आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचाही अधिकार नाही काय’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला प्रश्न सामान्य आहे की राजकीय? बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी तो राजकीय असल्याचे तात्काळ सांगून टाकले. मायावतींचा अभिप्राय खराही आहे. कारण वंदे मातरम्, जय हिंद किंवा भारत माता की जय अशा घोषणा करायला देशात कायद्याची बंदी नाही आणि त्याविषयीचे कोणते सामाजिक निर्बंधही अस्तित्वात नाहीत. प्रश्न, ‘तसे म्हणण्याच्या’ अधिकाराचा नाहीच. तो आहे ‘तसे म्हणायला लावण्याचा’. प्रभू रामचंद्र की जय असे हिंदूंनी म्हणायचे किंवा अल्ला हो अकबर हे मुसलमानांनी म्हणायचे. इच्छा असेल तर त्या घोषणा दोघांनीही करायच्या किंवा करायच्या नाहीत. प्रश्न आहे, त्या करायला लावण्याची एखाद्यावर सक्ती करण्याचा. प्रश्नाचे हे स्वरूप मोदींनाही कळते. ते बुद्ध्याच तो विचारतात तेव्हा त्यांची नजर राजकारणावर आणि आपल्या हिंदुत्ववादी मतदारांवर असते हे उघड आहे. हा किंवा असा वाद मोदी सत्तेवर येण्याआधी कधी झडला नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळातही अशा वादाला तोंड फुटल्याचे दिसले नाही. आजच हे वाद उभे केले जात असतील आणि खुद्द पंतप्रधानच त्यात भाग घेत असतील तर ते प्रकरण साधे राहात नाही. वंदे मातरम् म्हणायला या देशात कुणी हरकत घेतली आहे?, कायद्याने, न्यायालयांनी, पक्षांनी, जनतेने की समाजाने? प्रत्यक्षात अशी हरकत कुणी घेतली नाही व तशी ती घेण्याचे धाडसही कुणी करणार नाही. वंदे मातरम् ही बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या कादंबरीतील कविता स्वातंत्र्यपूर्व काळातच देशाला प्रेरणा देणारी व त्याच्या लढ्यात कायम गायली जाणारी होती. तिचे महत्त्व आजही तसेच कायम व टवटवीत आहे. प्रश्न, एखादा धर्म त्याच्या धर्मपुरुषाखेरीज वा धार्मिक दैवतांखेरीज इतरांचे पूजन करीत नसेल तर त्याविषयीचा आहे. या देशात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, आदिवासी यासह इतर अनेक धर्मांचे लोक आहेत आणि त्यांची संख्या वीस टक्क्यांहून अधिक असणारी आहे. यातील काहींना त्यांच्या दैवतांखेरीज इतरांच्या दैवतांना किंवा इतरांनी मानलेल्या धर्मस्थानांना वंदन करण्याची इच्छा होत नसेल वा तशी त्यांच्या धर्मश्रद्धांची परवानगी नसेल तर त्यांना त्यांच्या इच्छेनुरूप वागण्याचा हक्क आहे. कोणताही मुसलमान अल्लाखेरीज दुसºया कुणाची प्रार्थना करणार नाही, असे तो समाज म्हणतो. तसाच काहीसा समज ख्रिश्चनांचा होली घोस्टबाबत वा येशूबाबतचाही आहे. या समाजांना, तुम्ही आमची दैवते व पूजास्थाने तुमचीही मानली पाहिजेत, असा आग्रह करणे हा त्यांच्या धर्मस्वातंत्र्यावरचा आघात आहे. तो दैवतांबद्दलचा आहे वा भूमीसारख्या दैवतासारख्या मानलेल्या बाबींविषयीचा आहे, हा प्रश्न मग गौण होतो. कोणत्याही भारतीय माणसाने भारतमातेला वंदन करणे हा त्याच्या राष्ट्रभक्तीचा पुरावा आहे. मात्र त्याच वेळी तसे मानू न देणाºया अन्य धर्मांच्या लोकांविषयी त्याविषयीचा आग्रह न्याय्य ठरणारा नाही. उद्या पाकिस्तानात राहणाºया हिंदूंना त्या देशातील सरकारने जिनांच्या समाधीला वंदन करायला लावले किंवा मशिदीत जाऊन प्रार्थना करणे भाग पाडले तर तो प्रकार भारताला आवडणारा ठरणार आहे काय? साºया युरोपात आणि अमेरिकेत भारतीय लोक फार मोठ्या संख्येने राहतात. मात्र ते देश या भारतीयांना आपल्या धर्मस्थानांना वा पूजास्थानांना भेट देण्याचा आणि तेथे जाऊन प्रार्थना करण्याचा आग्रह धरीत नाहीत. उलट आपल्या देशात