- प्रा. शरद वाघमारे, मालेगावरासायनिक खत फवारणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त येत असून, त्या तुलनेत जमिनीचा कसही कमी होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिके, पालेभाज्या विषजन्य निर्माण झाल्याने हानिकारक ठरत आहे.यावर उपाय म्हणून मालेगाव (जि. नांदेड) येथील भगवान रामजी इंगोले यांनी त्यांच्या शेतात जैविक खत व फवारणी औषधाची निर्मिती केली आहे. इंगोले यांनी रासायनिक खताचा वापर हळदी पिकासाठी टाळला असून, त्यांनी बायोअमृत खत घरच्या घरी तयार केले आहे.हे खत तयार करताना त्यांनी २०० लिटर पाण्याची प्लास्टिक टाकी, १०० किलो गाईचे शेण, गोमूत्र २० लिटर, दोन किलो गूळ, दोन लिटर दूध, २०० ग्राम तूप,दोन किलो चनाडाळ, बुरशी (ट्रायकोडर्मा, मेटरिझम) पाच किलो यांचे मिश्रण १५ दिवस काठीने हलवून केले. महिन्यातून १ किंवा २ वेळेस देता येते. बायोअमृत जीवामृत स्लरी या खतामुळे पिकांवरील करपा, उमनी अळीचा संपूर्ण नायनाट होऊन इतर किडीचाही प्रादुर्भाव कमी होत आहे व यासाठी केवळ १५०० ते २००० हजार रुपये खर्च येतो. शेतकरी भगवान इंगोले यांनी त्यांच्या शेतात ‘दशपाणी अर्क’ हे विविध प्रकारच्या वस्तू व वनस्पतीचे पाणी वापरुन तयार केले आहे. यासाठी त्यांनी २०० लिटर पाण्याची प्लास्टिकची टाकी, हिरव्या मिरच्याचा कुटलेला दोन किलो ठेचा, २ किलो गायीचे शेण, ५ लि. गोमूत्र, दीड ते दोन किलो अद्रक, अर्धा किलो हळद, ५ किलो कडुलिंबाची पाने, तीन किलो धोतºयाची पाने, निरगुडे पाने, प्रत्येकी २ किलो रुचकीची पाने बेशरमाची पाने, कनेरीची पाने, गुळवेल पाने, सीताफळांच्या पानांचे मिश्रण करुन एक महिना ते ड्रममध्ये ठेवले.कापूस व इतर पिकांना २०० मिलीमध्ये १५ लिटर फवारणी होते. इंगोले यांनी तयार केलेल्या दशपाणी अर्कमुळे बोंडअळी, मावा, तुडतुडे, रसशोषणाच्या किडींचा नायनाट होण्यास मदत झाली.
बोंडअळीवर शोधले फवारणी औषध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 5:29 AM