शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

सौभाग्यवती स्पेशल मेनू

By सचिन जवळकोटे | Published: March 08, 2018 12:35 AM

आज जागतिक महिला दिन. म्हटलं घरात केक-बिक कापावा; म्हणजे बायकोला खूश करण्याच्या एक हजार प्रयोगांपैकी किमान हा तरी सक्सेस होईल. तसं तर, बहुतांश मंडळींच्या संसारात म्हणे रोजच ‘महिला दिन’ अन् ‘पुरुष दीन’. आता हे कुठं बोलायचीही मला सोय नाही... अन् तुम्हीसुद्धा यावर जाहीररीत्या प्रतिक्रिया देण्याचं धाडसही करणार नाही.

आज जागतिक महिला दिन. म्हटलं घरात केक-बिक कापावा; म्हणजे बायकोला खूश करण्याच्या एक हजार प्रयोगांपैकी किमान हा तरी सक्सेस होईल. तसं तर, बहुतांश मंडळींच्या संसारात म्हणे रोजच ‘महिला दिन’ अन् ‘पुरुष दीन’. आता हे कुठं बोलायचीही मला सोय नाही... अन् तुम्हीसुद्धा यावर जाहीररीत्या प्रतिक्रिया देण्याचं धाडसही करणार नाही.असो... मी आदरणीय सौभाग्यवतींना विचारलं, ‘स्वयंपाकात आज काय विशेष करणार ?’ किचनमध्ये जात ती उत्तरली, ‘तुम्ही म्हणाल ते... सांगा काय करू?’‘ईस्टकडचा एखादा अ‍ॅटम करशील का बघ. नाही तरी आजकाल पूर्वेचीच चलती सुरू झालीय सगळीकडं...’ मी आपलं पेपरातल्या हेडलाईनवरून नजर फिरवत बोलून गेलो. आतून एकदम भक्कऽऽकन गॅस पेटविल्याचा आवाज आला. ध्यानी-मनी नसताना अकस्मात लेनीनचा पुतळा पाडल्यासारखा. मी दचकलो.आतून उत्तर आलं, ‘तिकडची चायनीज स्टाईल मंच्युरियन तर काल तुमच्या मित्रानं आणली होती की. त्रिपुरातल्या मराठी माणसाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी. दुसरं काही तरी सांगा. बोला काय करू?’‘घरात बायको म्हणेल तीच पूर्व दिशा,’ हे ठाऊक असल्यानं मी बिचारा पामर गपगुमानं दक्षिणेकडं वळलो, ‘मग एखादी साऊथ इंडियन डिश कर. नाही तरी दिवसभर टीव्हीवर ‘अब कर्नाटक की बारी है...’ ऐकून-ऐकून मलाही तिकडच्या पदार्थाची उत्सुकता वाटू लागलीय,’ पान उलटत मी बोललो.गॅसवर जोरात भांडं ठेवल्याचा आवाज आतून आला. रजनीकांतही एवढ्या जोरात कधी ‘एन्ना रास्कलाऽऽ... मार्इंड ईट!’ म्हणाला नसेल किंवा कमल हसनही कधी एवढ्या जोरात नाचला नसेल.‘पण मी काय म्हणते... साऊथचा मसाला भलताच किचकट अन् गोंधळाचा. नेहमीची स्टाईल तिकडं वापरून चालत नाही. चुकून ठसका लागला तर तोंड पोळून निघायचं. दुसरं काहीतरी सांगा. बोला काय करू?’पुढचं पान उघडत मी उत्तरेच्या स्वारीची इच्छा व्यक्त केली, ‘मग नॉर्थकडचा एखादा चमचमीत अ‍ॅटम बनव. सध्या दिल्लीत मोठ्या चवीनं खाल्ला जाणारा गुजराथी खमंग ढोकळा बनव... किंवा फाफडा-जिलेबी करतेस का बघ.’ एवढ्यात आतमध्ये फोडणीचा जोरात बार उडाला. आपलं काही चुकलं की काय, या शंकेनं दचकून मी तिखट वासामागच्या कारणाचा शोध नाकानंच घ्यायचा केविलवाणा प्रयत्नही केला.‘मेलं मराठी माणसाचं लक्षणच खोटंऽऽ त्या फाफडा-ढोकळ्याच्या नादापायी इथं हक्काची भाकर मिळायची मारामार झालीय. दुसरं काहीतरी सांगा हो. बोला काय करू?’आता मात्र पेपरची घडी करून मी हळूच विचारलं, ‘मग आपला मुंबई स्टाईलचा वडापाव बनवतेस का? आवडेल आपल्या दोघांनाही ही वेस्टर्न डिश!’ आतून पुन्हा जोरात आवाज आला. अगदी ‘आव्वाजऽऽ कुणाचाऽऽ’ अशी घोषणा देणाºयासारखा खच्चून... ‘मुंबई’चं नाव काढताच बहुधा आत ‘भांड्यावर भांडं’ आदळलं असावं.‘आयुष्यभर शिव वडापाववरच पोट भरणार आहात की काय? जरा चांगली काहीतरी अपेक्षा करा कीऽऽ सांगा लवकर... बोला काय करू?’ 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Womenमहिला