शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

संपादकीय - आरोग्याची म्हैस विमा कंपन्यांच्या दावणीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 5:14 AM

दरवर्षी राज्य सरकार विमा कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी प्रीमियम म्हणून देते. या प्रचंड पैशातून स्वत:ची यंत्रणा सुधारावी, असे कुणाला का वाटत नाही?

ठळक मुद्देदरवर्षी राज्य सरकार  विमा कंपन्यांना जवळपास २ हजार कोटी प्रीमियम म्हणून देते. विमा कंपन्यांच्या मार्फत उपचार देणे यात गैर काहीच नाही. मात्र प्रीमियम भरला की, आपली जबाबदारी संपली असे म्हणणे व वागणे जास्त धोकादायक आहे

अतुल कुलकर्णी

घर चालवणे असो किंवा व्यापार करणे, कर्ज घेणे, विमा काढणे या गोष्टी प्रत्येकाला कराव्या लागतात. मात्र सतत कर्जावरच दिवस काढण्यामुळे दिवाळखोरीशिवाय हाती काही उरत नाही. कर्ज घेणारा त्यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार सतत करत असतो. एक ना एक दिवस आपण कर्जमुक्त होऊ अशी स्वप्न बघणारा नेहमीच यशस्वी होतो. पण, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला याचा पत्ता नसावा असे दिसते. जुन्या जीवनदायी आरोग्य योजनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणल्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी या योजनेचे नूतनीकरण केले. २ जुलै २०१२ रोजी ८ जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नवीन योजना सुरू झाली. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ती राज्यभर राबवली गेली. तेव्हापासून आजपर्यंत या योजनेसाठी  राज्य सरकारने विमा कंपनीला ९६४२ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. राज्यातील १,००० हॉस्पिटल्सना या योजनेत एम्पॅनलमेंट करण्यात आले. त्यांनी दहा वर्षात ३८ लाख ४९ हजार रुग्णांवर उपचार केले. या योजनेत ९७२ प्रकारच्या आजारांवरील शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. १२१ प्रकारच्या आजारांवरील उपचारांची फेरतपासणीसुद्धा केली जाते. राज्यातील जनतेला विमा कंपन्यांच्या दावणीला बांधून, आपली जबाबदारी संपली असे म्हणत प्रत्येक सरकार मोकळे झाले आहे.

दरवर्षी राज्य सरकार  विमा कंपन्यांना जवळपास २ हजार कोटी प्रीमियम म्हणून देते. विमा कंपन्यांच्या मार्फत उपचार देणे यात गैर काहीच नाही. मात्र प्रीमियम भरला की, आपली जबाबदारी संपली असे म्हणणे व वागणे जास्त धोकादायक आहे. गेल्या दहा वर्षात सगळ्या सरकारांनी हेच केले. ज्यावेळी ही योजना सुरु झाली त्यावेळी विमा कंपनीचा हप्ता वर्षाला ६०० कोटी रुपये होता. आज तो २ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. विमा कंपन्यांचे हप्ते कधीच कमी होणार नाहीत. आणखी काही वर्षांनी हप्त्याची रक्कम ३ ते ४ हजार कोटींवर जाईल. आज एक हजार हॉस्पिटल्स या योजनेत जोडली गेली आहेत. राज्य सरकारने उद्या जर आणखी ५०० हॉस्पिटल्स या योजनेत जोडली, तर विम्याचा प्रीमियम उद्याच आणखी ५०० कोटींनी वाढेल. जी खाजगी हॉस्पिटल्स या योजनेत सहभागी झाली आहेत, ती स्वतःचा फायदा काढून घेतल्याशिवाय या योजनेत सहभागी होणारच नाहीत. विमा कंपन्या स्वतःचा नफा एक रुपयांनी कमी होऊ देत नाहीत. या दोघांनाही सरकारी पैशांवर गब्बर व्हायचे आहे. त्यात गोरगरीब जनतेच्या तोंडाला उपचाराच्या नावाखाली पाने पुसली जात आहेत. हे एक दुष्टचक्र आहे. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे सरकार, विमा कंपन्या आणि खासगी हॉस्पिटलभोवती गोल गोल फिरत आहे. एवढा मोठा प्रीमियम दरवर्षी देत असताना प्रत्येक सरकारने दरवर्षी स्वतःचे असे नियोजन करायला हवे होते. राज्याची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करताना दरवर्षी किमान २५ ते ४० आजारांसाठीचे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आमचे स्वतःच उभे करू, या जाणिवेतून काम व्हायला हवे होते. जेणेकरून हळूहळू ते आजार विमा कंपनीच्या यादीतून कमी झाले असते. परिणामी विम्याच्या प्रिमियमची रक्कमही कमी होत गेली असती. पण, गेल्या आठ वर्षांत दुर्दैवाने असे काहीच झाले नाही. 

विमा कंपन्यांच्या माध्यमातून जनतेचे आरोग्य सांभाळणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःचे मजबूत असे जाळे उभे करावे लागेल. ते करण्याची मानसिकता गेल्या पंधरा वर्षात एकाही सरकारने दाखवलेली नाही. ‘‘तुमच्या काळात जास्त प्रीमियम होता, आमच्या काळात कमी प्रीमियम आहे’’, याच मुद्द्यांवर प्रत्येक सरकार वाद घालत राहिले. मात्र आम्ही एवढे आजार विमा कंपनीच्या यादीतून कायमचे कमी केले असे छातीठोकपणे एकही नेता सांगू शकत नाही. जेजे, नायर, सायन, किंवा पुण्याचे ससून, नागपूरचे मेयो हॉस्पिटल यामध्ये केलेली गुंतवणूक लाखो रुग्णांना वर्षानुवर्ष उपचार देत आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारे रुग्णालय मजबूत करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करावी लागेल. त्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल. सरकारने दरवर्षी बजेटमधून जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर निधी या विभागाला द्यावा लागेल. तो देत असताना दरवर्षी तुम्ही किती आजार विमा कंपन्यांच्या यादीतून कायमचे कमी करणार आहात, याची लेखी हमी विभागाकडून घ्यावी लागेल. जे अधिकारी काम करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. उत्तरदायित्व निश्चित करावे लागेल. हे करण्यासाठी मोठी राजकीय इच्छाशक्ती लागेल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही प्रमाणात विमा कंपन्यांच्या प्रीमियमवर बंधने आणली. दिलेल्या प्रीमियमपैकी ८५ टक्के क्लेम पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी घातले. पंधरा टक्केपर्यंत नफा घेता येईल, अशी अटही त्यांनी टाकली. ही चांगली बाजू असली तरीही विमा कंपन्यांच्या तावडीतून आजार बाहेर काढण्याची जाणीवपूर्वक योजना आखावी लागेल.

जिल्हा रुग्णालयांचे प्रशासन डॉक्टरांच्या हातातून काढून अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावे लागेल. डॉक्टरांनी रुग्ण तपासण्याचे, उपचार देण्याचे काम करावे. प्रशासनाने बाकीचे काम करावे. असे बंधन घालून घेतले तरच डॉक्टर काम करतील आणि औषध खरेदी, यंत्रसामुग्री खरेदी, टक्केवारीच्या चक्रातून जिल्हा रुग्णालये मुक्त होतील. याचा अर्थ अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी फार ग्रेट आहेत, असेही नाही. मात्र, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्या चुकीला शासन करता येईल. दोन अधिकारी बदलले, तर फरक पडत नाही; पण एखादा डॉक्टर कमी झाला, तर त्याचा परिणाम रुग्णांवर होतो, याचा विचार आजपर्यंत कोणीही केलेला नाही.

( लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहायक संपादक, आहेत )

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल