शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

निस्पृह, निडर आणि स्वतंत्र माध्यमे हा सशक्त लोकशाहीचा प्राणवायूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 12:30 PM

दि. ३० मे रोजी ‘लोकमत मीडिया’चे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

दि. ३० मे रोजी नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये झालेल्या विशेष समारंभात ‘लोकमत मीडिया’चे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी केलेल्या भाषणाचे संपादित शब्दांकन.

भारतीय राजकारणात संक्षिप्त, सखोल आणि पूर्वग्रहाने प्रभावित न झालेल्या प्रमुख मुद्द्यांना अधोरेखित करणारा आवाज शोधणे हे अतिशय दुर्मीळ आहे. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा  हे त्यापैकी एक! चौथ्या स्तंभाचे प्रमुख नेते म्हणून डॉ. दर्डा यांच्या प्रभावी कामगिरीची तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनुभवी संसदपटू म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची मला जाणीव आहे.

डॉ. दर्डा यांचे दिवंगत पिता आणि ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या नेतृत्वाखाली १९७१ साली ‘लोकमत’चा प्रवास सुरू झाला होता. तिथून भारतातील सर्वात मोठ्या प्रादेशिक वृत्तपत्रांपैकी एक असा लौकिक आज ‘लोकमत’ने संपादन केला आहे. निःपक्ष वार्तांकन, अचूक आणि नैतिकतापूर्ण पत्रकारितेची जबाबदारी ‘लोकमत’ने सदैव निभावली. प्रादेशिक, भाषिक वर्तमानपत्रांचा उल्लेख करताना  ‘व्हर्नाक्युलर’ असा शब्द वापरला जातो. देशातल्या प्रादेशिक माध्यमांच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी ही संज्ञा आहे.  ‘व्हर्नाक्युलर’ या शब्दासाठी  गुगलवर अभद्र, सामान्य, साधारण अशा अर्थाचे  पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. देशातील जनतेचे हृदय, मन आणि आत्मा जाणणारी कुणीही विवेकी व्यक्ती हे पर्याय फेटाळूनच लावेल.

समकालीन भारतापुढे असलेली वैशिष्ट्यपूर्ण आव्हाने आणि संधींचे अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण चित्र ‘रिंगसाइड’ या पुस्तकात रंगविण्यात आले आहे. भारतातील माध्यमे आणि राजकीय वर्ग यांच्यातील संबंधांवर भाष्य करणारा लेख विशेष  उल्लेखनीय आहे. राजकीय नेत्यांमध्ये टीका सहन करण्याच्या संयमाचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होत आहे, असे डॉ. दर्डा म्हणतात. त्यांनी भारतीय राजकारण्यांची तीन वर्गांमध्ये विभागणी केली आहे.

पहिली श्रेणी सर्किट राजकारण्यांची आहे. ते सर्किट हाउसमध्ये कायमस्वरूपी मुक्कामाला असतात. त्यांच्या हातात पुष्पहार असतात. कुणीही नेता आला की त्याचे हार घालून स्वागत करणे, त्याच्या खानपानाचे पाहणे हे त्यांचे प्रमुख काम! कालांतराने ते स्वतःही राजकारणी होतात. दुसरी श्रेणी आहे ती सप्लिमेंटवाली. या श्रेणीतील पक्ष कार्यकर्ते आपल्या नेत्यांसोबत स्वतःची छायाचित्रे प्रसिद्ध करतात आणि स्वतःही नेते बनतात. तिसऱ्या श्रेणीमध्ये खरोखरच जनाधार आणि नेतृत्वगुण असलेल्या नेत्यांचा समावेश होतो. आता सर्किट आणि सप्लिमेंटच्या मार्गांचा अवलंब करून नेते बनलेल्यांकडून सौजन्यपूर्ण आणि परिपक्व वर्तनाची कशी अपेक्षा करणार, असा सवाल डॉ. दर्डा करतात. 

भारतातील चौथा स्तंभ एकाचवेळी साक्षीदार, सरकारी वकील, न्यायाधीश आणि शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्याची भूमिका बजावत असतो. प्राचीन काळात लोकांची आणि राजकीय नेत्यांची अग्निपरीक्षा व्हायची. आज मीडिया ट्रायल होते. स्वतंत्र माध्यमे  ही लोकशाहीची जीवनदायिनी आहे. कारण जबाबदार माध्यमेच देशावर  कोणाची सत्ता यावी, याचा योग्य निर्णय घेण्यासाठी नागरिकांना माहिती उपलब्ध करून देतात  आणि जे सत्तेत येतील त्यांचे उत्तरदायित्वही निश्चित करतात. सरकारवर सतत टीका करण्यापेक्षा, विरोधकांचा समाचार घेण्याचा सुरक्षित मार्ग पत्करण्यापेक्षा निर्वाचित सरकारची कृतिशीलता किंवा निष्क्रियतेचे मूल्यमापन करण्याचे काम माध्यमांचे असते. मात्र, उथळपणा आणि सनसनाटी निर्माण करण्याच्या नव-माध्यमी वृत्तीमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या विषयांचे गांभीर्य संपुष्टात येते. परिणामी  लोकशाहीत वॉचडॉग असण्याची जबाबदारी निभावण्याच्या माध्यमांची क्षमता आणि शक्यतांवर मर्यादा येतात.   

स्वतंत्र आणि सत्शील  पत्रकारिता ही भारतीय लोकशाहीसाठी नेहमीच हिताची असेल. सरकार प्रामाणिक आणि कार्यक्षम राहावे, यासाठी मुक्त आणि व्यावसायिक माध्यमांची आवश्यकता आहे.  सामाजिक न्याय, आर्थिक सक्षमीकरण, बहुलतावाद आणि सर्वसमावेशकतेच्या मूळ मुद्द्यांवर भारताच्या वर्तमान यशाचा डोलारा उभा आहे, हे विसरता येणार नाही. या देशाची विजययात्रा अशीच अखंड चालू राहायला हवी असेल तर सशक्त लोकशाहीबरोबरच निडर, स्वतंत्र माध्यमेही गरजेचीच आहेत!

डॉ. शशी थरूरखासदार आणि ख्यातनाम लेखक

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाShashi Tharoorशशी थरूर