- सुरेश भटेवरा(राजक ीय संपादक , लोक मत)१५ आॅगस्टचा स्वातंत्र्यदिन जवळ आला क ी राजधानी दिल्ली सुरक्षेबाबत विशेष सतर्क होते. जागोजागी पोलीस तैनात असतात.प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदी असते. वाहनांची तपासणी केली जाते. संशयास्पदरीतीने हिंडणाऱ्यांना जाब विचारला जातो. राजधानीच्या हाय अलर्टझोनमधे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी हे सारे सोपस्क ार तसे आवश्यक च आहेत. अनेक वर्षांपासून ते चालूच आहेत. तरीही सोमवारी भर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास संसदेजवळच्या रफ ी मार्गावर क ॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर जेएनयुचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. क्लबच्या सभागृहात ‘खौफ से आझादी’ क ार्यक्रम आयोजित क रण्यात आला होता. क ार्यक्रमात अनेक वक्त्यांबरोबर उमर खालिदचेही भाषण होणार होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत अतिसंवेदनशील रफ ी मार्गावर क ाही अज्ञात व्यक्ती अचानक येतात. त्यापैक ी एक ाक डेपिस्तूल असते. उमर खालिदला धक्क ाबुक्क ी केली जाते वत्याच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न होतो.धक्क ाबुक्क ीत खाली पडल्यामुळे उमर सुदैवाने बचावतो. हवेत फ ायरिंग क रताना हल्लेखोराच्या हातून पिस्तूल निसटते, तेतिथेच टाकून तोफ रार होतो. संपूर्णरस्त्यावर जागोजागी पोलिसांचा पहारा, सीसीटीव्ही कॅमेºयांची २४ तास देखरेख, तरीही अवघ्या क ाही मिनिटात भयचकि त क रू न सोडणारी ही घटना घडते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्णक रायला आलेला उमर खालिद तीन वर्षांपूर्वी इतरांसारखाच एक सामान्य विद्यार्थी होता. एके दिवशी त्याने एक क ार्यक्रम आयोजितकेला. त्यात आझादीशी निगडित संदिग्ध स्वरू पाच्या क ाही क थित घोषणा झाल्या. त्याचा एक संदिग्ध अहवाल तयार केला गेला.यानंतर क ाही प्रसार माध्यमांना हाताशी धरू न लगेच त्याला देशातला मोठा खलनायक ठरवण्यात आले. मीडियातल्या केवळ एक ाविशेष गटाचा नव्हेतर पोलीस अन्राजक ीय नेत्यांचाही त्यात मोठा सहभाग होता. असा विचित्र प्रचार घडवण्यात आला क ी उमरखालिद फ रार आहे. दहशतवादी संघटनांशी त्याचे संबंध आहेत आणि बहुदा तो पाकि स्तानात पळून गेला असावा. समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक पेरलेल्या अशा बातम्या केवळ इक डून-तिक डून प्रसृत होत नव्हत्या तर गृहमंत्र्यांच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरू नही उमरला देशद्रोही संबोधण्यात आलेअन् त्याला अटक ही क रण्यात आली.क ालांतराने असा शोध लागला क ी, धार्मिक क ट्टरतेशी उमरचा क ोणताही संबंध नाही. त्याच्यावर क रण्यात आलेले बहुतांश आरोपक ाल्पनिक स्वरू पाचे अन् मुस्लिमविरोधी पूर्वग्रहांनी प्रेरित आहेत. उमर खालिद व त्याच्या क ार्यक्रमात क थित घोषणा देणाºयाक ाही विद्यार्थ्यांवर जेएनयु प्रशासनाने जे क ारवाई सत्र सुरू केले होते, न्यायालयाने त्यावर स्थगिती आदेश बजावला. पोलीसक ारवाईदेखील आजतागायत अर्धवट अवस्थेत आहे. उमरला देशद्रोही ठरवण्यासाठी दाखल केलेल्या गुन्ह्याचेक ोणतेही आरोपपत्र(चार्जशीट) न्यायालयात दाखल झाल्याचे ऐक ीवात नाही. गुन्हा खरोखर घडला असेल तर त्याची रीतसर चौक शी हवी अन्त्याच्या निवाड्याचे क ाम न्यायालयावर सोपवले पाहिजे. अलीक डेमात्र रस्तोरस्ती स्वयंघोषित संस्कृती रक्षक ांची न्यायालये क ायदा हातातघेतात व कुणालाही झटपट शिक्षा देऊ न मोक ळेहोतात. गेल्या तीन वर्षांत केवळ उमर खालिदच नव्हे तर विद्यार्थीसंघाचा अध्यक्ष क न्हैय्याकुमार आणि साºया जेएनयुलाच अशाप्रक ारेदेशद्रोही ठरवण्याचा घाट घातला गेला. उमर खालिदने आपल्या पीएच.डी.