शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 5:08 AM

कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे.

दिनकर रायकरमुंबई : कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे. भविष्यात खादीचा उद्योग २ हजार कोटीपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जगात या ब्रँडची ख्याती आहे. ‘एक परिपूर्ण माणूस’ (ए कम्प्लीट मॅन) असे रेमंडचे घोषवाक्य आहे. आम्ही गरिबापासून अतिश्रीमंतांपर्यंत कपडे बनवतो. आमच्याकडे ११३ रुपये मीटरपासून ते ७ लाख ५० हजार रुपये मीटरपर्यंतचे कापड बनते. जगातले सर्वात चांगले कापड आम्ही बनवतो. देशातल्या ३८० हून अधिक शहरांत आमची १२१२ स्टोअर्स आहेत. २० हजार रिटेलर्स आहेत. महाराष्टÑात १२६ स्टोअर्स आहेत व देशात ९५३ विशेष स्टोअर्स आहेत. आता कमी लोकसंख्येच्या शहरांतही आम्ही व्यवसाय नेत आहोत असेही सिंघानिया म्हणाले.खादी व लिनन हे प्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत व ते आरोग्यासही पोषक आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले, कंपनी ‘कापड निर्मिती’ या पारंपरिक उत्पादनावर अवलंबून राहणार नाही. आता ‘एथ्निक’ वस्त्रांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले की, जगात या कपड्यांचा बाजार ५ हजार कोटींचा आहे.आम्ही आमच्या अनेक शोरुममध्ये अत्यंत प्रशिक्षित टेलर्स ठेवले आहेत. ते तुमच्या आवडीचे, हवे तसे शर्ट, पॅन्ट्स, सुट्स शिवून देतात. शेरवानी, जॅकेट, लग्नासाठीचे सुटही शिवून दिले जातात. ‘मेक टू आॅर्डर’ जॅकेटची किंमत १४ लाखापर्यंतहीआहे. लोकांची आवड बदलत आहे. त्यामुळेत्यांना हवे ते देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिंघानिया म्हणाले.महाराष्टÑात रेमंडचा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही अमरावतीची निवड केल्याचे सांगून ते म्हणालेकी, रेमन्ड्सने अनेक वर्षांनी मोठी भांडवली गुंतवणूक या वस्त्रोद्योग पार्कमधील कारखान्यात केली आहे. तिथे सध्या फक्त धागे तयार होत असले तरी शर्टिंग, खादी, लिनेन अशा विविधांगी उत्पादनाची पूर्ण साखळी तिथे उभी केली जाईल.सांगली, चिपळूण, रत्नागिरी, नांदेड या उद्योगदृष्ट्या मागास शहरांमध्येही आम्ही व्यवसाय सुरु करत आहोत. मात्र आपल्या कामगार कायद्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात आमुलाग्र बदल करावेच लागतील असेही सिंघानिया यांनी निक्षून सांगितले. उद्योगांमध्ये शिस्त आणायला हवी व ही शिस्त येण्याआधी उद्योगांची उत्पादकतासुद्धा वाढयलाच हवी असेही सांगून ते म्हणाले की, आमचे महाराष्टÑात१२९६४ तर देशभरात २५०८८ कर्मचारी आहेत.इंजिनीअरिंग आणि आॅटोमोबाइल्समध्ये आम्ही व्यवसाय सुरु केला आहे. आम्ही कंडोमच्या व्यवसायात १९९१ मध्ये प्रवेश केला. ‘कामसूत्र’ हा ब्रॅन्ड आज लोकांच्या ‘कामजीवनात’ आनंद निर्माण करीत आहे, असे ते म्हणाले.सिंघानिया यांनी स्वत:च्या तीन आवडी सांगितल्या. सकाळी उठून व्यायाम, दिवसभर व्यवसाय आणि मोटार स्पोर्टसचा आनंद या तीन आवडी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कशात लक्ष घालण्यात मला वेळ नाही असे त्यांनी सांगितले.तुमचे वडिलांशी मालमत्तेवरून वाद झाले, असे विचारले असता ते हसत हसत म्हणाले, असे वाद तर घराघरात असतात. आम्ही त्याला अपवाद कसे राहू? पण आमच्या कुटुंबाचा नावलौकिक असल्याने माध्यमांनी हा विषय लावून धरला. मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही.>होय, मराठीयेते की!एवढी वर्षे महाराष्टÑात आहात, मराठी येते की नाही? असे विचारले असता शुद्ध मराठीत ‘हो, मराठी येते की,’ असे उत्तर त्यांनी दिले. माझे वडील खेळाडू होते, मीही खेळाडू आहे. खेळावरील प्रेमापोटीच आम्ही देशातील खेळाडूंसाठी कपडे तयार करतो. जागतिक पातळीवरील खेळाडूंचे खेळाव्यतिरिक्त अधिकृत कपडे रेमंडचे असतात असेही सिंघानिया आवर्जून म्हणाले.>तीन वर्षांत कर्जमुक्त होऊ : वस्त्रोद्योगाची ९३ वर्षांची परंपरा व अनुभव पाठीशी असलेल्या रेमन्ड्स कंपनीच्या डोक्यावर २००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जापोटी कंपनीला दरवर्षी काही कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. पण अमरावतीचा कारखाना कंपनीला कर्जातून बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एकदा उत्पादनांची पूर्ण साखळी तिथे उभी राहिली की, भांडवली गुंतवणूक थांबेल. कारखान्यातीला उत्पादनांची विक्री सुरू होईल. त्यातून कंपनी हळूहळू कर्जमुक्त होईल. अमरावती व इथिओपिया या दोन्ही ठिकाणची भांडवली गुंतवणूक अंतिम टप्प्यात आहे. कंपनी २०२०-२१ पासून कर्जमुक्त होण्यास सुरुवात होईल.