शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 7:33 PM

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण...

- भारतकुमार राऊत(ज्येष्ठ पत्रकार व माजी संसद सदस्य)गेल्या बुधवारी देशात सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला होता. त्यातच कोरोना विषाणूचा राक्षस डोकावून विकट हास्य करीतच होता. तरीही अवघा भारत देश आनंदात न्हात होता. कारण, उत्तर प्रदेशातील अयोध्या क्षेत्री रामजन्मभूमीवर नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होते. प्रत्येक हिंदू भारतीय दोन डोळ्यांचे प्राण करून प्रत्येक क्षण मनात साठवत होता. अभूतपूर्व म्हणावा असाच हा सोहळा!

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. आता दोनेक वर्षांत मंदिराच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि इतका प्रदीर्घ काळ बाबरीच्या दाराशी तिष्ठत खोळंबलेले रामलल्ला पुन्हा दिमाखात गाभाऱ्यात प्रवेश करतील. प्रत्येक भारतीय आता त्या घटकेची मनोमन आतुरतेने वाट पाहात आहे. राम मंदिर वादात गेल्या पाचशे वर्षांत झालेल्या रस्त्यांवरील आणि न्यायालयीन लढायांचे आता पुन:पुन्हा स्मरण करण्याचे कारण नाही; पण अंतिमत: ही लढाई कायद्याच्या चौकटीत रामभक्तांनी जिंकलीच. मात्र, ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड, असा पवित्रा इथे घ्यायचे कारण नाही. कारण या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. घरादाराची राखरांगोळी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. त्यांच्यापुढं झालेल्या अनन्वित अत्याचारांची व अन्यायाची भरपाई कोण आणि कशी करणार? त्यामुळेच गेल्या पाचशे वर्षांत जे कटू पचविले आणि जे विष प्राशन केले, त्याचे गोड फळ हाती लागले, असेच मानावे लागेल.

नरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण बाबरी पाडून राम मंदिर बांधणे हाच संघ-भाजपचा अंतिम उद्देशअसेल का? तसे असेल तर आणखी दोन वर्षांत तोही सफल होईल. मग पुढे काय? काँग्रेससमोर स्वातंत्र्य मिळविणे हा उद्देश होता. १९४७ मध्ये तो सफल झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावर महात्मा गांधीजींसह समस्त काँग्रेसजनांसमोर समर्पक उत्तर नव्हते. तेव्हा गांधीजींनी काँग्रेस विसर्जित करण्याची क्रांतिकारी सूचना केली. तोवर सत्तेचीच स्वप्नं पाहणा-या काँग्रेसजनांना ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे काँग्रेस जिवंत राहिली खरी; पण भरसमुद्रात वाट चुकलेल्या जहाजासारखी भरकटत राहिली. म्हणूनच आपल्याला नक्की काय साधायचं आहे, याच्या लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या योजना भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदी यांना आताच आखून त्या मार्गाने चालणे सुरू करावे लागेल. केवळ प्रभू रामाच्या रोज आरत्या ओवाळण्याने काहीच साध्य होणार नाही.

प्रभू राम, श्रीकृष्ण आणि भगवान बुद्ध ही केवळ धार्मिक प्रतीके नसून, या विभूती भारतीय प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीची रूपे आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राम मंदिरासारखे प्रकल्प उत्तम संधी आहेत. प्रभू राम व कृष्ण द्वापार आणि त्रेता युगातील आहेत, असे मानले तरी त्यानंतर मानवजातीत आणि जगात अनेक लक्षणीय स्थित्यंतरे झाली. यांतील काही मानवी प्रयत्नांनी, तर काही परिस्थितीवशात घडत गेली. महायुद्धे, औद्योगिक क्रांती, विविध राज्यक्रांती आणि लढाया यांचेही अपरिहार्य परिणाम जगावर झालेच.त्यांचे आलेख, पडसाद आणि परिणाम यांचे दर्शन या प्रस्तावित राम मंदिरात घडवून देता येईल. तसे जर घडले, तरच तिथे प्रभू रामचंद्रांचा वास आहे, असे मानता येईल. नाही तर गावागावांत एखादे ‘प्राचीन’ देवस्थान असतेच, त्यात आणखी एकाची भर पडेल आणि सकाळ-संध्याकाळी आणखी आरत्या ओवाळल्या जातील, इतकेच. त्यात प्रभू राम कुठे असेल?

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या