शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

बातमीतला जॉर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 07:08 IST

जॉर्ज फर्नांडिस यांचे नुकतेच निधन झाले. जॉर्जशी आधी कार्यकर्ता व नंतर पत्रकार म्हणून आलेले हे अनुभव...

- संजीव साबडेकेंद्रातील व्ही. पी. सिंग सरकार १९९0 मध्ये पडले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढणार, हे नक्की झाले होते. केवळ तारीखच व कारणेच ठरायची होती. त्या काळात महाराष्ट्र टाइम्सचा मी दिल्ली प्रतिनिधी होतो. मुख्यमंत्री शरद पवारांविरुद्ध राज्यात काँग्रेसजनांनी बंड केले होते. त्यामुळे ते राहणार की जाणार, अशी चर्चा सुरू असायची. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर २७ फेब्रुवारी, १९९१ रोजी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे जाणे झाले. त्यांनी गप्पांच्या नादात ६ मार्चला सरकार पडणार, असे सांगितले. त्याच दिवशी जॉर्जना राष्ट्रपती वेंकटरामन यांनी बे्रकफास्टसाठी बोलावले होते आणि राष्ट्रपतींनीच ही माहिती दिल्याचे जॉर्ज दिली होती. ही खूपच मोठीच बातमी होती, पण संभाषण दोघांतले होते आणि राष्ट्रपतींचा उल्लेख बातमीत करणे शक्य नव्हते. जॉर्जच्या नावाने द्यायची, तर बातमीचे वजन कमी झाले असते, शिवाय आठवड्यात तसे घडले नाही, तर बातमी खोटी ठरण्याची भीती होतीच. तरीही बातमी दिली आणि ती २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाली. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र टाइम्समध्येच ती प्रसिद्ध झाली होती.त्यानंतर घरगुती समस्येमुळे काही दिवसांसाठी कर्नाटकात जावे लागले, पण बरोबर ६ मार्च रोजी संपादक गोविंद तळवलकर यांचा फोन आला. ते म्हणाले की, तुमच्या समस्येच्या वेळी अभिनंदन करणे योग्य नाही, पण तुमची बातमी खरी ठरली आहे. ताबडतोब दिल्लीला जा.जॉर्जनी दिल्लीत असताना दिलेली ही एकमेव बातमी, पण त्यांच्याविषयीच्या आणखी दोन बातम्याही खूप महत्त्वाच्या ठरल्या. १९८९ साली निवडणुका झाल्या आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. जॉर्जकडे रेल्वे खाते आले. काश्मीरमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्यामुळे मुफ्ती महमद सईद यांना गृहमंत्री केले, पण जॉर्जचे काश्मीरमधील विविध गटांशी असलेले संबंध पाहून पंतप्रधानांनी केंद्रात काश्मीर विभाग तयार करून त्याची जबाबदारी जॉर्जकडे सोपविली. ती बातमी सर्वात आधी मिळणारा मीच एकटा होतो. ती बातमी अर्थातच हेडलाइन म्हणून प्रसिद्ध झाली. ती जॉर्जकडून मिळाली नव्हती. त्यामुळे ती मला कुठून मिळाली, याचे वाटलेले आश्चर्य जॉर्जने बोलून दाखविले होते.पण काश्मीरमधील वातावरण चिघळत होते. परिस्थिती सुधारत नव्हती. त्यातच मुफ्ती महमद सईदव अतिरेकी यांचे थेट संबंध असल्याच्या ध्वनिफिती जॉर्जच्या हाती लागल्या. त्यांनी त्या पंतप्रधानांकडे दिल्या. त्यावर कारवाई होईल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण व्ही. पी.सिंग यांनी काहीच केले नाही.