शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

इस बार चार सौ पार... अपेक्षा आणि अडथळे! चर्चा कामगिरीऐवजी याच भोवती घुमत राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 9:28 AM

मोदींचे विरोधक भाजपला विचारतात, ‘‘२००४ ची ‘इंडिया शायनिंग’ घोषणा आठवते ना?’’ - पण हेही खरे की, २००४ च्या ‘त्या’ चित्रात नरेंद्र मोदी नव्हते!

-प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार निवडणुका हा केवळ मनोबलाचा खेळ असता तर एव्हाना भाजप  सत्तारूढ होऊन नरेंद्र मोदी वाढीव संख्याबळानिशी आपला लोककल्याण मार्ग आक्रमत असलेले आपल्याला दिसले असते; पण अठराव्या लोकसभेसाठी नव्वद कोटी लोकांचे प्रत्यक्ष मतदान अजून व्हायचे आहे. आताच्या सुमारे साडेतीनशेच्या जागी चारशे जागा मिळवून आपण सत्तेत येणार असे पंतप्रधानांनी घोषित करून टाकले आहे. येत्या निवडणुकीची चर्चा सरकारच्या कामगिरीऐवजी मोदींना किती जागा मिळणार, याच प्रश्नाभोवती घुमत राहील, याची दक्षता त्यांनी घेतलेली दिसते. एकाच वेळी आपल्या संभाव्य विजयाचे टोलेजंग चित्र समोर ठेवून प्रतिस्पर्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करणे आणि आपल्या पाठीराख्या मतदारांना उत्साहित करणे असे दोन्ही पक्षी त्यांनी एकाच दगडात नेमके टिपले आहेत. प्रत्यक्षात काय होईल? - आपण थोडे गणित मांडून पाहूया.

घडवू बिघडवू शकणारी राज्येमागील लोकसभेतील ३०३ जागा अबाधित ठेवत ३७० चे नवे अविश्वसनीय लक्ष्य गाठायचे असेल तर महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांना असाधारण महत्त्व आहे. सध्या या राज्यातल्या लोकसभेच्या ११६ पैकी १०६ जागा भाजपकडे आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय उलथापालथींमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत या राज्यातील निकालांना अधिक महत्त्व असेल. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-जेडीयूने बिहारमध्ये एकत्र लढून ४० पैकी ३९ जागा मिळवल्या होत्या. मग नितीशकुमार यांनी फुटून आरजेडीबरोबर सरकार बनवलं आणि आता पुन्हा ते भाजपबरोबर आलेत. यामुळे वंचित जातींप्रति त्यांच्या बांधिलकीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. २०१९ मध्ये भाजपने लढवलेल्या १७ च्या १७, जेडीयूने १७ पैकी १६ आणि लोजपाने काँग्रेस आणि मित्रपक्षांविरुद्ध लढवलेल्या सर्व सहा जागा जिंकल्या होत्या. यावेळी नितीश इतक्या जागा राखतील? चिराग पासवान यांचा पक्ष शंभर टक्के यश मिळवेल? -  निवडणूक तज्ज्ञांच्या मते मित्रांमुळे होणारे नुकसान भाजप अधिक जागा मिळवून भरून काढेल. यात भाजप अधिक जागा लढवेल हे गृहीत आहे; पण नितीशकुमार आणि तरुण रक्ताचा दलित नेता चिराग पासवान या दोघांच्या औदार्यावरच ते अवलंबून असेल.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा गुंताही सोपा नाही. भाजप आणि एकसंध शिवसेना व मित्रपक्षांनी मिळून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील पक्षांतरे व फूट यामुळे आगामी निवडणूक निकालाचे चित्र धूसर बनले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा १८ खासदार निवडून आणू शकेल का? की ‘एनडीए’ची बेरीज वाढावी म्हणून भाजप अधिक जागा लढवेल? कर्नाटकात नुकतीच विधानसभा निवडणूक जिंकलेली असल्याने पारडे काँग्रेसकडे थोडे झुकलेले आहे. 

बाजी पलटवावी लागेल अशी राज्ये२०१९ साली एकंदर १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात भाजपला एकूण ९२ पैकी एकही जागा मिळालेली नव्हती. त्यात आंध्रातील २५, केरळातील २० आणि तामिळनाडूतील ३९ जागांचा समावेश होतो. पक्षाने स्वतःच केलेल्या अभ्यासानुसार देशभरातील एकूण १७५ मतदारसंघात भाजपने क्वचितच विजय नोंदवला आहे. यात दक्षिणेतील तीन राज्यांबरोबरच ईशान्य आणि पश्चिमेकडील बराच मोठा प्रदेश येतो.

लोकसभा निवडणुकीत सहभागी नसलेले मंत्री आणि इतर ज्येष्ठ राज्यसभा सदस्य गेले वर्षभर या मतदारसंघांत तळ ठोकून ‘विकसित भारता’च्या मोदी मंत्राचा प्रसार करीत आहेत. इतिहासात प्रथमच आपण यापैकी १०० जागांवर दावा करू शकू, अशी निश्चिंती पक्षाला वाटत आहे. तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्यात अभूतपूर्व यश मिळवून आपण ३७० चे लक्ष्य गाठू, अशी खात्री पक्षाचे नेतृत्व जनतेला देत आहे. कर्नाटकातील २५ जागा अबाधित राखून दक्षिणेतील उर्वरित चार राज्यांत मिळून १०१ पैकी ४१ जागा जिंकण्याची आशा हा पक्ष बाळगून आहे. या सगळ्या राज्यांत मोदी जास्तीत जास्त सभा घेतील. छोट्या पक्षांबरोबर जातीनिहाय आघाडी बनवली जाईल. स्थानिक सेलिब्रिटीजना उमेदवारी दिली जाईल. भाजपच्या या जादुई लक्ष्याला पश्चिम बंगालमध्ये किमान पूर्वीएवढ्या म्हणजे १८ जागा मिळवण्याच्या आत्मविश्वासाचाही आधार आहे. 

बहुसंख्य जागा मिळवून देणारी राज्ये३७० चा आकडा गाठायचा तर उत्तरेतील आणि पश्चिमेच्या काही भागातील जवळजवळ शतप्रतिशत यशाची पुनरावृत्ती भाजपला करावीच लागेल. उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, दिल्ली व झारखंडमधील १२७ पैकी १२१ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मित्रपक्षांसह ४००चा पल्ला गाठण्यासाठी या सर्व राज्यांतील २०१९ ला जिंकलेल्या सगळ्या जागा भाजपला याहीवेळी जिंकाव्याच लागतील. यापैकी काही ठिकाणी ‘इंडिया आघाडी’ने बऱ्यापैकी आकार घेतला असल्याने पूर्वयशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी तितके सोपे नसेल. अर्थात, हे आकडे काही आकडी आणणारे नाहीत. १९८४ चा अपवाद वगळता कुठल्याही पक्षाने मित्रपक्षांसहसुद्धा ४०० चा आकडा गाठलेला नाही. इंदिरा गांधींच्या दारुण हत्येनंतर काँग्रेसने ४०४ चा आकडा गाठला; पण २०२४ म्हणजे काही १९८४ नव्हे. तसा कोणताच भावनात्मक मुद्दा आज ऐरणीवर नाही.मोदींचे विरोधक भाजपला विचारतात, “२००४ ची ‘इंडिया शायनिंग’ ही घोषणा आठवते ना?” पण हेही खरे की २००४ च्या चित्रात नरेंद्र मोदी नव्हते!

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी