शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

कोरोनामुळे येणारे आर्थिक पंगुत्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 1:30 PM

मनुष्याचे जीवन आणि पैसा यात निवड करायची वेळ येते तेव्हा जीवन हेच महत्त्वाचे ठरते..

ठळक मुद्दे देशातील बड्या कंपन्या बंद पडणार नाहीत; पण त्यांचे उत्पादन मंदावेलअर्थचक्राला गती देणारे निर्णय मोदींना घेणे भाग

प्रशांत दीक्षित- कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय अन्य राष्ट्रांप्रमाणे भारताने आचरणात आणला. प्रत्येक देशाने आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली. भारताचा लॉकडाऊन हा सर्वात कठोर आणि कडक आहे, असे जगात म्हटले जाते. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे; मात्र लॉकडाऊनमुळे भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींवर दिलासा देण्यात भारत शेवटच्या स्थानी आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नाही. कठोर लॉकडाऊनमुळे भारतातील बाधितांची संख्या मर्यादेत राहिली. ती पुरेशी मर्यादित न राहिल्यामुळे आता लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रासह काही राज्यांनी घेतला आहे. आजच्या भाषणात मोदींनी तसाच निर्णय घेत लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आता आणखी दोन आठवड्यांनी वाढेल. या पाच आठवड्यांच्या टाळेबंदीची आर्थिक किंमत देण्याची देशाची क्षमता आहे काय, हा प्रश्न आहे.मनुष्याचे जीवन आणि पैसा यात निवड करायची वेळ येते तेव्हा जीवन हेच महत्त्वाचे ठरते. परंतु, नागरिकांचे जीवन सुरक्षित राखताना देशातील आर्थिक व्यवहारही निदान काही प्रमाणात सुरू ठेवावे लागतात. आर्थिक व्यवहार ठप्प झाले, तर त्याची झळ पुढील काळात बसते आणि ती झळ गरिबांनाच सोसावी लागते.लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम काय असतील, याचा विचार अर्थविषयक नियतकालिकांतून सुरू झाला आहे आणि उद्योगक्षेत्रातील संस्थाही आकडेवारी प्रसिद्ध करीत आहेत. सीआयआयने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुढील काळात १५ ते ३० टक्के नोकºया कमी होतील. देशातील बेरोजगारांची संख्या मार्चमध्ये ८ टक्क्यांहून अधिक होती. लॉकडाऊनमध्ये ती २३ टक्क्यांवर पोहोचली. असंघटित क्षेत्रात ८० टक्क्यांहून अधिक कामगार काम करतात. त्यांचा पगार वा नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. श्यामल मुजुमदार यांनी बिझिनेस स्टँडर्डमध्ये आणखी तपशील दिला आहे. लॉकडाऊन जर उद्या (१४ एप्रिल) संपला, तर १०० टक्के ताकदीने व्यवसाय सुरू करण्यास सप्टेंबर महिना उजाडेल. म्हणजे गणपतीनंतर अर्थव्यवस्था लॉकडाऊनपूर्वीच्या स्तरावर येईल. आता लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे व्यवसाय पूर्ण क्षमतेने काम करू लागण्यास नोव्हेंबर महिना उजाडेल. १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढला, तर व्यवसाय धडपणे चालविण्यास पुढील वर्ष उजाडावे लागेल.रोजंदारीवरील कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगार एक तर गावाला गेले आहेत किंवा जे शहरात अडकले आहेत ते गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊन उठल्यावर अन्य राज्यांत गेलेले कामगार त्वरित शहरात कामाला येण्याची शक्यता नाही आणि शहरातील कामगार शहरात थांबण्याची शक्यता नाही. यामुळे अनेक लहानमोठ्या उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई जाणवले. मनुष्यबळ मिळणार नाही वा अतिशय महाग मिळेल. याचा परिणाम कंपन्यांच्या ताळेबंदावर होईल. याशिवाय, जेव्हा एखादा व्यवसाय मंदावतो तेव्हा त्याच्याशी संबंधित असलेले अन्य व्यवसायही मंदावतात. ती साखळी असते. देशातील बड्या कंपन्या बंद पडणार नाहीत; पण त्यांचे उत्पादन मंदावेल. याचा फटका त्या कंपन्यांवर अवलंबून असणाºया लहान उद्योगांना बसेल. या लहान उद्योगांवर अवलंबून असणारे आणखी छोटे उद्योग मग बंदच पडतील. कोणाचे पगार कापू नयेत, असे सरकारने म्हटले असले तरी धंदा नसताना कामगारांना पगार देणे लहान उद्योगांना परवडणारे नसते. ‘स्वराज’ मासिकाचे संपादक आर जगन्नाथन यांनी म्हटल्याप्रमाणे बिझनेस व्हेंटिलेटरवर चालविता येत नाहीत. जगन्नाथन यांनी आणखी एक मुद्दा मांडला आहे. लॉकडाऊनसारख्या जनजीवन ठप्प करणाऱ्या आपत्ती येतात तेव्हा लोक यंत्राकडे अधिक वळतात. वर्क फ्रॉम होम जसे सुरू होते तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे लोक घरातही यंत्राचा अधिक उपयोग सुरू करतात. लॉकडाऊननंतर मध्यमवर्गाचे पगार कमी झाले, की घरातील कामासाठी यंत्राचा अधिक वापर होण्याची शक्यता आहे. याचा फटका घरकाम करणाऱ्या असंख्य महिलांना बसू शकतो.असे अनेक प्रश्न लॉकडाऊन वाढविल्याने समोर येणार आहेत. गरिबांच्या खात्यात पैसा टाकून हे प्रश्न सुटणारे नाहीत. कारण मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग व उद्योगक्षेत्र यांचाही विचार सरकारला करावा लागेल. रोजगार बुडाला, पगार कमी झाला तर त्याचा परिणाम खरेदीवर होईल. खरेदी थांबली, की अर्थव्यवस्था मंदावत जाईल.हे धोके लक्षात घेऊन थोड्या प्रमाणात का होईना, अर्थचक्राला गती देणारे निर्णय मोदींना घेणे भाग आहे. मुख्यमंत्र्यांसमोर ते प्रश्न नाहीत. केंद्र सरकारकडे बोट दाखवून त्यांना स्वस्थ बसता येईल. अर्थव्यवस्थेस चालना देणे मुख्यत: केंद्राचेच काम आहे. गरिबी व करोना यांच्या कैचीत भारत सापडला आहे. हा पेच चीन, अमेरिका वा युरोपसमोर नाही. त्यांच्याकडे पैसा, नवे तंत्रज्ञान आहे. लोक बरे झाले, की नवे तंत्रज्ञान घेऊन ते बाजारपेठ उभी करू शकतात. भारताकडे ती क्षमतानाही.३ आठवड्यांच्या लॉकडाऊनचे सुपरिणाम आपल्याला दिसले. कोरोनाचे रुग्ण कमी झाले नसले तरी वाढ नियंत्रित राहिली. लॉकडाऊन हे औषध होते. प्रत्येक औषधाचे साईट इफेक्ट असतात. ते दूर करण्यासाठी डॉक्टरांना वेगळे उपचार करावे लागतात. लॉक डाऊनचे साईड इफेक्ट दूर करण्यास सरकार काय करणार, याची दिशा मोदींच्या उद्याच्या भाषणातून अपेक्षित आहे. उद्याच्या भाषणात वक्तृत्वशैलीपेक्षा आर्थिक धोरणाची दिशा असेल, ही अपेक्षा.                                                                                  (लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय