- अॅड. जयवंत महाराज बोधलेअज्ञान घालविण्यासाठी ज्ञानाची गरज व ज्ञानप्राप्तीसाठी श्री गुरुकृपेची गरज असतो. ज्ञानामध्ये वृत्ती-ज्ञान व स्वरूप-ज्ञान असे दोन मुख्य प्रकार शास्त्रक ारांनी सांगितले आहेत़ ज्या ज्ञानामध्ये बदल होतो ते वृत्ती ज्ञान होय व जे ज्ञान अखंड असते ते स्वरूप ज्ञान होय़ मनुष्य जीवनाची कृतार्थता ही आत्मस्वरुपाविषयीच्या ज्ञानात आहे परंतु ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता श्री गुरुकृपा पाहिजे म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात़गुरू तेथ ज्ञान ! ज्ञानी आत्मदर्शनदर्शनी समाधान ! आयी जैसे!!ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत म्हणून सांगितली आहे परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचे वैशिष्ट्यच असे, की त्यांनी दिलेला दृष्टांतसुद्धा सिद्धांत असतो़ वरील ओवी म्हणजे देखील एक महत्त्वाचा सिद्धांतच आहे़. साकार वस्तूच्या ज्ञानात बदल होऊ शकतो़ एखादी आकारमान वस्तू कोणाला लहान वाटते तर तीच वस्तू कोणाला मोठी वाटते, परंतु निराकार परमात्म्याचे ज्ञान हे सर्वांना सारखेच होते म्हणून ज्यामध्ये क मी अधिक असा द्वंद्वात्मक बदल नाही ते स्वरूप ज्ञान होय़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात स्पष्ट सांगतात की, सर्वाघरी राम देहादेही एक! देह अनेक असतील परंतु त्यातील आत्मतत्त्व हे एकच आहे़ संत ज्ञानेश्वर महाराजांना रेड्यामध्ये देव दिसला ही कथा प्रसिद्ध आहे़ संत तुकाराम महाराजांनी पक्ष्यांमध्ये देव पाहिला, संत एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, संत माणकोजी महाराज बोधले यांनी सापामध्ये देव पाहिला. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे ही जाणीव होण्याकरिता स्वरुप ज्ञानाची आवश्यकता आहे़मायकल एंजेलो जगप्रसिद्ध चित्रकार. त्यांच्याकडे एक मनुष्य गेला आणि ‘माझे’ चित्र काढा असे म्हणाला़ मायकल एंजेलोने थोडा विचार केला की हा मनुष्य ‘माझे’ चित्र काढा असे म्हणतोय़ मायकल एंजेलो आत गेला आणि थोड्या वेळाने एक गुंडाळी केलेला कागद आणला व त्याच्या हातात देऊन सांगितले हे घ्या तुमचे चित्र. त्या गृहस्थाने तो कागद उघडला आणि पाहिले तर तो कागद पूर्णपणे कोरा होता़ त्यांनी विचारलं हे काय हा कागद तर पूर्णपणे कोरा आहे़ मायकलने सांगितले, होय. हेच तुझे खरे चित्र आहे इतर चित्रकार तुझ्या शरीराची चित्रे काढतील परंतु तुला तुझे चित्र पाहिजे तर हेच ते होय़ आपले खरे चित्र म्हणजेच आपले स्वरूप होय व ते कोणताही आकार, रंग, अवयव नसलेले आहे़ तेच स्वरूप ज्ञान होय़ याकरिता श्रीगुरुंनाच शरण गेले पाहिजे़
गुरु तेथ ज्ञान
By admin | Published: October 07, 2015 5:15 AM