीठात पत्रकारितेच्या प्राध्यापक आहेत. ‘न्यूयॉर्क टाईम्स’मधल्या लेखात त्यांच्या वैयक्तिक अनुभवांच्या आधाराने इराणमधल्या सद्यस्थितीवरचे त्यांचे विश्लेषण प्रकाशित झाले आहे. त्या सांगतात, एकेकाळी इराणमध्ये हदीसच्या तत्वावर आधारलेले नारीवादी महिला जीवन, जिंवतपणाने भरलेले समाजजीवन, राजकीय आणि सांस्कृतिक घटकांचा झालेला संगम आणि संथगतीने पण निश्चितपणाने अंतर्गत सुधारणांचा होणारा प्रवास या सगळ्यामुळे असे वाटत होते की इराणच्या लोकांच्या स्थितीत नक्की सुधारणा होईल. पण तसे झाले नाही, ही कठोर वस्तुस्थिती आहे. यावेळच्या निवडणुकांमध्ये सुधारणावादी उमेदवार यशस्वी झाले ते शहरी भागात. ग्रामीण इराणमध्ये कट्टरपंथीय सुधारणाविरोधकांना यश मिळाले आहे. यापूर्वीच्या काळात देखील इराणमध्ये उदारमतवादी संसद आणि मध्यममार्गी अध्यक्ष होतेच. पण तेवढेच असल्यामुळे इराणच्या प्रशासकीय आणि आर्थिक व्यवस्थेत सुधारणा विरोधकाना मिळणारी अनुकूलता कमी झालेली नाही. अनेक वर्षांपूर्वी इराणमध्ये प्रकाश पाहण्याची मला आशा वाटत होती. पण आता ज्यांचे आप्त आणि नातेवाईक तुरुंगात डांबले गेले आहेत अशा माझ्यासारखील अजूनही अंधारात चाचपडत राहिल्यासारखे वाटत आहे, असा शेराही त्या अखेरीस प्रकट करतात. दस्तुरखुद्द इराणमधल्या वृत्तपत्रांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या इंटरनेटवरच्या इंग्रजी भाषिक आवृत्त्यांकडे वळावे लागते. ‘इराणन्यूज’ या पत्रात तिथल्या मजलीसचे सभापती अली लारीजानी यांच्या वक्तव्याला ठळक प्रसिद्धी मिळालेली दिसते. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत होणारा बदल ही एक चांगली गोष्ट असल्याचे सांगत त्यांनी देशाच्या विकासाला यातून मदतच होणार आहे असे म्हटले आहे. वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या लोकांनी देशाच्या स्थितीवर विचारविमर्श करणे आणि देशाच्या कारभाराची सूत्रे कुणाच्या ताब्यात असावीत हे ठरविणे या गोष्टीला विशेष महत्व आहे आणि त्याचा आदर करायला हवा अशा शब्दात त्यांनी या निवडणुकीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन प्रकट केला आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ने रॉयटरच्या हवाल्याने या घटनेचे दिलेले वृत्त बरेचसे साचेबंद स्वरूपाचे आहे. पण पाकिस्तानमधल्या वाचकांनी त्यावर ज्या प्रतिक्रि या व्यक्त केल्या आहेत त्या वाचण्यासारख्या आहेत. त्यावरून पाकमधल्या लोकाना इराणची निवडणूक आकर्षक वाटलेलीे दिसते. इतर इस्लामी देशांपेक्षा इराणमध्ये लोकशाही जास्त रुजली आहे आणि अधिक शिक्षित, ज्ञानी, जागतिक राजकीय स्थितीचे अधिक चांगले भान असणारे, आधुनिक ज्ञान, शास्त्र आणि तंत्रज्ञान यांची आवड असणारे धार्मिक नेतृत्व तिथे मिळाले आहे. याउलट इतर मुस्लीम देशांमधले धार्मिक तर जाऊच द्या तिथले तथाकथित आधुनिक राजकारणीदेखील अशिक्षित, सरंजामशाही मानसिकता असणारे, बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. त्यामुळेच त्यांना इराण इतर मुस्लीम देशांपेक्षा वेगळा वाटतो आहे, असे दिसते.मोहसेन झारीफिअन या इराणमधल्या तरुण व्यंगचित्रकाराने इराणच्या निवडणुकांकडून तिथल्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या दर्शवणारे एक व्यंगचित्र प्रकाशित केले आहे व ते पुरेसे बोलके आहे.