- डॉ. गोविंद काळेकाजूबिया भाजायला घेतल्या, पत्र्याला भोके पाडून तीन विटा लावून मोठा जाळ केला़ काजूला डिंक फ ाऱ थोड्या भाजल्या गेल्या़ बाकी कच्च्या आणि उरलेल्या करपलेल्या़ हाताला खोबरेल लावून सुद्धा डिंक खूपच लागला़ आजोबांचा हा बिया भाजण्याचा प्रयोग नातवंडांनी मोठ्या उत्साहाने अनुभवला़ तीन दिवसांनी तळहाताच्या बोटांची पातळ साले जाऊ लागली़ हा होता डिंकाचा परिणाम़ माझा हा पहिलाच अनुभव़ एकदा तर वाटले हातावरच्या नाजूक रेषा निघून तर जाणार नाहीत ना़हाताकडून सर्व काम करून घ्यायचे पण त्या हातांकडे, बोटाकडे पाहायला वेळच मिळाला नाही़ नखे काढताना हात पालथा़ कशाला कोण तळहातीच्या रेषा निरखणार? खरे तर! शरीराच्या कोणत्याच अवयवांकडे आपले लक्ष जात नाही, जोपर्यंत तो अवयव दुखरा होत नाही़ तळहाताच्या नाजूक रेषांचे दर्शन लहानपणी मात्र रोजच होई़ कारण घरचा दंडक झोपेतून उठले की प्रात:स्मरण म्हणावे लागे़‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वति।करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्॥लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंदाचे अस्तित्व तर आपल्या तळहातावरच आहे़ नाजूक रेषांनी जपले आहे सारे़ म्हणून तर उठल्या उठल्या करदर्शऩ तसा तळ हात कुणाला दाखविला नाही परंतु तिसरी ते चौथी अशा शालेय जीवनाच्या दोन वर्षांत माझा तळहात जास्तीतजास्त कुणी पाहिला असेल तर तो वर्गमास्तरांनी़ चूक झाली रे झाली की ‘हात पुढे कर’ हे दोनच शब्द कठोर आवाजात ऐकू यायचे. नंतर मात्र तळहात लालेलाल़ असे कराचे दर्शन मात्र दोन वर्षे घेतले़ मग तळहाताच्या नाजूक रेषांचे नाजूकपण उरणार कसे? ‘तळहाताच्या नाजूक रेषा / कुणी गोंदाव्या कुणी पुसाव्या’ असे बाळकृष्ण महाराज मर्ढेकर लिहिते झाले़ आमची जात पोराची त्यामुळे हाताला मेंदी लागणे फार क्वचित वाट्याला आले़ त्यातही तळहाताच्या रेषांपेक्षा मेंदीच्या रेषांचेच कौतुक फ ार होई़अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते/निर्माते आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रांमधून मात्र तळहात बऱ्याच वेळा भेटीला आला़ आचार्यांची स्तोत्रगंगा म्हणजे अक्षय वाङ्मय़ परा विद्येचे दर्शन घडविणारे़ ‘करतलभिक्षा तरूतलवास:’ तळहातावर पडेल/मिळेल तेवढी भिक्षा आणि तरूतळी निवास हे संन्याशाचे सुख आचार्यांनी अवघ्याच शब्दांत मांडले आहे़ विश्वाकडे अलिप्तपणे पाहता आले पाहिजे़ ‘करकमलतल अमलक् वत्’ हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे पाहता आले पाहिजे़
तळहाताच्या नाजूक रेषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:10 AM