- डॉ. मिन्नू भोसले‘हाय हॉटी, हॅलो हँडसम’ हे संवाद आहेत, आजच्या पिढीचे. एक मित्र आणि दुसरी मैत्रीण यांच्यातले. आपल्या परंपरा, सामाजिक चालीरिती आणि काही अपरिहार्य जीवशास्त्रीय कारणे, यामुळे मुले-मुली एकमेकांचे फक्त चांगले मित्र असू शकतात, यावर अजूनही आपल्या लोकांचा विश्वास बसत नाहीये, पण काळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. आता मात्र, मानसिकता वेगाने बदलतेय.मैत्रीचे स्वरूप बदलतेय का?मुला-मुलींमधील मनमोकळे संवाद आता काही नवीन नाहीत. शाळा, कॉलेज, आॅफिसमध्ये होणारी मुला-मुलींची मैत्रीही आता काही नवीन नाही, पण पालकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र बदललाय. तो नक्की बदललाय का, त्याची अभिव्यक्ती बदललीय हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. आमच्या नव्या पिढीला बरेच जण खूप लकी समजतात. कारण आमच्याकडे मैत्री करण्याचे, ती समजून घेण्याचे आणि कदाचित त्यातूनच आपला पार्टनरही निवडू शकण्याचे स्वातंत्र्य आहे.मैत्रीच्या नात्यामुळे नेमके काय बदल दिसून येत आहेत?आज मात्र, नात्यांमध्ये बरेच बदल घडत आहेत. मुला-मुलींना एकत्र येण्याची, एक व्यक्ती म्हणून एकमेकांना ओळखण्याची संधी मिळतेय. त्यांना एकमेकांना पारखून घ्यायला वेळ मिळतोय. अगदी दोन्ही बाबतीत म्हणजे जोडीदार म्हणूनही आणि मित्र म्हणूनही. स्त्री-पुरुष संबंधातली अवघडलेपणाची भावना कुठेतरी मोकळी होऊ पाहतेय. नात्यांच्या बाबतीतही एखादी नवीन गोष्ट करून पाहावी, म्हणून ते उत्सुक आहेत. नात्यांतील स्पेसची संकल्पनाही बºयापैकी रुजू लागलीये.त्यांच्या नात्यात पारदर्शीपणा येतोय का?जेंडर न्यूट्रल होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून याकडे पाहता येईल. पुरुष आणि स्त्री यातल्या फरकाच्या सीमारेषा हळूहळू मिटत चालल्या आहेत. एक चांगली गोष्ट अशी घडली आहे, ती म्हणजे पालकांकडूनही आज मैत्री एक खरेखुरे नाते म्हणून हळूहळू स्वीकारली जात आहे. यापूर्वी कदाचित मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही, म्हणून त्याचे आईवडील त्यांच्या मित्राला समजवायला सांगत नव्हतेही, पण आज अनेकदा मुलाला एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या मित्रांची मदत आवर्जून घेतली जाते.पालक मुलांना स्वत:ची अशी वेगळी स्पेस देत आहेत. मुलांनी इमोशनली आपल्यावरच अवलंबून असावे, असा हट्ट त्यांनी सोडला आहे. म्हणजे असे म्हणता येईल की, बदल होतायत, पण हळूहळू होतायत. मैत्रीच तर आहे, जी आपल्याला अपोझिट सेक्सचे जजमेंट मांडायला मदत करतेय.
मुला-मुलींमधील मैत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 4:13 AM