त्यामुळे जॉर्जनी १९९0 मध्ये काश्मीरमधून अंग काढून घ्यायचा निर्णय घेतला. ती बातमीही पहिल्यांदा मलाच मिळाली, पण बातमी कन्फर्म होत नव्हती आणि जॉर्ज बिहारमध्ये होते. त्यांचे सहकारी, मित्र, मधू लिमये, निखिल चक्रवर्ती कोणीच बातमी कन्फर्म करत नव्हते, तरीही गोविंद तळवळलकर यांनी बातमी छापण्याचा निर्णय घेतला.जॉर्ज व तळवलकर यांचे सकाळी बोलणे झाले. तळवलकरांनी काश्मीर अफेअर्सची जबाबदारी सोडले का, असे विचारताच, जॉर्जने नाही, असे काहीच नाही, असे उत्तर दिले. तोपर्यंत पेपरमध्ये छापून झाली होती. त्यामुळे तळवलकरांनी मला फोन करून ‘जॉर्जला भेटा’ असे सांगितले. घाईतच कृष्ण मेनन मार्गावरील जॉर्जच्या घरी गेलो. मला पाहताच, त्यांनी ‘काय रे, खोटी बातमी दिलीस?’ असा सवाल केला. त्यावर प्रतिवाद तरी काय करणार? पण माझी बातमी खरीच होती. तरीही ठीक आहे, तुमच्या नावाने खुलासा छापतो, असे त्यांना सांगितले. त्यावर ‘माझा खुलासा म्हणून छापू नकोस, स्वत:चा खुलासा म्हणून छाप,’ असे ते म्हणाले.तोपर्यंत बातमी दिल्लीत पसरली होती. व्ही. पी. सिंग सकाळीच राष्ट्रपती. आर. वेंकटरामन यांना भेटायला गेले होते. ते बाहेर येताच पत्रकारांनी त्यांना घेरले आणि या बातमीविषयी विचारले, पण त्यांनीही बातमीचा इन्कार केला, पण मी बातमीवर ठाम होतो आणि घडलेही तसेच. एका आठवड्यात तर व्ही. पी. सिंग यांनी काश्मीर विभागच गुंडाळून टाकला.जॉर्जच्या अशा असंख्य आठवणी आहेत, पण तो जॉर्ज मात्र नाही. जॉर्जशी संबंध येण्याचे कारण घरातले समाजवादी वातावरण. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स. का. पाटील यांच्याविरुद्ध जॉर्जनी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवायची ठरविली, तेव्हा मुंबईत समाजवाद्यांची फार काही ताकद नव्हती. त्या काळात माझ्यासह सारेच जण व्होटर्स स्लिपवर गिरगावातील मतदारांची नावे लिहीत बसायचो. वयाच्या नवव्या वर्षी जॉर्जचा असा पहिल्यांदा अप्रत्यक्ष संबंध आला.जोगेश्वरीत समाजवाद्यांनी झोपडपट्टी परिषद घेतली होती. जॉर्ज, मृणाल गोरे, प. बा. सामंत, वडील व्यासपीठावर होते. ती उधळायला काही शिवसैनिक आले होते. ते कळताच, वडील व्यासपीठावरून खाली उतरले आणि थेट शिवसैनिकांपर्यंत गेले. त्यापैकी एकाने थेट चाकू काढला आणि वडिलांवर वार केले. वार चुकविण्यासाठी वडील वाकले. त्यामुळे दोन्ही वार डोक्यावर झाले. एक पुढे आणि एक मागे. मागचा वार खूपच खोल होता. मेंदूच्या जेमतेम पाव इंच मागे. वडील त्या हल्ल्यातून कसेबसेच वाचले.पुढे जॉर्जच्या म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी आली. त्या वेळी जॉर्ज केंद्रात उद्योगमंत्री झाले होते, पण युनियनमध्ये त्यांचे बारीक लक्ष असायचे. त्या वेळी तरुण कामगारांचे अभ्यासवर्ग घ्यावेत आणि त्यांचे वेगळे दल स्थापन करावे, अशी त्यांची इच्छा होती, त्याप्रमाणे ते केले. जॉर्ज हिंद मजदूर पंचायत व हिंद मजदूर सभा यांच्या विलीनीकरणाला आले, तेव्हा या तरुण कामगारांच्या दलाने त्यांना जी सलामी दिली, ती पाहून ते भलतेच खूश झाले आणि मला पाठीवर थाप दिली. जॉर्जच्या अशा असंख्य आठवणी आहेत... कधीही पुसल्या न जाणाऱ्या.(लेखक लोकमतचे समूह वृत्तसमन्वयक आहेत.) 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसPoliticsराजकारण