शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

आधी वंदू तूज मोरया - आज पाहुया अथर्वशीर्षाचा मराठीतला अर्थ

By दा. कृ. सोमण | Published: August 30, 2017 7:00 AM

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया. हे  देवहो, आम्हाला  कानांनी  शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगले पाहावयास मिळो. सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवाने ( निसर्गाने ) दिलेले आयुष्य देवाच्या ( निसर्गाच्या ) स्तवनात व्यतीत होवो.

ठळक मुद्देसुलभ भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक अथर्वशीर्षाचे पठण केले की बुद्धी आणि मन स्थिर होते अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते.स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेले काम हे नेहमी यशस्वी होते.

आज उत्तर रात्री १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात आहे. त्यामुळे आज ज्येष्ठगौरी पूजन करावयाचे आहे गौरीईला भोजन कुलाचाराप्रमाणे दिले जाते. काही कुलाचाराप्रमाणे गौराईला शंभर भाज्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. घरची गृहिणी या ' देवी गौराई ' बरोबर माहेरी आलेल्या ' घरच्या गौरीच्या ' आवडत्या पदार्थांचाही बेत करते. हा दिवस खूप गोड असतो. माता आणि कन्या यांचे नाते तसे शब्दात वर्णन करणे मला जमणारच नाही. लोकमतच्या वाचक असलेल्या असंख्य माता आणि कन्याच ते जाणू शकतील. आपल्या कन्येच्या मताप्रमाणे सर्व गोष्टी व्हाव्यात यासाठी प्रत्येक माता खूप कष्ट करीत असते. प्रत्येक कन्या ही आपल्या आई जवळच सर्व सुख- दु:खाच्या गोष्टी मोकळेपणाने उघड करीत असते आणि आपल्या आईचा सल्ला हाच प्रत्येक लेकीला खूप महत्वाचा असतो. म्हणून गौराईच्या पूजेचा दिवस दोघींसाठी खप जिव्हाळ्याचा असतो, महत्वाचा असतो.       गणपतीची स्थापना होऊन आजचा सहावा दिवस आहे. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटींमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणून आज आपण श्रीगणेशाला प्रिय असणार्या अथर्वशीर्षाबद्दल माहिती करून घेणार आहोत. अथर्वशीर्ष -- थर्व म्हणजे  हलणारे आणि अथर्व म्हणजे ' न हलणारे शीर्षम् ' ! सुलभ भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक ! अथर्वशीर्षाचे पठण केले की बुद्धी आणि मन स्थिर होते अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेले काम हे नेहमी यशस्वी होते. आत्मविश्वास वाढू लागतो माणूस नम्र होतो. असा माणूस मग अडचणींमध्येही संधी शोधू लागतो अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते. आपण नेहमी पाहतो की जीवनात यशस्वी होणारी माणसे ही नेहमी अडचणींमध्ये संधी शोधणारी असतात आणि जीवनात नेहमी अयशस्वी होणारी माणसे ही संधी आली असतांना अडचणी सांगत बसतात. अथर्वशीर्ष पठणामुळे मन एकाग्र होते. त्यामुळे असे हे कदाचित घडत असेल.          आपल्या मनाची ताकद वाढविणे हे आपल्याच हातात असते. माणसाचे मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर मात करू शकतो. मन स्थिर असेल तर आपण ते वर्तमानात ठेवून प्रत्येक काम करू शकतो. बर्याच लोकांचे मन हे काम करतांना वर्तमान काळात राहत नाही. नेहमी रस्ता नीटपणे ओलांडणारा माणूस जर त्याचे मन वर्तमान काळात नसेल तर रस्ता ओलांडताना समोरहून येणारे वाहन त्याला दिसत नाही आणि अपघात घडतो. नेहमी मन वर्तमान काळात आणि स्थिर असणं आवश्यक असतं . बर्याचवेळा माणसाचे शरीर वर्तमानकाळात असले तरी मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात विहार करीत असते. मन भूतकाळात असले तर सारख्या दु:खद घटना आठवत राहतात. आणि मन भविष्यकाळात असले तर चिंता भेडसावू लागतात. आपले शरीर असते वर्तमान काळात , पण मनाला भूतकाळातील दु:खाचे आणि भविष्यकाळातील चिंतेचे ओझे सांभाळण्याचा प्रयत्न करावा लागतो. मग माणसाच्या हातून होणारे काम हे नीट होत नाही. म्हणून बुद्धी आणि मन हे स्थिर राहणे गरजेचे असते . हे काम अथर्वशीर्ष पठणाने साध्य होते असे गणेश उपासकांचे मत आहे. अथर्वशीर्षाचा पाठ एकदा, अकरा वेळा, एकवीस वेळा किंवा एक सहस्र वेळा केला जातो. तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे का ? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही. तुम्ही श्रद्धाळू असाल तर माझे हे म्हणणे तुम्हाला नक्कीच पटेल .           जर तुम्ही श्रद्धाळू नसाल , आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग ! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहा शक्तीच आहे, असे म्हटले आहे. हा निसर्ग म्हणजेच ईश्वर  हे म्हणणे तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल. या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणतां येईल.                                            अथर्वशीर्षाचा अर्थ        मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया.           "   हे  देवहो, आम्हाला  कानांनी  शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगले पाहावयास मिळो. सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवाने ( निसर्गाने ) दिलेले आयुष्य देवाच्या ( निसर्गाच्या ) स्तवनात व्यतीत होवो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचे रक्षण करतो. ज्ञानवान सूर्य आमचे कल्याण करतो. संकटांचा नाश करणारा गरूड आमचे कल्याण करतो. बृहस्पती आमचे कल्याण करतो. सर्वत्र शांती नांदो . ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो. तूच  ब्रह्मतत्त्व आहेस. तूच सकलांचा कर्ता ( निर्माता ) आहेस.तूच सृष्टीचे धारण करणारा ( पोषण करणारा ) आहेस. तूच ( सृष्टीचा) संहार करणाराही  आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस. तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. मी योग्य ( तेच) बोलतो, मी खरे ( तेच) बोलतो. तू माझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणार्या माझे तू रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणार्या माझे तू रक्षण कर. ( दान ) देणार्या ( अशा) माझे तू रक्षण कर. उत्पादक ( अशा ) माझे तू रक्षण कर. ( तुझी) उपासना करणार्या शिष्याचे रक्षण कर.          माझे पश्चिमेकडून रक्षण कर. माझे पूर्वेकडून रक्षण कर. माझे उत्तरेकडून रक्षण कर. माझे दक्षिणेकडून रक्षण कर. माझे वरून रक्षण कर. माझे खालून रक्षण कर. सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू माझे रक्षण कर. तू वेदादी वाड्.मय आहेस. तू चैतन्यस्वरूप आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू सत् , चित् , आनंदस्वरूप ! अद्वितीय आहेस. तू साक्षात ब्रह्म आहेस. तू ज्ञानविज्ञानमय आहेस.          हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होते. हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर राहते. हे सर्व जग तुझ्यातच लय पावते. हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होते. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस. तसेच   ( परा,पश्यन्ती , मध्यमा आणि वैखरी या ) चार वाणी तूच आहेस. तू ( सत्त्व, रज आणि तम या ) तीन गुणांपलीकडचा आहेस. तू ( स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या ) तीन देहांपलीकडचा आहेस. तू ( भूत, वर्तमान आणि भविष्य या ) तीनही काळांच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस.         तू ( उत्पत्ती , स्थिती आणि लय या ) तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस. योगी लोक नेहमी तुझे ध्यान करतात. तूच ब्रह्मा,तूच विष्णू,तूच रुद्र, तूच इंद्र,तूच भूलोक,तूच भुवर्लोक,तूच स्वर्लोक आणि ॐ ( हे सर्व ) तूच आहेस. गण शब्दातील आदि ' ग् ' प्रथम उच्चारून नंतर 'अ 'चा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. तो तारक मंत्राने ( ॐ काराने ) युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र 'ॐगॅं ' असा होतो.        हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. 'ग्' हे मंत्राचे पूर्व रूप आहे. ' अ' हा मंत्राचा मध्य आहे. अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. या ( गकारादी ) चारांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. ती ही गणेशविद्या होय. या मंत्राचे ऋषी ' गणक ' हे होत.  ' निचृद् गायत्री ' हा या मंत्राचा छंद होय. गणपती ही देवता आहे. 'ॐ गॅं ' ह्या मंत्ररूपाने दर्शविल्या जाणार्या गणेशाला माझा नमस्कार असो.        आम्ही त्या एकदंताला जाणतो. त्या वक्रतुण्डाचे ध्यान करतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देवो. ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले तीन हात, आणि वर देण्यासाठी चौथा हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे, कान सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, अंगोला लाल चंदन लावले आहे, ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला, अशा गणेशाचे जो ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय. व्रतधारिणांच्या प्रमुखांना ( व्रातपतीस ) नमस्कार असो. देवसमुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो, शंकरगणसमुदायाच्याअधिपतीला ( प्रमथपति ) नमस्कार असो. लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी, शिवपुत्र, वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो.        हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला तरी त्या रचनाकराच्या बुद्धिमत्तेचे आश्चर्य वाटते आणि श्रीगणेशाच्या बरोबरच त्यालाही नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणे आदराने जोडले जातात.(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com )

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव