शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

वाढत्या अपेक्षांमुळे आनंदाला ठेच!

By किरण अग्रवाल | Published: February 24, 2022 12:08 PM

Happiness stumbles over rising expectations : करोडपतींची संख्या वाढली असली तरी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वतःला आनंदी मानणाऱ्या लोकांची संख्या मात्र घटली आहे.

- किरण अग्रवाल

 आनंद अगर समाधान हे मानण्यावर असते असे लाख म्हटले जात असले तरी तसे ते अभावानेच मानले जाते. आहे त्यापेक्षा किंवा गरजेपेक्षा अधिक मिळवण्याच्या नादात मनुष्य आनंदाला पारखा होतो. अपेक्षाच कमी ठेवल्या तर समस्या निर्माण होत नाहीत. अर्थात, व्यक्तिपरत्वे समस्या व आनंदाचे गणित बदलणारे असते. सधन, संपन्न कुटुंबातील व्यक्तींपेक्षा निर्धन वा गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद हा अधिक चटकन नजरेत भरतो, कारण त्याचा आनंद हा खूपच लहान सहान बाबीत सामावलेला असतो. अमर्याद अपेक्षांच्या जंजाळात स्वतःला अडकवून ठेवणाऱ्यास समाधान लाभणे अशक्यच असते. म्हटले तर अतिशय साधे सोपे हे तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म आहे, पण भल्याभल्यांना ते उमगत नाही, परिणामी दुःखी - कष्टी जीवांची संख्या वाढू लागली आहे.

 

देशातील गरीब व श्रीमंतांची दरी वाढत चालली आहे. देशात करोडपतींची संख्या वाढली, मात्र आनंद कमी झाल्याची बाब हुरून या प्रख्यात संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचा उद्योग बुडाला, अनेक जण देशोधडीला लागले; त्यांची नोकरी गेल्याने व हाताची मजुरीही गेल्याने खायचे वांधे झाले, परंतु दुसरीकडे ७ कोटींहून अधिक संपत्ती झालेल्यांची संख्या ११ टक्क्यांनी वाढून ४.५८ लाखांवर गेल्याचे हा अहवाल सांगतो. अर्थात मर्यादित लोकांचेच भले झाले, बहुसंख्याकांचे काय, असा प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे. करोडपतींची संख्या वाढली असली तरी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वतःला आनंदी मानणाऱ्या लोकांची संख्या मात्र घटली आहे. सन २०२१ मध्ये ती ६६ टक्क्यांवर आली असून, यापूर्वीच्या वर्षात ७२ टक्के होती, असेही हा अहवाल सांगतो. म्हणजे आनंदी लोक सहा टक्क्यांनी घटले आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. कोरोनाचा फटका आर्थिक व मानसिकदृष्ट्याही इतका बसला आहे की या स्थितीत सामान्य माणूस आनंदी राहूच शकत नाही.

 

कोरोनातून सावरून अर्थव्यवस्था आता पुन्हा उभारी घेत आहे. उद्योगधंदे पूर्ववत सुरू झाले असून, रोजगारही वाढू लागला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (ईपीएफओ) गेल्या डिसेंबर २०२१ मध्ये १४.६० लाख नवे सदस्य मिळालेत. डिसेंबर २०२० च्या तुलनेत ही संख्या १६.४० टक्क्यांनी अधिक असल्याचे पाहता रोजगार वाढत असल्याचे स्पष्ट व्हावे. असे असले तरी मनुष्याच्या चेहऱ्यावरील आनंद वाढत नाहीये. एक वर्ग असा आहे जो वर्ष दोन वर्षात आपल्या गाड्या बदलतो, तर दुसरा वर्ग असा आहे ज्याला दोन वेळच्या पोट भरण्याची भ्रांत असते. आर्थिक पातळीवरील वाढती असमानता ऑक्सफॅमच्या अहवालातही स्पष्ट झाली आहे. ही असमानता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे हा खरा चिंतेचा विषय ठरावा, पण याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या राजकारण्यांना परस्परांची उणीदुणी काढण्यात अधिक रस असल्याचे दिसून येते. साऱ्या समस्या सोडवून झाल्याच्या आविर्भावात ते फक्त परस्परांवरील चिखलफेकीचे राजकारण करण्यात मश्गूल दिसतात हे दुर्दैवी आहे.

 

कोरोनामुळे अनेकांची घडी विस्कटली हे खरेच. त्यातून आलेल्या भीतीमुळे अनेकांचा आनंद हिरावला गेला, परंतु ज्या प्रमाणात जीवितहानीही झाली ते पाहता, यातून तावून सुलाखून सुखरूप बाहेर पडलेल्यांनी त्याबद्दलच्या समाधानाचा सुस्कारा टाकायला हरकत नसावी. सारे काही पूर्ववत व्हायला कदाचित काही वेळ लागेलही, परंतु आज जे आहे त्यात समाधान मानले तर जगणे आनंदी होऊ शकेल. ‘घायल तो यहां हर एक परिंदा है, मगर जो उड सका वही जिंदा है..।’ हे जे कुणी म्हणून ठेवले आहे ते यासंदर्भात अगदी तंतोतंत खरे ठरते. समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्याखेरीज समाधान शक्य नाही. ते मिळवायचे तर अपेक्षाच मर्यादित ठेवायला हव्या. ओसरी पाहून पाय पसरणे, ज्याला म्हणतात ते व्हायला हवे. तेच होत नाही. झटपट यशाच्या मागे धावताना मनुष्य नको इतक्या अपेक्षा वाढवून बसतो. त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी धावाधाव करताना जे आहे त्यातील आनंद तो गमावून बसतो. अपेक्षा किंवा स्वप्ने मोठी पाहायलाच हवीत, परंतु त्यांना व्यवहार्यता वा वास्तविकतेची जोडही हवी. पण तसे होत नाही. अध्यात्मिक गुरू नेहमी सांगतात, ‘मनुष्य आपल्या समस्यांमुळे इतका दुःखी नाही, जितका तो शेजारच्याच्या सुखामुळे दुःखी असतो.’ तेव्हा दुःखीकष्टी राहण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून आनंदी राहायला काय हरकत आहे?