शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

आयकरात सुविधा, जीएसटीत दुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 4:36 AM

आशा करूया की लवकरच ‘रिवाइज रिटर्न’ जीएसटीमध्येही उपलब्ध करण्यात यावा, जेणेकरून अर्थव्यस्थेमध्येही चांगले दिवस येतील.

- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २0 सप्टेंबर २0१९ ला जीएसटी कौन्सिलची मीटिंग झाली आणि आयकरात जबरदस्त बदल झाले. त्या दिवशी जीएसटीमध्ये काय शिफारस करण्यात आली?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, २0 सप्टेंबर हा करसंदर्भात खूप महत्त्वाचा दिवस मानला जाईल. सकाळी आयकरात कंपन्यांना सवलत दिली, पण संध्याकाळी जीएसटीमध्ये काही सुविधेचे निर्णय दिसले नाही. ३७ व्या जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगमध्ये कायदा आणि कार्यपद्धतीसंबंधित बदल सुचविले गेले. तसेच वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित जीएसटी दरही बदण्याचा प्रस्ताव दिला गेला. हे बदल १ ऑक्टोबरपासून लागू होतील.अर्जुन : कायदा आणि कार्यपद्धतीत प्रस्तावित बदल काय होते?कृष्ण : कायदा आणि कार्यपद्धतीत प्रस्तावित बदल खालीलप्रमाणे आहेत :*आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि १८-१९ साठी वार्षिक परतावा (Annual Return) भरण्यासाठी सवलत आहेअ. जीएसटीआर-९ फॉर्म भरणे त्या करदात्यांसाठी पर्यायी/ऐच्छिक आहे, ज्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींपर्यंत आहे,ब. कंम्पोझिशन करदात्यांना जीएसटीआर ९-अ फॉर्म भरण्यासाठी माफी देण्यात आली आहे.* सेल्स डिस्काउंटसंदर्भात विविध शंकांबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी २८ जून २0१९ ला परिपत्रक जारी केले गेले होते, त्यास रद्द करण्यात आले आहे.अर्जुन : कृष्णा, सेवांवरील जीएसटी रेटमध्ये बदल करण्याच्या शिफारशी काय आहेत?कृष्ण : अर्जुना, सेवांसाठी जीएसटी रेटमध्ये बदल करण्याच्या शिफारशी खालीलप्रमाणे :* आदरातिथ्य आणि पर्यटन :अ) हॉटेलच्या राहण्याची सेवा देण्याचा जीएसटी दर, जर व्यवहार मूल्य दिवसाला एक हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, परंतु साडेसात हजार रुपयांपर्यंत, तर १२ टक्के जीएसटी दर लागू आहे. तेच जर साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास १८ टक्के दर लागू होईल जो आधी २८ टक्के होता.ब) रु. ७,५0१ प्रत्येक दिवसाप्रमाणे दर असलेल्या जागेव्यतिरिक्त बाह्य सेवा देणाऱ्या कॅटरिंग सेवेवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे. ते १८ टक्के आयटीसी, सोबत वरून ५ टक्के आयटीसीशिवाय करण्यात आला आहे.* नोकरी कार्य सेवा :इंजिनीअरिंग इंडस्ट्रीसारख्या मशीन जॉब वर्कच्या पुरवठ्यावरचा जीएसटी दर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.वाहतूक :हवाई किंवा समुद्राद्वारे निर्यात मालवाहतुकीवर जीएसटी सवलतीच्या मुदतीत आणखी एका वर्षाची वाढ करण्यात आली आहे. तेच ३0 सप्टेंबर २0२0 पर्यंत. याचा करदाते फायदा घेऊ शकतील. तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण बदलांच्या तपशीलवार माहितीसाठी नोटिफिकेशन वाचावे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने आयकरात मोठा दिलासा दिला आहे. तसेच जीएसटीमध्येही मोठा दिलासा अपेक्षित होता. जसे ऑटोमोबाइल्सच्या जीएसटी दरामध्ये कपात इत्यादी. अशी आशा करूया की लवकरच ‘रिवाइज रिटर्न’ जीएसटीमध्येही उपलब्ध करण्यात यावा, जेणेकरून अर्थव्यस्थेमध्येही चांगले दिवस येतील. याचा बोध म्हणजे ‘आयकरात सुविधा, पण जीएसटीत दुविधा’ असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :GSTजीएसटीIncome Taxइन्कम टॅक्स