शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

पितृपक्ष...मातृपक्ष !

By सचिन जवळकोटे | Published: September 27, 2019 12:25 PM

दे धक्का

- सचिन जवळकोटे

अखिल भारतीय मूषक महासंघाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन भरलेलं. आजकाल गल्लीतल्या कॉलेजच्या वर्गातही जशी राष्ट्रीय परिषद भरविली जाते, तसाच काहीसा हा प्रकार. अकरा दिवसांची मंडपातली ड्यूटी संपवून ह्यबाप्पाह्ण गावी गेल्यामुळं हे सारे उंदीर बांधवही सध्या निवांतच होते. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात आयाराम-गयारामांची वर्दळ वाढल्यानंतर ह्यउंदरांची नाहक बदनामीह्ण सुरू झाल्याचा साक्षात्कार एकाला झालेला. त्यापायी त्यानं पुढाकार घेऊन हे तातडीचं अधिवेशन बोलाविलेलं. दिव्याची वात कुरतडून उद्घाटन सोहळा संपन्न जाहला. संयोजक उंदरानं प्रास्ताविक सुरू केलं, ह्यमूषक बांधवहोऽऽऽ मराठी माणसाच्या घरात वर्षभर आपल्याला झाडूखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र भाद्रपद महिन्यात हीच मंडळी कौतुकानं आपली पूजा करतात. अकरा दिवस आपल्याला नैवेद्यही देतात. तरीही आपल्या जातभाइंर्ची बदनामी करण्याची मोहीम सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू झालीय. धरणं अन् कालव्यातली माती भुसभुशीत करणारे वेगळेच, मात्र त्याचं खापरही आपल्याच डोक्यावर फोडलं जातंय. जहाजातून उड्या मारणाºया उंदरांशी राजकारणातल्या गयारामांचा संबंध जोडून आपल्या भावना नाहक दुखावल्या जाताहेत. तेव्हा आजच्या अधिवेशनात एकमुखानं याचा निषेध करू याऽऽऽ. मग काय, चिऽचीऽऽऽ आवाज करत निषेध नोंदविला गेला. अधिवेशनाचे अध्यक्ष ह्यप्रथम उडीमारे बोलायला उभारले, ह्यजहाजात खालच्या बाजूला आपण बिळं तयार करून ठेवली होती म्हणूनच जहाज बुडू लागलेलं. तेव्हा अधिक बिळं तयार होऊ नयेत म्हणून उंदरांनी जहाज वाचविण्यासाठीच स्वत:चं भवितव्य धोक्यात घातलेलं. खरंतर बुडत्या जहाजातून उडी मारणाºया उंदरांची ही कृती स्वार्थीपणाची नसून उलट त्यागाचंच प्रतीक आहे. ज्याचा तळ आजपावेतो भल्या-भल्यांना समजलेला नाही, अशा अथांग लोटस्ह्ण समुद्रात उडी घेणाºया उंदरांचा उलट गौरवच व्हायला हवा,  तीनशे रुपये देऊन सभेत बसविलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांकडूनही पडल्या नसतील एवढ्या जोरात टाळ्या वाजल्या.

सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या भोजनाचा सोहळा रंगला. काही सिनियर उंदरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली. कारण, जहाजातून उडी मारण्याच्या क्रांतिकारी चळवळीतले ते आद्य पुरुष होते. पुढं काय होणार हे त्यांना इतर बांधवांपेक्षा खूप अगोदर लक्षात येत असतं म्हणे.. म्हणूनच लोकसभावेळी यांनी आपली अदाकारी दाखविलेली. पलीकडं बसलेले दोन गलेलठ्ठ उंदीर कुजबूजत होते, शेतकºयांची साखर खाऊन पोट भलतंच टम्म झालंय बुवा आपलं. आता इकडून-तिकडं उड्या मारायला बायकोनंच सांगितलंय, असं एक जण म्हणताच दुसरा पुटपुटला, ह्यईडीची कागदं चघळल्यानं मलाही कळ लागलेली. तेव्हा कमळाच्या पाकळ्या हुंगण्याचा सल्ला माज्या मित्रांनी दिलाय. एवढ्यात पंगतीतल्या काही उंदरांचं ताट रिकामंच राहिल्याची चर्चा सुरू झाली.

मुंबईच्या वर्षा बंगल्यावर हेलपाटे मारून-मारून थकलेल्या या उंदरांनी एकमेकांकडं मोठ्या केविलवाणेपणाने पाहिलं. गेल्या एक महिन्यापासून आपल्याला विनाकारण खेळवलं जातंय, असंं त्यांना वाटू लागलेला भ्रम आता पक्क्या खात्रीत परावर्तीत झालेला. सा-यांच्याच ताटात तुकडे फेकले गेलेत. मग आपणच उपाशी का? असं एकानं विचारताच दुसरा हळूच कानात कुजबुजला, पितृपक्ष सुरू आहे ना. आपल्या वाट्याचं म्हणे अगोदर कावळ्यांना देणार. तिथं शिल्लक राहिलं तर आपल्याला मिळणार ! हे ऐकताच या अतृप्त उंदरांची चुळबुळ सुरू झाली. ह्यएवढा घातक असेल पितृपक्ष, तर परवडला आपला जुनाच मातृपक्ष, म्हणत पुन्हा आपल्या घरी परतण्याची काही जणांनी तयारी सुरू केली. जय उंदीरऽऽ जय उडीमारे !

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण