शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जगावेगळी

By admin | Published: December 29, 2014 11:37 PM

दोन हजार चौदा सरत आलंय. या वर्षाच्या शेवटच्या काही घटका आता उरल्या आहेत.

दोन हजार चौदा सरत आलंय. या वर्षाच्या शेवटच्या काही घटका आता उरल्या आहेत. मागे वळून पाहता या वर्षातल्या विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या सर्वांत महत्त्वाच्या घटना कोणत्या, असा प्रश्न मनात उभा राहणे स्वाभाविक आहे. आणि त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तरही तयार आहे. दोन्ही घटना तसं पाहिलं, तर जगावेगळ्या आहेत. आपल्या या जगाच्या बाहेर, धरतीपासून दूर घडलेल्या आहेत. आणि तरीही त्यांची नाळ आपल्या या भूमीशी घट्ट जोडलेली आहे. एक घटना तर आपली, भारतीयांची मान उंचावणारी आहे. मंगलयानाचं मंगळ ग्रहाच्या कक्षेत सुरळीत, कोणतंही विघ्न न येता, आयोजलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश करणं अतिशय सुखावणारं तर आहेच, पण भारतीयांची या आघाडीच्या क्षेत्रातल्या प्रगतीची उर्वरित जगाला ओळख पटवून देणारंही आहे. दुसरी घटनाही अशीच अंतराळाशी संबंधित आहे. रोझेटा या यानानं फिले या धूमकेतूवर उतरण्याची किमया साध्य करणाऱ्या घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं नसतं, तरच नवल?या दोन्ही घटनांमध्ये काही समानता आहे. पहिल्याच प्रयत्नात आपलं मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करतं झालं. इतर कोणत्याही, अमेरिका, रशिया, चीन, युरोपीय समुदाय यांसारख्या प्रगत देशांनाही जे साध्य झालं नाही, ते आपल्या वैज्ञानिकांनी करून दाखवलं. हे यश जेवढं आपल्या वैज्ञानिक प्रगतीचं द्योतक आहे तेवढंच या वैज्ञानिकांच्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासाचंही प्रतीक आहे. आपल्या समाजाची मानसिकता कडकलक्ष्मीची आहे. आपल्याच अंगावर आसूड ओढून घेत त्यातून होणाऱ्या वेदनांमध्येच एक प्रकारचं विकृत समाधान मानणारी आहे. आत्मपीडात सुख शोधणारी आहे. त्यामुळं आपण काही विशेष करू शकतो, जगाच्या नकाशावर आपलं खास स्थान प्रस्थापित करू शकतो, यावर सहसा कोणी विश्वासच ठेवायला तयार नसतं. आपली प्रसारमाध्यमंही या भावनेला खतपाणी घालणारीच आहेत. मुद्रित रूपातली वर्तमानपत्रं काय किंवा इलेक्ट्रॉनिक रूपातल्या वार्तावाहिन्या काय, नकारात्मक, उत्साहावर पाणी ओतणाऱ्या, मन विषण्ण करणाऱ्या घटनांचं खळबळजनक वर्णन करण्यातच धन्यता मानतात. नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित भीषणता यांनाच लक्षवेधी स्थान देण्याची अहमहमिका आपल्याला प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येते. साहजिकच देशात काही उत्साहवर्धक सकारात्मक कार्य होत आहे,याची गंधवार्ताही सामान्यजनांना मिळत नाही. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या कोणाच्याही जिद्दीला ग्रहण लागलं नाही तरच आश्चर्य? परंतु या स्थितीतही आपल्या आतल्या आवाजाला स्मरून आत्मविश्वासानं कोणी अवघड कामगिरी पार पाडली की आपले डोळे दीपून जातात. क्षणभर त्यावर विश्वास ठेवायलाही आपण तयार नसतो. अर्थात, मंगलयानाचं यश इतकं प्रकट आणि स्पष्ट होतं, की त्यावर अविश्वास दाखवण्याची संधीच कोणालाही मिळाली नाही. पण तेच जर समजा काही कारणानं आपण या पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालो नसतो, तर मात्र उधळपट्टी केल्याचा ठपका अंतराळशास्त्रज्ञांवर ठेवण्यात, हे पांढरे हत्ती कशाला पोसायचे, असा सवाल करण्यात आपण सगळेच आघाडीवर राहिलो असतो. म्हणूनच त्या प्रसंगी जातीनं उपस्थित राहून आपल्या पंतप्रधानांनी त्या शास्त्रज्ञांना जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या अखेरच्या कसोटीच्या क्षणी नियंत्रणकेंद्रात हजर राहून मंगळकक्षाप्रवेशाचा तो सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा मनोदय व्यक्त केला, तेव्हा त्यावर कोणता प्रतिसाद द्यावा, याबाबतीत शास्त्रज्ञ संभ्रमात पडले होते. सगळं काही ठरल्यानुसार पार पडलं तर ठीकच आहे. पण समजा ऐन वेळी काही घोटाळा झाला, तर पंतप्रधानांना अवघडल्यासारखं होईल, त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी आशंका शास्त्रज्ञांच्या मनात पिंगा घालत होती. ती त्यांनी बोलून दाखवल्यानंतर पंतप्रधान म्हणाले होते, की समजा दुर्दैवानं तसं झालंच, तर त्या क्षणी तुमच्या पाठीशी उभं राहून त्या पाठीवरून आश्वासक हात फिरवणं माझं प्रथम कर्तव्य ठरतं. मनोबल उंचावणारे ते शब्द शास्त्रज्ञांना इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे वाटले असतील, यात शंका नाही. पंतप्रधानांनी जो विश्वास आपल्या शास्त्रज्ञांच्या निष्ठेवर आणि कर्तृत्वावर दाखवला तोच आपण सर्वांनीच दाखवायला हवा. मंगलयान हे केवळ पहिलं पाऊल आहे. याही पुढे मजल मारायची आहे, हे रोझेटाच्या धूमकेतूअवतरणानं दाखवून दिलं आहे. क्षितिजापर्यंत पोचल्यासारखं वाटतं, त्याच वेळी क्षितिज अजूनही तितकंच दूर आहे, याचा प्रत्यय येतो. तसंच आपलं क्षितिज आता अधिक विस्तारलं आहे आणि तो विस्तार आपल्याला आपल्या कवेत घ्यायचा आहे. एवढंच नाही, तर याच विज्ञानतंत्रज्ञानातील पारंगततेचा उपयोग देशाच्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक प्रगतीसाठी करायचा आहे. तो साध्य करण्यासाठी जशी अर्थबळाची, साधनसामग्रीची गरज भासते, तशीच दृढ मनोबलाचीही भासते, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. तसं झालं तरच जगावेगळी कामगिरी आपल्या हातून पार पडेल.डॉ. बाळ फोंडकेपत्रकार व विज्ञानलेखक