प्रबंधासाठी ‘झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यात, सन १८०० ते २००० या क ालखंडात, विविध राज्यक र्ते व शासक ांनी राबवलेल्या जुलमीक ायद्यांच्या आधारे सामान्य लोक ांच्या हक्क ांवर क शी गदा आली, हा विषय निवडला होता. जुलै२०१८ मध्ये त्याचा प्रबंध दाखल क रू न घेण्यासही जेएनयु प्रशासनाने सुरु वातीला टाळाटाळ चालवली होती. असे म्हणतात, त्याचा प्रबंध एव्हाना दाखल झालाआहे. जेएनयु विद्यार्थी संघाचा अध्यक्ष क न्हैय्याकुमारदेखील न्यायालयात उपस्थित राहायला गेला तेव्हा त्यालाही न्यायालयाच्याआवारातच मारहाण झाली; मात्र आजवर या हल्लेखोरांवरही क ोणतीही क ारवाईझाल्याचे ऐक ीवात नाही. क ॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर हाय सिक्युरिटी झोनमधे उमरवर हल्ला चढवण्याचे धाडस नेमके कुणी केले, त्या आरोपींना शोधण्याचेक ाम पोलिसांचे आहे.मात्र ‘खौफ से आझादी’ क ार्यक्रमात उमर भाषण क रायला आला होता, त्याच्या अथवा क न्हैय्याकुमारच्या भाषणांचा मानसिक त्रासनेमक ा कुणाला होऊ शक तो, याची सर्वांनाच क ल्पना आहे.उमर खालिदने२०१६ साली पोलिसांक डे सुरक्षेची मागणी केली. ती त्याला मिळाली नाही. दोन महिन्यांपूर्वी पुन्हा त्याला धमक ीदिली गेली तेव्हा वसंत कुंज पोलीस ठाण्यात त्याने तक्रार नोंदवली. पुन्हा एक दा सुरक्षेची मागणी के ली, तरीही त्याला ती मिळालीनाही. विशेष म्हणजे१० फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयुप्रक रणी क ाही अज्ञात लोक ांविरु द्ध तक्रार नोंदवली गेली. तेव्हापासून आॅगस्ट२०१८ पर्यंत क ोणतेही आरोपपत्र न्यायालयात दाखल झालेलेनाही. थोडक्यात घटनेबाबत ना आरोप आहेत ना पुरावे. तरीही क ाही प्रसार माध्यमांद्वारेउमर खालिद अन्क न्हैय्याकुमारचे व्यक्तिमत्त्व अशा तºहेने रंगवण्यात आलेक ी,देशातल्या साºया समस्यांचे मूळ जणूहे दोन विद्यार्थी अन् त्यांचे जेएनयुतील समर्थक च आहेत.जेएनयुच्या प्रांगणात विविध विचारसरणीच्या घोषणा क ाही नव्या नाहीत. उमरच्या क ार्यक्रमात आझादीच्या घोषणा दिल्या गेल्या. आझादी कुणाची? ती कुणापासून हवी आहे, याबाबत वाद आहे. एक ा उजव्या विचारसरणीच्या गटाने (जेएनयुमध्ये ज्यांना फ ारसे समर्थन क धीच मिळाले नाही) त्यांनी प्रशासनाला हाताशी धरू न या विद्यापीठाला राजक ीय लढाईची रणभूमी बनवून टाक ले. एक प्रश्न या गटाक डून वारंवार विचारला गेला क ी, देशाचे तुक डे क रण्यास उत्तेजन देणाºया घोषणा जर कुणी दिल्या तर घोषणा देणाºयांच्या विरोधात क ाय केले पाहिजे? उपराष्ट्रपतिपदी विराजमान व्यंक य्या नायडू जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा त्यांनी लोक सभेतच विचारले क ी, अमेरिकेतल्या क ोणत्याही विद्यापीठाने ओसामा बिन लादेनचा स्मृतिदिन साजरा क रण्याची परवानगी दिली असती क ाय?नायडूंच्या विधानाचे अमेरिकेतल्या प्रसिद्ध प्रिन्सटन विद्यापीठाच्या अध्यक्षानेउत्तर दिले क ी, ‘होय आम्ही अशी परवानगी दिली असती’. याचे महत्त्वाचेक ारण विद्यापीठ ही अशी जागा आहेक ी विद्यार्थीइथे चांगल्या अन् वाईट साºयाच गोष्टींचे खुलेपणाने आदान-प्रदान क रू शक तात. भलेही त्यांच्याशी कुणी सहमत असोक ी नसो, मात्र त्यामुळेतेगुन्हेगार नक्क ीच ठरत नाहीत. त्यांचे समज-गैरसमज दूर क रण्याचा प्रयत्न आपण अवश्य क रू शक तो; मात्र धमक्या, हिंसक हल्लेहेक ाही त्याचेउत्तर होऊ शक त नाही. दुर्दैवाने लोक शाहीच्या या अलौकि क सूत्रावरच वारंवार हल्ला चढवला जातोय. ७२ व्या स्वातंत्र्यदिनी परस्परांना शुभेच्छा देताना, स्वातंत्र्यातील भीतीचे व आत्मकेंद्रित अहंक ाराचे हे दुष्टपर्व लवक रात लवक र संपुष्टात येवो, हीच सदिच्छा!
स्वातंत्र्यातील भीतीचे दुष्टपर्व लवकरच संपुष्टात येवो!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:25 AM