शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आजचा अग्रलेख - स्वातंत्र्याची पायमल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 5:19 AM

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार पत्रकार व लेखकांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार देते

उत्तर प्रदेशचे संन्यस्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तसेही भडक माथ्याचे इसम आहेत. आपण आणि आपले सरकार यांच्याविरुद्ध कुणी जराही टीका केली तरी ते त्यांच्या साऱ्या ताकदीनिशी त्या टीकाकारावर तुटून पडतात. त्यांच्या मंत्रालयासमोर निदर्शने करणाºया व ‘त्यांच्यावर आपले प्रेम आहे’ असे ओरडून सांगणाºया एका स्त्रीची बातमी प्रशांत कनोजिया या पत्रकाराने त्याच्या नोएडाहून प्रकाशित होणाºया ‘नेशन लाइव्ह’ या पत्रातून प्रकाशित केली. त्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्याचा आरोप लावून त्या राज्याच्या खूशमस्कºया पोलिसांनी त्या कनोजियाला तत्काळ अटक करून स्थानबद्ध केले. निदर्शनाची बातमी देणे हा पत्रकार व वृत्तपत्रांचा सहज साधा अधिकारच नव्हे तर तो त्यांचा धर्म आहे; पण मुख्यमंत्र्यांना खूश करू पाहणाºया पोलिसांनी आपला पराक्रम दाखवीत या अटकेची कारवाई केली.

कनोजियांच्या पत्नीने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली, तेव्हा त्या न्यायालयाने ही अटक घटनाबाह्य व मतस्वातंत्र्याच्या अधिकाराचा भंग करणारी असल्याचा अभिप्राय दिला व ती रद्द केली. सरकारने गेंड्याची कातडी पांघरून बसू नये हे खरे असले तरी त्याने एवढे कोवळे व संवेदनशील असण्याचेही कारण नाही. राजकारण व समाजकारण यात वावरणाºया माणसांना प्रशंसा आणि टीका या दोहोंनाही तोंड द्यावेच लागते. त्यातून मुख्यमंत्री हा प्रशासनाचा प्रमुख असल्याने टीकेचा सर्वाधिक मारही त्याच्यावरच होतो. त्यातून घटनेने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार पत्रकार व लेखकांना सरकारवर टीका करण्याचाच नव्हे तर त्याची सारी चिकित्सा करण्याचा अधिकार देते. तो नागरिकांचाही मूलभूत अधिकार आहे. योगी आदित्यनाथ व त्यांच्या पोलिसांनी या अधिकाराची पायमल्ली करून घटनेचाच अपमान केला आहे. तो दूर करून न्यायालयाने घटनेचा सन्मान राखला यासाठी त्याचे अभिनंदन केले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून मतस्वातंत्र्याच्या अधिकारांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध दाखल केले जाणारे गुन्हे ‘फौजदारी’ न मानता ‘दिवाणी’ मानले पाहिजे, अशी मागणी देशात होत आहे. तिला पत्रकारांएवढाच राजकीय पक्षांचाही पाठिंबा आहे; परंतु फौजदारी म्हटले की त्या इसमाला तत्काळ अटक करण्याचे अधिकार सरकारला मिळतात व पोलीस ते वापरायला उत्सुकही असतात. त्यातून राहुल गांधींनी ‘मूर्ख’ ठरविलेले आदित्यनाथांसारखे आततायी पुढारी तर आपला एकही अधिकार सोडायला तयार नसतात. ममता बॅनर्जी आक्रस्ताळ्या आहेत म्हणून त्यांचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी एकीकडे करायची आणि योगीं यांच्यावर टीका झाली म्हणून त्याच्या टीकाकारांना मात्र जेरबंद करायचे यातले राजकीय तारतम्य (?) कुणालाही कळणारे आहे. राजकारण धर्मांध झाले की असे होत असते. मग कायदा नाही, घटना नाही, नागरिकांचे अधिकार नाही आणि साधा समंजसपणाही नाही. दरदिवशी हजारो निदर्शने होतात. त्यात सहभागी होणारे लोक सरकारवर टीका करतात. त्या टीकेची वृत्तेही प्रकाशित होतात; परंतु त्यासाठी कुणाला अटक झालेली, मोदी सरकार अधिकारारूढ होण्याआधी कधी दिसली नाही.

पूर्वी धर्मावरील टीका अग्राह्य व अक्षम्य मानली जाई. आता त्याचे पांघरुण घेतलेले राजकारणही आपल्यावरची टीका अशी अक्षम्य ठरवीत असेल तर तो त्याला असलेल्या अधिकाराएवढाच धर्माचाही गैरवापर आहे. खरे तर अशा वेळी मोदींनीच योगी यांना योग्य ती समज द्यायची. अन्यथा केवळ टीका केली म्हणून पत्रकार पकडले जाऊ लागले तर देशात नुसती आणीबाणी येणार नाही, येथे एकपक्षीय हुकूमशाहीच येईल. टीकाकारांनी तारतम्य बाळगणे ही त्यांचीही जबाबदारी आहे. मात्र, एका स्त्रीच्या साध्या निदर्शनाची बातमी दिली म्हणून पत्रकाराला अटक होणे हा केवळ शासकीय वेडाचारच आहे. तो देश, सरकार, पक्ष व लोकशाही या साºयांचीच मानहानी करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणात घटनेची पायमल्ली करणाºयांनाच अटक होणे गरजेचे आहे. त्याच वेळी टीका हा फौजदारी गुन्हा न राहता दिवाणी अपराध ठरविणेही गरजेचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार पत्रकार व लेखकांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार देते. तो नागरिकांचाही मूलभूत अधिकार आहे. योगी आदित्यनाथ व त्यांच्या पोलिसांनी या अधिकाराची पायमल्ली केली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथJournalistपत्रकारUttar Pradeshउत्तर प्रदेश