शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

फकिराची वेदना

By admin | Published: January 17, 2017 12:32 AM

तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या वेदना आपण समजून घेणार की नाही?

तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या वेदना आपण समजून घेणार की नाही? कुठला बाप आपल्या मुलीला कुंटणखान्यात जाऊ देईल? ‘माझे आता वय झाले, शरीराने थकत चाललो, मी गेल्यानंतर आश्रमातील अनाथ, अपंग मुलांचे काय होईल’, शंकरबाबा सध्या अस्वस्थ असतात. परवा नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील वेदना साऱ्यांसमोर मांडली, तेव्हा ‘छंद’ म्हणून समाजसेवा करणारी सुटाबुटातील माणसेसुद्धा क्षणभर बेचैन झाली. माणुसकीचा गहिवर ज्यांच्या अंत:करणात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही.अमरावती जिल्ह्याच्या परतवाडानजीक वझ्झर आश्रमात शंकरबाबा आपल्या अंध, अपंग, अनाथ, मतिमंद मुला-मुलींसोबत राहतात. ही मुले नालीत, रस्त्यावर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेली. त्यांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाची तपश्चर्या हा वृद्ध कार्यकर्ता मांडून बसला आहे. ‘आपण गेल्यावर या मुलांचे काय होईल’, हा एकच प्रश्न त्यांना सध्या व्याकुळ करीत असतो. सरकार ऐकत नाही आणि ज्यांच्याजवळ गाऱ्हाणे मांडावे ती माणसे शंकरबाबांच्या आसऱ्याने सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यात गर्क. अशा वेळी त्याने करावे तरी काय? मग तो चिडतो, संतापतो. कुणाला शीघ्रकोपी वाटतो, काहींना तुसडा. त्याचे संतापपणे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या मनाच्या तळाशी नाही पोहोचू शकत! परवा नागपुरातील कार्यक्रमात शंकरबाबा ज्यांच्यापुढे रडले त्या सुशिक्षितांचा उमाळा प्रसंगोत्पात होता. अशा प्रसंगात त्यांचा कंठ दाटून येतो आणि ते निर्मळ होतात. त्यांचे असे भावविवश होणे क्षणभंगूर असते. पुढे या वंचितांच्या वेदनेशी, त्यांच्या अश्रूंशी त्यांचे कुठलेच नाते उरत नाही.अनाथ, अपंग, मतिमंदांचे केवळ संगोपनच नव्हे तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा सांगतात. १८ वर्षांनंतर या अनाथांना कायद्यानुसार अनाथालयात ठेवता येत नाही. मग यातील मुले वाममार्गाला वळतात. जो कायदा १८ वर्षांखालील मुलांसाठी संवेदनशील असतो तोच त्या मुला-मुलींच्या १८ वर्षांनंतर एका दिवसात एवढा निष्ठूर का होतो? आई-वडिलांनी टाकून दिलेली लक्षावधी मुले या कायद्यामुळे अनाथाश्रमाबाहेर पडतात, ती पुढे कुठे जातात, हा प्रश्न सरकारला अस्वस्थ का करीत नाही? या अनाथांसाठी सरकारने कायद्यात सुधारणा कराव्यात एवढेच शंकरबाबांचे मागणे आहे. अनाथ, अपंगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळू नये का, ते या देशाचे नागरिक नाहीत का, असे असंख्य प्रश्न शंकरबाबा आपल्या पुढ्यात मांडतात...आई-वडिलांनी कचरापेटीत टाकून दिलेल्या त्या मुलीचा काय दोष? सज्ञान होईपर्यंत तिला शंकरबाबा नावाचा एखादा महात्मा आई-बापाची माया देऊन मोठी करतो; पण १८ वर्षांची झाल्यानंतर कायद्यानुसार तिला आश्रमात राहता येत नाही. तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या यातना आपण समजून घेणार की नाही? कुठला बाप आपल्या मुलीला कुंटणखान्यात जाऊ देईल? उद्या आपली मुलगी अशा नरकात जात असेल तर जन्मदाते म्हणून आपण तिला आनंदाने जाऊ देणार का? आश्रमातील काही मुलींचे शंकरबाबांनी लग्न लावून दिले आहे. त्यांना सासरी धाडताना बाबा खूप रडतो आणि हसतोही. ‘पुढे ती कुठे जाईल’, या प्रश्नाने एरवी धास्तावलेला शंकरबाबा आता निश्चिंत होऊन एकटाच हसत राहतो. त्याच्या रडण्याचा, हसण्याचा आपल्याला अदमासही लागत नाही... आठ वर्षांपूर्वी आश्रमातल्या एका मुलीच्या साक्षगंधाच्या दिवशी बाबांची पत्नी मरण पावली. ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच कळली होती. पण, मुलीचे साक्षगंध होईपर्यंत त्यांनी ती कुणालाच सांगितली नाही. अनाथांचा संसार उभा करण्यासाठी या फकिराने स्वत:चा संसार असा स्वत:च्या हाताने मोडून पाडला आहे. त्यामुळे या अनाथांना पोटाशी धरताना नात्यांचे कोवळे बंध कधी आड येत नाहीत. बाबांनी सुरू केलेली ही अशी तपश्चर्या आहे, ती त्यांच्या पश्चात पुढे नाही जाऊ शकत. शंकरबाबा व्याकुळ होण्यामागे हेच कारण आहे. या मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा सरकारने केला तर त्यांची परवड होणार नाही. मग कुणीही अनाथ गुन्हेगार होणार नाही, अपंग भीक मागणार नाही आणि मुलगी कुंटणखान्यात जाणार नाही. या फकिराची ही वेदना म्हणूनच आपण साऱ्यांनी समजून घ्यायला हवी. - गजानन जानभोर