शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

शेतकऱ्यांनी पुन्हा संपावर जाण्यापूर्वी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 4:10 AM

मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढून सुमारे ४० हजार शेतकºयांनी साºया देशाचे लक्ष वेधले होते. किसान सभा या डाव्या पक्षाच्या संघटनेने लॉँग मार्चचे आयोजन केले होते

मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढून सुमारे ४० हजार शेतकºयांनी साºया देशाचे लक्ष वेधले होते. किसान सभा या डाव्या पक्षाच्या संघटनेने लॉँग मार्चचे आयोजन केले होते. महाराष्टÑातील सत्ताधारी आणि डाव्या पक्षांचे जन्मजात हाडवैर असताना लॉँग मार्चचे अभूतपूर्व स्वागत करण्यास सरकारच पुढे सरसावले होते. सविस्तर चर्चा झाली आणि लेखी पत्राद्वारे मागण्या मान्य करून त्या कशा पद्धतीने सोडविल्या जाणार याचा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्यात आला.किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले कोल्हापूरच्या दौºयावर आले असताना त्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी येत्या १ जूनपर्यंत झाली नाही तर पुन्हा लॉँग मार्च नव्हे, तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.लॉँग मार्चवाल्यांच्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देऊन त्यांना परत जाण्याची खास तजबीज केली गेली. आता डॉ.अजित नवले सांगताहेत की, मध्यस्थी करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फसवणूक केली आहे. कर्जमाफीचा नाराही फसवा होता असे सांगून डॉ. नवले यांनी आकडेवारी सादर केली. त्यांच्या मतानुसार सरकारने घोषणा केली होती की, ८९ लाख शेतकºयांचे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येईल. प्रत्यक्षात ४० लाख शेतकºयांचे १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. ही सर्वांत मोठी लबाडी होती.सरकारने हा सर्वांत ऐतिहासिक निर्णय आहे. आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी आहे, असाही दावा केला हाता. डॉ. नवले यांनी सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनाचे पत्र बाहेर काढावे आणि त्यातील प्रत्येक मुद्यावर आपले म्हणणे जनतेसमोर सादर करावे. त्यानंतर संपावर जाण्याचा निर्धार स्पष्ट करावा. लाल वादळ शमलं आहे. त्यामुळे नवले यांच्या सादरीकरणावर सरकारतर्फे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन कसे तुटून पडणार हे एकदा दिसेल.वास्तविक डाव्या पक्षांनी किंवा भाजपवाल्यांनी शेतकºयांच्या मूळ दुखण्यावर कधीच भाष्य केले नाही. निर्णय घेतला नाही. शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे, यासाठी या पक्षांनी जेवढी आंदोलने केली त्यापेक्षा अधिक आंदोलने महागाई कमी करावी, या मागणीसाठी करीत यापूर्वीच्या कॉँग्रेसच्या सरकारवर शेतमालाचे भावे पडतील, याच्या उपाययोजना करण्यासाठी दबाव आणण्याचे राजकारण केले आहे.हा सर्व इतिहास झाला तरी शेतमालाला योग्य भाव मागतानाच महागाई वाढत असल्याची तक्रार करून शेतकºयांच्या मालाचे दरच वारंवार सांगितले गेले. शेतमालाला भाव वाढून किंवा किफायतशीर मिळण्यासाठी त्या उपाययोजना हव्या आहेत, त्यासाठी अधिक आंदोलन छेडली गेली पाहिजेत. त्याचवेळी शेती करण्यासाठी येणाºया खर्चावर नियंत्रण कसे आणता येईल याचा कधी विचार करणार आहोत की नाही? खते, औषधे, बियाणे आणि अवजारे यांचा व्यापार तेजीत आहे. त्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यांची महागाई कमी करा असे कुणीच म्हणत नाही. महाराष्टÑात केवळ द्राक्षे पिकविण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची खते आणि औषधांचा धंदा होत आहे.किफायतशीर भावासाठी उत्पादन खर्चावर नियंत्रण आणणे आणि शेती करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अधिक गुंतवणूक करायला हवी आहे, याचीही जोड द्यावी. मगच संपाचा इशारा द्यावा, अन्यथा प्रश्न सुटणार नाहीत.- वसंत भोसले