शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

फ्रान्सची निवडणूक ठरवेल जगाच्या वाटचालीची दिशा

By admin | Published: March 08, 2017 2:52 AM

फ्रान्समध्ये एप्रिलमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यापाठोपाठ जर्मनीत निवडणुका होणार आहेत. ब्रिटनमधले सार्वमत आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतरची

- प्रा. दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)फ्रान्समध्ये एप्रिलमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यापाठोपाठ जर्मनीत निवडणुका होणार आहेत. ब्रिटनमधले सार्वमत आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतरची ही निवडणूकसुद्धा महत्त्वाची असणार आहे. पुढच्या काळात जगाची वाटचालीची दिशा या निवडणुकीने समजू शकेल. आत्तापर्यंत जी चिन्हे दिसायला लागलेली आहेत ती फारशी उत्साहवर्धक म्हणता येणारी नाहीत. युरोपियन युनियनपासून अलग होण्याचा पुरस्कार करणारे ब्रेक्झिट असो, की अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन हा नारा देत राष्ट्राध्यक्ष झालेले ट्रम्प असोत.. या दोन्ही निवडणुकांनी जग अधिकाधिक जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारचा संकुचित आणि स्वयंकेंद्रित विचारप्रणाली जगभरात अधिक प्रभावी होते आहे हे दाखवून आहे. एका बाजूने इसिसच्या रूपाने अतिरेकी दहशतवाद्यांचे वाढते संकट आणि दुसऱ्या बाजूने उद्योग आणि व्यापारातली जागतिक स्तरावरची मंदी यामध्ये सापडलेल्या जगासाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. या दोन्ही निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. फ्रान्समधल्या निवडणुका पुढच्याच महिन्यात आहेत. त्यावर विविध प्रसारमाध्यमांमधून बरीच चर्चा होते आहे. इसिसशी मुकाबला करण्यात फ्रान्स आघाडीवर आहे. त्याची जबर किंमतदेखील त्याने चुकवलेली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर लगेचच फ्रान्समधल्या उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंटच्या नेत्या मरिन ली पेन यांनी आपणच पुढील अध्यक्ष होणार असे घोषित केले होते. त्यांचा स्थलांतरितांना, युरोपियन युनियन, तसेच इसिसला असलेला विरोध सध्या त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरतो आहे. तसं घडल्यास फ्रान्सही नव्या वळणावर येऊन उभा राहणार आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीत रशियाने ढवळाढवळ केली होती, असा आरोप होतो आहे आणि त्याची रितसर चौकशीदेखील केली जाते आहे. रशिया फ्रान्सच्या निवडणुकीतदेखील हस्तक्षेप करतो आहे, असा आरोप व्हायला लागलेला आहे. स्काय न्यूजच्या संकेतस्थळावर त्याबद्दलचे मार्क स्टोन यांचे वार्तापत्र वाचायला मिळते आहे. आपल्या विरोधात टीकेचा भडिमार होणे, खोट्यानाट्या बातम्या दिल्या जाणे आणि हॅकिंगच्या द्वारे आपल्या प्रचारात हस्तक्षेप केला जाणे यासारख्या प्रकारांच्या पाठीमागे रशिया असल्याचा आरोप इमानोल मारक्वाँ यांनी केलेला आहे. मारक्वाँ हे सध्या या निवडणुकीत आघाडीवर आहेत हे लक्षात घेतले आणि अमेरिकेत जे झाले त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर या आरोपांमधले गांभीर्य कुणाच्याही लक्षात येईल. रशिया टुडे आणि स्पुटनिक न्यूजवर त्यांनी स्पष्टपणाने आरोप केलेले आहेत. ली पेन यांना पुतीन यांचे अप्रत्यक्ष सहाय्य मिळते आहे, असा आरोप केला जातो आहे. म्हणजे फ्रान्समध्येदेखील अमेरिकन निवडणुकांची पुनरावृत्तीच होण्याची शक्यता नजरेआड करता येणार नाही. डेली एक्स्प्रेसमध्ये ली पेन यांनी पुतीन यांची तरफदारी करीत त्यांची बाजू उचलून धरल्याची बातमी प्रकाशित झाली आहे. जुन्या काळातल्या शीतयुद्धाची मानसिकता अजूनही युरोप बाळगतो आहे असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. एकूणच ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या भूमिका ली पेन आणि इमानोल मारक्वाँ यांनी स्वत:कडे घेतलेल्या आहेत असे दिसते आहे. जागतिकीकरणाचा अपेक्षित लाभ पदरी पडलेला नाही, त्यामुळे आपल्या देशात बाहेरून लोक येत आहेत आणि त्यांच्यामुळे देशांतर्गत बेकारी वाढते आहे असा समज अनेक प्रगत देशांमध्ये पहायला मिळतो आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी जागतिकीकरणाच्या विरोधातली भूमिका घेतली जाते आहे. फ्रान्सदेखील त्याला अपवाद नाही. मोंद या फ्रेंच वृत्तपत्रात मारी चार्रेल यांचा लेख प्रकाशित झालेला आहे.लोकप्रियतेसाठी दिली जाणारी आश्वासने कितपत खरी आहेत या विषयावरच्या या लेखात ली पेन यांच्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत अनेक देशांमधल्या अशा लोकानुरंजन करणाऱ्या नेत्यांच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेत लोकांमध्ये असलेल्या धास्तीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न असे लोकानुनय करणारे नेते करीत असतात, असे त्यांनी सांगितलेले आहे. या विषयावर दि इकॉनॉमिस्टने फ्रान्समधली पुढली राज्यक्रांती : युरोपियन युनियनच्या मुलावर येऊ शकणाऱ्या निवडणुका हा अग्रलेख लिहिलेला आहे. फ्रान्समधल्या निवडणुका केवळ त्या देशासाठी महत्त्वाच्या नाहीत तर त्याचा परिणाम फ्रान्सच्या बाहेरदेखील जाणवणार आहे असे सांगत त्यात जागतिक परिस्थितीच्या संदर्भात या निवडणुकांबद्दल चर्चा केलेली आहे. यावेळच्या निवडणुकांमध्ये सोशालिस्ट आणि रिपब्लिकन हे नेहमीचे पक्ष खूपच मागे पडलेले आहेत, असे सांगत खरी लढत नॅशनल फ्रंटच्या ली पेन आणि एन मार्च या अगदी नव्याने स्थापन झालेल्या गटाचे इमानोल मारक्वाँ यांच्यातच होणार असल्याचे इकॉनॉमिस्ट सांगतो आहे. डावे आणि उजवे या दोन पारंपरिक विचारप्रवाहांऐवजी खुले आणि बंदिस्त अशा दोन विचारसरणींचा संघर्ष यावेळी होणार असल्याचे त्याने भाकीत केलेले आहे. साहजिकच या निवडणुकांचा जो काही निकाल लागेल त्याचा परिणाम फ्रान्समध्ये जितका जाणवेल त्यापेक्षाही तो फ्रान्सच्या बाहेर जाणवेल, असेही त्याने नमूद केलेले आहे. सध्याचे राजकीय नेते आणि त्यांच्या राजकारणाची ठरावीक पठडी बिनकामाची ठरलेली आहे आणि त्यावरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आणि चीड आहे हे नमूद करून इकॉनॉमिस्टने पुढे म्हटले आहे की, जगातल्या सर्वात असंतुष्ट लोकांमध्ये फ्रान्सच्या जनतेचा समावेश होतो आहे असे एका सर्वेक्षणानुसार दिसलेले आहे. तिथे जवळपास ८१ टक्के लोक असमाधानी आहेत. फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. देशात इस्लामी घुसखोर आणि अतिरेक्यांनी असुरक्षेचे वातावरण निर्माण केलेले आहे. या परिस्थितीमध्ये लोकांना दिलासा वाटेल अशा पद्धतीचा प्रचार ली पेन आणि मारक्वाँ हे करीत आहेत. त्यामुळे निवडणुका हळूहळू त्यांच्यामध्ये सीमित होत आहेत. तिसरे उमेदवार फ्रान्स्वा फियाँ हे सध्या स्वत:च्या समोरच्या कायदेशीर प्रकरणांमध्ये गुरफटत चाललेले आहेत. निवडणुकांमधून माघार घेण्याची सूचना जर त्यांनी स्वीकारलेली नसली तरी ते मागे पडत आहेत हे नक्की.ली पेन यांची भूमिका युरोपियन युनियनच्या विरोधातली आहे. युरोपियन युनियनमुळे फ्रान्सला आपले सार्वभौमत्व गमवावे लागते, आपल्या स्वत:च्या हिताचा बळी देऊन इतर देशांसाठी फायद्याची ठरणारी धोरणे राबवावी लागतात, त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे, जागतिकीकरणाचा कोणताही लाभ फ्रान्सला होत नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर मारक्वाँ यांची भूमिका त्याच्या अगदी उलटी आहे. सध्या तरी ली पेन काहीशा पिछाडीवर गेल्याचे दिसते आहे. ते काहीही असले तरी इतिहासातल्या फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणेच यावेळच्या राज्यक्रांतीचेदेखील जगावर खूप दूरगामी परिणाम होतील, अशी भविष्यवाणी इकॉनॉमिस्टने वर्तवलेली आहे ती योग्यच आहे.