ते भारतीयांना व अन्य देशवासीयांना त्यांची स्वतंत्र पूजास्थाने उभी करण्याची अनुमती देतात. यातल्या कोणत्याही देशाने ती पूजास्थाने उद्ध्वस्त केल्याची घटनाही गेल्या १०० वर्षात कधी घडली नाही. या स्थितीत भारतातील मुसलमानांवर अन्य अल्पसंख्याकांवर आम्ही सांगतो त्या धार्मिक स्वरुपाच्या घोषणा तुम्हीही केल्या पाहिजेत, अन्यथा तुम्ही या देशाबाहेर गेले पाहिजे असे म्हणण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाचे अनेक पुढारी कशाच्या आधारे वापरतात? या पुढाºयांना त्यांच्या या अधिकाराबाबत कुणी विचारणा करण्याचे धाडस करीत नाही. कारण त्यांच्या मागे सत्ता उभी आहे आणि ती काय करू शकते ते गेल्या काही काळात तिने घडवून आणलेल्या हिंसाचाराने देशाला दाखविले आहे. तरीही हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याला सरळ उत्तर न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही काय’ असे उत्तर देत असतील तर ते खºया प्रश्नाला बगल देत आहेत आणि आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करताना तो इतरांवर लादण्याच्या त्यांच्या अनुयायांच्या प्रयत्नांना बळ देत आहेत असाच त्याचा अर्थ होतो. मायावतींनी त्याचमुळे त्यांच्या या प्रयत्नाला सियासती किंवा राजकीय म्हटले ते खरे आहे. देश टिकवायचा तर त्यातील बहुसंख्य लोकांसोबतच येथील अल्पसंख्याकांना सोबत घेणे व त्यांच्या श्रद्धांचा घटनेनुसार आदर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तसे केल्यानेच हा देश एकत्र राहू शकणार आहे. देश एकत्र राहणे याचा अर्थ त्याची भौगोलिक अखंडता टिकणे एवढाच होत नाही. त्यातील जनतेत एकात्मतेची भावना असणे हे त्याच्या खºया राष्ट्रीयत्वाचे लक्षण आहे आणि ते पंतप्रधानांखेरीज आणखी कुणी जपायचे असते?
म्हाला वंदे मातरम् म्हणण्याचाही अधिकार नाही काय’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला प्रश्न सामान्य आहे की राजकीय? बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी तो राजकीय असल्याचे तात्काळ सांगून टाकले. मायावतींचा अभिप्राय खराही आहे. कारण वंदे मातरम्, जय हिंद किंवा भारत माता की जय अशा घोषणा करायला देशात कायद्याची बंदी नाही आणि त्याविषयीचे कोणते सामाजिक निर्बंधही अस्तित्वात नाहीत. प्रश्न, ‘तसे म्हणण्याच्या’ अधिकाराचा नाहीच. तो आहे ‘तसे म्हणायला लावण्याचा’. प्रभू रामचंद्र की जय असे हिंदूंनी म्हणायचे किंवा अल्ला हो अकबर हे मुसलमानांनी म्हणायचे. इच्छा असेल तर त्या घोषणा दोघांनीही करायच्या किंवा करायच्या नाहीत. प्रश्न आहे, त्या करायला लावण्याची एखाद्यावर सक्ती करण्याचा. प्रश्नाचे हे स्वरूप मोदींनाही कळते. ते बुद्ध्याच तो विचारतात तेव्हा त्यांची नजर राजकारणावर आणि आपल्या हिंदुत्ववादी मतदारांवर असते हे उघड आहे. हा किंवा असा वाद मोदी सत्तेवर येण्याआधी कधी झडला नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळातही अशा वादाला तोंड फुटल्याचे दिसले नाही. आजच हे वाद उभे केले जात असतील आणि खुद्द पंतप्रधानच त्यात भाग घेत असतील तर ते प्रकरण साधे राहात नाही. वंदे मातरम् म्हणायला या देशात कुणी हरकत घेतली आहे?, कायद्याने, न्यायालयांनी, पक्षांनी, जनतेने की समाजाने? प्रत्यक्षात अशी हरकत कुणी घेतली नाही व तशी ती घेण्याचे धाडसही कुणी करणार नाही. वंदे मातरम् ही बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या कादंबरीतील कविता स्वातंत्र्यपूर्व काळातच देशाला प्रेरणा देणारी व त्याच्या लढ्यात कायम गायली जाणारी होती. तिचे महत्त्व आजही तसेच कायम व टवटवीत आहे. प्रश्न, एखादा धर्म त्याच्या धर्मपुरुषाखेरीज वा धार्मिक दैवतांखेरीज इतरांचे पूजन करीत नसेल तर त्याविषयीचा आहे. या देशात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, आदिवासी यासह इतर अनेक धर्मांचे लोक आहेत आणि त्यांची संख्या वीस टक्क्यांहून अधिक असणारी आहे. यातील काहींना त्यांच्या दैवतांखेरीज इतरांच्या दैवतांना किंवा इतरांनी मानलेल्या धर्मस्थानांना वंदन करण्याची इच्छा होत नसेल वा तशी त्यांच्या धर्मश्रद्धांची परवानगी नसेल तर त्यांना त्यांच्या इच्छेनुरूप वागण्याचा हक्क आहे. कोणताही मुसलमान अल्लाखेरीज दुसºया कुणाची प्रार्थना करणार नाही, असे तो समाज म्हणतो. तसाच काहीसा समज ख्रिश्चनांचा होली घोस्टबाबत वा येशूबाबतचाही आहे. या समाजांना, तुम्ही आमची दैवते व पूजास्थाने तुमचीही मानली पाहिजेत, असा आग्रह करणे हा त्यांच्या धर्मस्वातंत्र्यावरचा आघात आहे. तो दैवतांबद्दलचा आहे वा भूमीसारख्या दैवतासारख्या मानलेल्या बाबींविषयीचा आहे, हा प्रश्न मग गौण होतो. कोणत्याही भारतीय माणसाने भारतमातेला वंदन करणे हा त्याच्या राष्ट्रभक्तीचा पुरावा आहे. मात्र त्याच वेळी तसे मानू न देणाºया अन्य धर्मांच्या लोकांविषयी त्याविषयीचा आग्रह न्याय्य ठरणारा नाही. उद्या पाकिस्तानात राहणाºया हिंदूंना त्या देशातील सरकारने जिनांच्या समाधीला वंदन करायला लावले किंवा मशिदीत जाऊन प्रार्थना करणे भाग पाडले तर तो प्रकार भारताला आवडणारा ठरणार आहे काय? साºया युरोपात आणि अमेरिकेत भारतीय लोक फार मोठ्या संख्येने राहतात. मात्र ते देश या भारतीयांना आपल्या धर्मस्थानांना वा पूजास्थानांना भेट देण्याचा आणि तेथे जाऊन प्रार्थना करण्याचा आग्रह धरीत नाहीत. उलट आपल्या देशात ते भारतीयांना व अन्य देशवासीयांना त्यांची स्वतंत्र पूजास्थाने उभी करण्याची अनुमती देतात. यातल्या कोणत्याही देशाने ती पूजास्थाने उद्ध्वस्त केल्याची घटनाही गेल्या १०० वर्षात कधी घडली नाही. या स्थितीत भारतातील मुसलमानांवर अन्य अल्पसंख्याकांवर आम्ही सांगतो त्या धार्मिक स्वरुपाच्या घोषणा तुम्हीही केल्या पाहिजेत, अन्यथा तुम्ही या देशाबाहेर गेले पाहिजे असे म्हणण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाचे अनेक पुढारी कशाच्या आधारे वापरतात? या पुढाºयांना त्यांच्या या अधिकाराबाबत कुणी विचारणा करण्याचे धाडस करीत नाही. कारण त्यांच्या मागे सत्ता उभी आहे आणि ती काय करू शकते ते गेल्या काही काळात तिने घडवून आणलेल्या हिंसाचाराने देशाला दाखविले आहे. तरीही हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याला सरळ उत्तर न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही काय’ असे उत्तर देत असतील तर ते खºया प्रश्नाला बगल देत आहेत आणि आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करताना तो इतरांवर लादण्याच्या त्यांच्या अनुयायांच्या प्रयत्नांना बळ देत आहेत असाच त्याचा अर्थ होतो. मायावतींनी त्याचमुळे त्यांच्या या प्रयत्नाला सियासती किंवा राजकीय म्हटले ते खरे आहे. देश टिकवायचा तर त्यातील बहुसंख्य लोकांसोबतच येथील अल्पसंख्याकांना सोबत घेणे व त्यांच्या श्रद्धांचा घटनेनुसार आदर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तसे केल्यानेच हा देश एकत्र राहू शकणार आहे. देश एकत्र राहणे याचा अर्थ त्याची भौगोलिक अखंडता टिकणे एवढाच होत नाही. त्यातील जनतेत एकात्मतेची भावना असणे हे त्याच्या खºया राष्ट्रीयत्वाचे लक्षण आहे आणि ते पंतप्रधानांखेरीज आणखी कुणी जपायचे असते?