- स्नेहा मोरे
दिवसागणिक प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढते आहे, या प्लॅस्टिकला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होत असतानाही, त्याच्या वापरावर नियंत्रण करणे कठीण होत आहे. मात्र, याच प्लॅस्टिकच्या माध्यमातून इंधननिर्मिती करण्याचा विचार पुण्याच्या केशव सीता मेमोरेबल फाउंडेशनच्या रुद्र एन्व्हायर्नमेंट सोल्युशनने केला आहे. त्यांच्या या विचाराला पुणेकरांनीही साथ देत, प्लॅस्टिकच्या राक्षसाविरोधात एका नव्या चळवळीला सुरुवात केली आहे. प्लॅस्टिकचा कचरा फेकून न देता, त्या टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती करून स्वस्तात विकले जात आहे.केशव सीता मेमोरिअल फाउंडेशनच्या डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि त्यांच्या सहकाºयांनी मिळून सामाजिक जाणिवेतून हा उद्योग सुरू केला आहे. प्लॅस्टिकवर काम करणारे अनेक जण आहेत. मात्र, तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. विविध पिशव्या, पाउच, औषधांची वेस्टने, टूथपेस्ट, ब्रश यांसारखे रोजच्या वापरातील जवळपास ३० ते ४० टक्के प्लॅस्टिक विकले जात नाही, हेदेखील त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हेप्लॅस्टिक आणून त्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल का, यावर विचार करणे सुरू झाले.प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती कशी करतात, याविषयी सांगताना डॉ. ताडपत्रीकर म्हणाल्या की, ही संकल्पना १०० वर्षे जुनी आहे. तिचा आधार घेत, सुरुवातीला प्लॅस्टिक कुकरमध्ये स्टोव्हवर तापविले. त्याला लावलेल्या दोन नळ्यांमधून आलेला वायू पाण्यात सोडला. पाण्यावर तरंगलेल्या द्रावणाला पेटवले असता, ते डिझेलप्रमाणे पेटल्याने, तेलनिर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, स्वत: गुंतवणूक करून, प्लॅस्टिकपासून इंधननिर्मितीचे मशिन तयार करण्यात आले. प्लॅस्टिक गोळा करून एका टाकीत टाकण्यात येते. ते वेगाने वितळण्यासाठी त्यात विघटन द्रव्य टाकले जाते. प्लॅस्टिक वितळून त्यातून गॅस बाहेर येतो. या वेळी पॉलिकार्बन साखळ्या (चेन) हायड्रोकार्बनमध्ये बदलतात. यामुळे एलपीजीसारखा गॅस मिळतो आणि दुसरीकडे पॉलिफ्युएल बाहेर येते. या तेलाची ज्वलनशील क्षमता ही डिझेलपेक्षाही जास्त असते. साधारणत: १०० किलो प्लॅस्टिकपासून ५० ते ६५ लीटरपर्यंत तेल मिळू शकते, तर २० ते २२ टक्के गॅस मिळतो. हा वायू इंधन म्हणून पुन्हा प्रकल्पात वापरला जातो, तर तेलाची इंधन म्हणून विक्री करण्यात येते. शिल्लक राहणारी काजळी रबर आणि प्लॅस्टिक उद्योगाला रंग देण्यासाठी वापरला जातो.या प्रकल्पासाठी दूध, तेल, कॅरिबॅग, तेलाचे डबे, हॉटेलमधील पार्सलचे डबे, टूथपेस्टचे कव्हर, मिनरल वॉटरच्या बाटल्या, शॅम्पू-पावडरचे डबे, खेळणी, बादली, कपड्याच्या साबणाचे रॅपर्स, सिडी कव्हर, प्लॅस्टिकचा कच्चा माल अशा सर्व वस्तूंचा इंधनासाठी वापर करता येतो, असे डॉक्टरांनी सांगितले. यासाठी शहरातील विविध सोसायट्यांमध्ये विकल्या जाणाºया वस्तू सोडून, इतर प्लॅस्टिकच्या गोष्टी वेगळ्या काढायला सांगितल्या. त्या देण्याची विनंती केली. नागरिकांनी साठविलेले हे प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी आम्ही आमच्या गाड्या वापरल्या.वाघोली, विमाननगर, कल्याणीनगर, खराडी, हडपसर, एनआयबीएम, उंड्री पिसोळी रोड, बिबवेवाडी, कोथरूड, कर्वेनगर, पिंपळे सौदागर, औंध, मॉडेल कॉलनी, प्रभात रोडसह पुण्यातील सर्व भागांतून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यावर लोक माहिती देतात. त्या ठिकाणी जाऊन प्लॅस्टिक गोळा केले जाते.या मशिनसाठी १५ ते ३५ लाखांपर्यंत खर्च येतो. त्यात सेडर मशिन, झटक मशिन, एग्लो मशिन या यंत्रांचा वापर केला जातो, तर इंधन तयार करण्याचा खर्च १० ते ३० लाखांपर्यंत आहे. दररोज किमान ५०० किलो प्लॅस्टिक मिळणाºया ठिकाणी हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू करता येईल. काही गावांनी मिळून हा प्रकल्प सुरू करता येईल. त्यातून ग्रामीण युवकांना रोजगारही मिळेल. ग्रामपंचायतींनी जागा आणि प्लॅस्टिक उपलब्ध करून दिल्यास, तेथे प्रकल्प उभारू शकतो. मात्र, हा उद्योग ग्रामीण भागात विस्तारण्याचा मानस असून, त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळण्याचा विचार आहे, जेणेकरून छोट्या यंत्रांच्या निर्मितीने राज्यातील खेड्यापाड्यात हा उद्योग करू शकू. यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीही होईल, असा सकारात्मकविचार आहे, असे डॉ. ताडपत्रीकर यांनी सांगितले.केशव सीता मेमोरिअल फाउंडेशनच्या डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि त्यांच्या सहकाºयांनी सामाजिक जाणिवेतून ‘रुद्र एन्व्हायर्नमेंट सोल्युशन्स’ हा उद्योग सुरू केला. याचा फायदा प्लॅस्टिक कचºयाची योग्य विल्हेवाट करण्यासाठी होत आहे. या नवउद्योगाविषयी डॉ. ताडपत्रीकर यांनी सांगितले की, प्लॅस्टिक हे पेट्रोल आणि डिझेल बनविण्यात येणाºया ‘टार’पासून तयार होत असल्याने, त्यापासून (पॉलिआॅइल) इंधननिर्मिती करण्याची कल्पना पुढे आली.