शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

अमेरिकेतला वणवा; अन्यायाचा हिंसक परिपाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 5:42 AM

अमेरिकेतील जनक्षोभ हा कृष्णवर्णीय जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा हिंसक परिपाक आहे. राज्यकर्त्यांच्या ‘फोडा आणि झोडा’च्या कार्यपद्धतीचा ठसा तिथल्या घटनाक्रमांवर दिसतो. ही कार्यपद्धती भारतीयांच्याही परिचयाची आहे.

अमेरिका धगधगू लागली आहे. तिथला कृष्णवर्णीय संतापलेला आहे. श्वेतवर्णीयांचे प्राबल्य असलेल्या तिथल्या व्यवस्थेला पुन्हा एकदा वर्णद्वेषाने ग्रासल्याची चिन्हे दिसताहेत. वस्तुस्थिती तशी नसेलही; पण ती तशी नाही हे कृष्णवर्णीयांच्या मनावर ठसविण्यासाठी प्रशासन काहीच करताना दिसत नाही. उलट प्रशासनाची पावले असंवेदनशील निर्णयांच्या दिशेने ठामपणे पडताहेत.

सोमवारी वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊससमोर शांततापूर्ण निदर्शने करणाºया नागरिकांना अश्रूधूर आणि रबरी बुलेट्सचा मारा करून पांगविण्यात आले. कारण, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निदर्शकांनी त्याआधी जाळलेल्या एका चर्चसमोर जाऊन आपली छायाचित्रे काढून घ्यायची होती. तत्पूर्वी, ट्रम्प यांनी निदर्शकांवर सैन्य घालण्याची धमकीही दिली. ट्रम्प यांचे हे वर्तन श्वेतवर्णीय अमेरिकेची कृष्णवर्णीयांप्रतीची मानसिकता म्हणून आता सोशल मीडियावरून फिरते आहे. लोकमानस पेटवते आहे. त्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. बर्लिन, लंडन, ब्रुसेल्सपासून सिडनीपर्यंत कृष्णवर्णीयांना पाठिंबा देणारी निदर्शने झाली. एरवी जगभरात वांशिक कलह निर्माण व्हायचा तेव्हा अमेरिका स्वत:कडे मोठेपणा घेत शांततेचे आव्हान करायची. प्रसंगी संबंधित देशांतल्या सत्ताधाऱ्यांना कानपिचक्याही द्यायची. आता पारडे पालटू लागले आहे. अमेरिकेच्या दोस्तराष्ट्रांची भाषाही किंचित बदलली आहे.

अंतर्गत कलहावर अमेरिकेने त्वरेने ताबा मिळविणे हितावह ठरेल, असे इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जाहीरपणे सांगू लागले आहेत. लोकतंत्राचे यशस्वी आणि प्रागतिक उदाहरण म्हणून मिरविणाºया राष्ट्राचा पायाच ठिसूळ असल्याचे दर्शवणारा एकूण घटनाक्रम आहे. अगदी काल-परवापर्यंत तरी अमेरिका भौतिक सुबत्तेची स्वप्ने पाहणाºया जगासाठी लोहचुंबकासारखा होता. ते ‘दि ग्रेट अमेरिकन ड्रीम’ आता दु:स्वप्नात परिवर्तित होते की काय, असा प्रश्न तिथले विचारवंत एकामेकांना विचारू लागले आहेत. या सगळ््याला निमित्त ठरलेय गेल्या सप्ताहात झालेला जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलिसांच्या ताब्यात असतानाचा मृत्यू. श्वेतवर्णीय पोलीस अधिकाºयांनी संगनमताने नि:शस्त्र फ्लॉईडला श्वास कोंडून मारल्याचे व्हिडिओ फुटेजने सिद्ध केले आहे. मिनिया पोलीस प्रशासनाने या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करायची सोडून संबंधित अधिकाºयांना पाठीशी घालायचा प्रयत्न केला आणि अवघी कृष्णवर्णीय अमेरिका खवळून उठली. देशभर शहरे जळू लागली. सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता धोक्यात आली. फ्लॉईड हे क्षोभासाठी केवळ एक निमित्त होते.

याआधीही कायद्याच्या रक्षकांकडून अनेक कृष्णवर्णीयांची अशीच निर्घृण हत्या झाली आहे. फ्लॉईडच्या मृत्यूसाठी जबाबदार धरल्या गेलेल्या एका अधिकाºयाच्या विरोधात तर अंगबळाचा नाहक हिंसक वापर केल्याच्या तब्बल अठरा तक्रारी नोंद झाल्या असून, त्यांचा पाठपुरावा अर्थातच धूळखात पडलेला आहे. फ्लॉईडच्या मृत्यूने कृष्णवर्णीयांची सहनशीलता संपली आणि ते दगड- विटा घेऊन रस्त्यांवर उतरले. त्यांच्या या क्षोभाला समजून घेण्याची आणि त्याची समजूत घालण्याची वैचारिक क्षमता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे नाही. किंबहुना जहाल उजव्या राजकारणाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा सोस हेच या जनक्षोभामागचे खरे कारण आहे. आताही ते गावगुंडांना ठोकण्याची भाषा जाहीरपणे करताहेत. टिष्ट्वटरवरून आंदोलकांना धमक्या देताहेत. कमरेचे पिस्तुल काढून दे दणादण गोळ्या झाडणारा ट्रम्प यांचा आविर्भाव कदाचित त्यांच्यासाठी अध्यक्षपदाचा दुसरा अध्याय सुकर करीलही; पण या सगळ्या घटनाक्रमांतून दुभंगू पाहणाºया देशाची प्रतिमाही समोर येऊ लागली आहे. बारकाईने पाहिल्यास अंतर्गत कलह पेटवून आपले सिंहासन सुरक्षित करण्याची ही कार्यपद्धती भारतीयांना बरीच परिचयाची वाटेल.

‘आम्ही’ आणि ‘ते’ अशी स्वदेशींंचीच वाटणी करायची आणि त्यांना एकमेकांविरुद्ध झुंजत ठेवून आपल्या बुडाखालची सत्ता राखायची,हेच जगभरातील राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण होऊ पाहात आहे. अमेरिकेत जे घडतेय ते पाहून आपण मनसोक्त हसून घ्यायचे की, त्यापासून धडा घेत आपले घरघर लागलेले घर दुरुस्त करायचे हे भारतीयांनाही ठरवावे लागेल.

टॅग्स :Americaअमेरिकाgeorge floydजॉर्ज फ्लॉईड