- बा.भो.शास्त्री‘‘समर्थो धर्ममाचरेत्’’श्रीचक्रधर कधी कधी पूर्वसुरींच्या सुविचारांचा उच्चार करून उपदेश करीत असत. त्यात काही संस्कृत वाक्य किंवा श्लोकाचे एखादे चरणही येत असे. इतरांच्या विचारांचा व आचारांचा ते नेहमीच सन्मान करीत असत. एकदा म्हाइंभटाने स्वामींना विचारले, ‘‘कोयं धर्म समाचरति’’ धर्माचे आचरण कोण करतो?याचे उत्तर महाभारताच्या आदिपर्वात भीष्माने उच्चारलेल्या ‘‘कर्मणा येनकैनैव मृदुना दारूणनेच उद्धरेत् दिनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत्’’ या श्लोकाच्या शेवटच्या चरणातून दिले़ त्यावर परावाणीचे संस्कार झाले आहेत. म्हणून त्याला सूत्र म्हटले.धर्म म्हणजे गट नाही. विशिष्ट समूह नाही. त्याला रंग नाही, रूप नाही. धर्म एक चांगली धारणा आहे. ‘धृ’ या संस्कृत धातूपासून तो शब्द तयार झाला. व्यापक व आत्मक धारणा म्हणजे धर्म. सर्वार्थाने पोषक असा आचार, विचार, उच्चार, आहार, विहार स्वत:ला व समाजाला जे विकसित करते, पुष्ट करते, त्यालाच धर्म म्हणतात. ‘‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’’ साने गुरुजींनी प्रार्थनेतून खरा धर्म सांगितला आहे. याउलट धारणारहित शोषण करणाऱ्या ज्या ज्या चित्तवृत्ती आहेत तो अधर्म आहे. कबिराने ‘दया धरम का मूल है’ या वाक्यात धर्माचा आत्माच सांगितला आहे. परमेश्वर अप्रमेय आहे. अनादि अनंत आहे. धर्म त्याचे साध्य साधन सांगतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘‘तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलीया क्षमा करिजोजी यया अपराधासी.’’धर्म मंदिरात मावत नाही. त्याला देश, प्रांत, जात नसते. तो वैश्विक असतो. पण धर्माचे नियम सहज पाळता येतात का? नाही. परतत्त्वासाठी स्वत्त्व सोडावे लागते. स्वार्थ सोडून परमार्थ करावा लागतो. संयमाचा लगाम व आचाराचा गुलाम व्हावे लागते. प्रतिज्ञा करणे सोपे, पाळणे अवघड आहे. विचाराचे शस्त्र घेऊन विकारासोबत लढावे लागते, परोपकासाठी झिजावे लागते. ‘रघुकुलरिती सदा चली आईप्राण जाई पर बचन न जाई’’हाच धर्म आहे. पण हे सामान्यांना पेलण्यासारखे नाही. कारण त्यांच्याजवळ अंतरिक बळ नसते. सामर्थ्य नसते. तो समर्थ कसा असेल? सामर्थ्याचं भांडवल नाही. तोच धर्माचा आचार करू शकतो. सकल प्राणीमात्रांना नि:श्रेय सिद्धी ज्यामुळे मिळते त्याला धर्म म्हणतात. तो येरागबाळाचा नाही हेच खरे.ज्ञान‘जे जैसे असे ते तैसेजाणिजे ते ज्ञानही स्वामींनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. विषयाचं काहीच कळत नाही. ते अज्ञान चुकीचं कळतं ते मिथ्याज्ञान व यथार्थ कळतं ते ज्ञान. ते भौतिक व अध्यात्मिक दोन प्रकारचं असतं. ते वस्तुला प्रकाशित करतं. म्हणून त्याला ज्ञानाचा दिवा म्हणतात. शब्दब्रम्ह त्याचा विस्तार करू शकत नाही इतकं ते अथांग आहे. ते पापाला जाळतं, मूलद्रव्याचा परिचय करवून देतं. गीता म्हणते,‘‘नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्येते’’जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच काही. म्हणून तर जगाने ज्ञानाची पूजा बांधली. मिथ्या ज्ञानामुळे किती अडचणी येतात. हे आपण नेहमिच अनुभवत आहोत आपले अंदाज चुकतात. व्यवहारात आणि परमार्थात सतत फसगत होते. मित्र सोयरे, वैद्य, सुशिक्षित, धनिक असतात वेगळे दिसतात. कधी चांगल्या बदलही गैर समज होतो. कारण आपण विवेकाने मुळाशी जात नाही. झाडाच्या फांदिवर घर करणाºया कावळ्याला मुंगी सांगते, तू घर करू नको. झाड पडणार, कारण मूळं सडले आहेत. तुला दिसत नाही मी पाहिले कारण माझा संचार मूळापर्यंत आहे. असच अज्ञान अंधारात, मिथ्याज्ञान फांदिवर व ज्ञानाची नजर मूळापर्यंत जाते.
आनंद तरंग - धर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 6:05 AM