शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
4
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
5
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
6
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
7
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
8
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
9
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
10
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
11
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
12
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
13
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
14
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
15
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
16
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
17
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
18
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
19
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
20
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर

पालकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:12 AM

आज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारआज समाजात मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाबाळांचे लाड करताना पालक वर्ग दिसतो. मला आयुष्यात ज्या काही सुख सुविधा मिळाल्या नाही त्या सर्व त्यांना मिळवून देण्याचा अथक प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुख सुविधा देणे हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे मात्र कधीकधी तर पालक वर्ग अति प्रेमामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना सहजतेने उपलब्ध करून देतात. काही पालक तर म्हणतात, आमच्या मुलांच्या नशिबात आहे तर कां बर त्यांनी खर्च करू नये? असाच विचार करणारे माझ्या माहितीतील गृहस्थ होते. त्यांचा मुलगा लहानपणापासून लाडात वाढलेला होता. मुलाची शैक्षणिक कुवत नसताना वडिलांनी भरपूर देणगी देऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. मुलाच्या तोंडून एखादी गोष्ट निघायला वेळ, ती तात्काळ उपलब्ध होत होती. सहज गोष्टी मिळत गेल्या की त्याची किंमत नसते त्याचप्रमाणे मुलाला पैशांची किंमत काही कळेना! मुलाच्या अनावश्यक मागण्या खूप वाढत गेल्या व वडील आनंदाने पूर्ण करू लागले. मुलाचे मन अभ्यासापेक्षा बाकी गोष्टीमध्ये रमू लागले व शेवटी त्याने शिक्षण पूर्ण न करताच सोडून दिले. वडिलांना वाटायचे मी पाच पिढ्याचे कमावले आहे तेव्हा काय फरक पडणार! काही दिवसातच वडिलांचे निधन झाले. पाच पिढ्याची कमावलेली संपत्ती १०-१५ वर्षाच्या काळात मुलांनी मोठेपणाचे प्रदर्शन करण्यात व वाईट व्यसनापायी विकून टाकली. आई मुलाचे कसे होईल या काळजीपोटी खचून गेली व तिचेही निधन झाले. आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली की सगळ्या नातेवाईकांनी पैसे गोळा करून तिचे अंत्यसंस्कार केले. म्हणूनच चाणक्य म्हणतातलालयेत पंच वर्षाणि दश ताडयेत।प्राप्ते तू षोडशे वर्ष पुत्र मित्रवदाचरेत ।।मुलगा अजाण असताना म्हणजे पाच वर्षाचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत परंतु त्यानंतरचे दहा वर्षे त्याला चांगले वळण लागण्यासाठी वेळ पडल्यास दंडित करावे व १६ वे वर्ष लागले म्हणजे वयाचा मान ठेवून त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे. त्यामुळेच मुलांना पैशांची किमत, चांगले संस्कार, भविष्याची जाण निर्माण होते अन्यथा अतिलाडामुळे बरेचदा आपलेच पालकत्व आपल्या पिढीचा नाश करण्यासाठी कारणीभूत होते.

टॅग्स :Familyपरिवारnewsबातम्या