- डॉ. रामचंद्र देखणेसाम्यभावाला गेलेल्या भक्ताची किंवा सत्पुरुषाची भूमिका मांडताना ज्ञानदेवांनी फार सुंदर दृष्टांत दिले आहेत.कां घरिचिया उजियेडु करावा।पारखिया आंधारु पाडावा।हे नेणेचि गा पांडवा।दीपु जैसा।।जो खांडावया घाव घाली।का लावणी जयाने केली।दोघा एकचि साऊली।वृक्षु दे जैसा।।ना तरी इक्षुदंडु।पाळितया गोडु।गाळीतया कडु। नोहेचि जेवी।।ज्याच्या ठिकाणी भेदभावाची वार्ताच नसल्यामुळे तो हा शत्रू आहे तर हा मित्र असा भेदभाव न पाहता दोघांनाही सारख्याच योग्यतेचे समजतो. जसे घरातील माणसांना उजेड करावा आणि बाहेरच्यांना मात्र अंधार पाडावा असा भेद दिवा जसा जाणत नाही. जो झाडावर कु-हाडीचे घाव घालतो त्यालाही आणि ज्याने झाड लावून पाणी घालून वाढविले त्या दोघांनाही झाड सारखीच सावली देते.पाणी घालणाऱ्याला दाट सावली द्यावी आणि फांद्या तोडणाºयांना, कुºहाडीचे घाव घालणाºयांना सावली काढून घ्यावी अशी भूमिका वृक्ष कधीच घेत नाही. ऊस हा पाणी देऊन जोपासणाºयाला गोड आणि चरकात घालून गाळणाºयाला कडू होत नाही. त्याची सारखीच गोडी दोघांनाही चाखता येते. चांदणे हे आल्हादपणाच्या बाबतीत राजा आणि भिकारी दोघांनाही सारखेच असते. जो लोकांच्या निंदेलाही स्वीकारीत नाही आणि स्तुतीने गर्व करीत नाही. आकाशाला जसा लेप लावता येत नाही तसा तो निर्लेप जीवन जगत असतो.पै आघवेचि आपुलेपणे।नुरेपि जया अभिलाषणे।जैसे येथूनि पºहा जाणेआकाशा नाही।आकाशाला जसे आज या गावाहून दुसºया गावाला जाणे नसते त्याप्रमाणेच ‘आघवेचि आपुलेपणे’ ही भूमिका घेऊन तो अभिलाषेच्या पलीकडे गेलेला असतो. सर्वाठायी, समत्व, अभेदत्व आणि असंगत्व पावलेला असा तो खºया अर्थाने साम्यभावातून ब्रह्मभावालाच जागवीत असतो. हा ब्रह्मभाव आणि साम्यभाव जनविश्वात ओतप्रोत भरावा म्हणून एकीकडे अद्वैतभक्तीचे मर्म सांगून मानवतेचा धर्मच ते उभा करतात. वैश्विक मानवतावाद हाच ज्ञानदेवांच्या विचारतत्त्वाचा गाभा आहे.
वैश्विक मानवतावाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:12 IST