- किशोर पाठकअधिक महिना संपत आला. अधिकात सगळंच अधिक. म्हणजे तीन वर्षांचा तारखांचा गोंधळ तो मिटवतो. पुन्हा वर्ष सुरळीत. त्याचा हिशेब सुरूच. नदीवर बघा सर्वांना पुण्य वाटण्याची, घेण्याची, देण्याची घाईच. प्रत्येक सासरा जावयाला काहीतरी देण्यासाठी उत्सुक. म्हणजे खास जावयाला बोलावले जाते. हे सारे का? तर नैसर्गिक संतुलन. जे जे अधिक आपल्याकडे आहे, आलंय ते सर्वांना वाटायचं. समत्व हवे. ती भावना समाजात रुजावी म्हणून बत्ताशापासून तर अनारसेपर्यंत सारंच वाटतात लोक. पण हे वाढवणं आणि वाढत जाणं लहानपणापासूनच माणूस शिकतो. त्याला लहानपणीच बेरीज-वजाबाकी शिकवलेली असते. एखादी गोष्ट मिळवायची, वाढवायची असेल तर अधिक म्हणतो. म्हणजे बेरीज, बेरजेचे राजकारणही असतं. हे आपल्यात काहीतरी वाढवतं. अर्थात हे वाढवणं प्रगतीचं असेल तर ठीक, पण नुसतंच वाटणं असेल तर त्यालाही आपण अधिकच म्हणतो. प्रत्येक जावयाच्या घरात एकतरी वस्तू नवीन दिसतेच. कुणीही विचारतो काय? अधिक का? आता अधिकात सरकारने काहीतरी अधिक चांगलं करावं याकरिता अधिकस्य अधिकं फलम्! या महिन्यातलं प्रत्येक पाऊल नव्या पदपथाकडे, प्रगती, विकासाकडे असतं. एखादा हुशार कर्तबगार जावई अधिकात काहीतरी वेगळं कमावतो तो सासऱ्याला म्हणतो मी माझ्या कामात हे अधिक केलंय. नवीन यश, कर्तृत्व, कष्ट दिसतात. त्याच्यात मला अजून काही नको, आता जुना झालो तुमचा दुसरा मुलगा म्हणून हे करतोय. पण असं म्हणणारे किती. सासºयाच्या जीवावर लाखोंच्या उड्या मारणारे तरुण कर्तृत्वसंपन्न म्हणायचे की पत्नीला तुझे बाबाही थकलेत. त्यांना आपण अमूक एक घेऊन देऊ किंवा त्यांना ट्रिपला पाठवू करा म्हातारा-म्हातारी मजा. असं म्हणणारा माणूस हा खरंतर अधिकाचं वाणच म्हणायला हवं. अलीकडे अशा समजूतदार माणसांची वाणच त्याला पैशांची, संपत्तीची, मालमत्तेची हावच आहे. तो ती टाळू शकत नाही. किंबहुना मिळेल तेवढं ओरबाडून घेणारेच जास्त असतात. समाजात स्वास्थ्य आणि आनंद हेच निर्माण न करता माणूस बिघडवतात. सध्या एकतर अधिक महिन्यात एक अधिक काम करू या. सामाजिक म्हणजे शहर स्वच्छता, पर्यावरणाची जपणूक, वाढ, पाण्याची जपणूक, पावसाळ्यात पुरात लोकांना मदत, गरिबांना वह्या-पुस्तकांची मदत यातील काहीही वृद्धांना वेळ देणं, त्यांच्याशी बोलणं. ते तर कायम बोलतच असतात. कधी एकटेच. हे त्यांचं अधिक बोलणं ऐकूया. माणुसकीचं एक काम करूया मग अधिकाचं हेच पुण्य नक्की मिळेल. हेच वाण.
अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:19 AM