दरवर्षी येणा:या पुरासाठी आसाम हे राज्य प्रसिद्ध आहे. या पुराने पिके वाहून जातात. घरे पाण्याखाली जातात आणि हजारो माणसे बेघर होतात. भरीस भर रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होते. रेल्वे रूळ वाहून गेल्याने रेल्वे प्रवास विस्कळीत होतो. पुलांचे अपरिमित नुकसान होते. एकूणच वाहतूक आणि संपर्क यंत्रणा विस्कळीत होते. त्यामुळे मदतकार्यातही अडथळे निर्माण होतात. लोकांर्पयत मदत पोचायला विलंब लागतो. पूर ओसरल्यावर अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास बराच कालावधी लागतो. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. कधीकधी तर एखाद्या जागेला एकाच मोसमात अनेकदा पूरस्थितीला सामोरे जावे लागते.
नदीकाठी राहणा:या लोकांनाच नदी कोपली म्हणजे काय होते हे समजू शकते. पुरात सगळी चीजवस्तू वाहून नेल्यावर आयुष्याची नव्याने सुरुवात कशी करायची हे नदीकाठचे लोकच जाणू शकतात, कारण पुरामुळे त्यांचे घर, स्वयंपाकाची भांडी, पुस्तके, पलंग, टेबल, खुच्र्या आणि कधीकधी आप्तस्वकीयसुद्धा वाहून जातात. मग आयुष्य नव्याने कसे उभे करायचे? त्यातही जीवनमान हे अगदी खालच्या पातळीवर असताना नव्याने उभारी देणो जवळजवळ अशक्यच असते. कारण त्यांची जीवने कशाच्या तरी आधारे कशीबशी तग धरून असतात. जीवनात कशीतरी स्थिरता येत असते, तोच पुन्हा नव्या पूरस्थितीला त्यांना सामोरे जावे लागते.
मी स्वत: पूरग्रस्त भागातील विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. पूरग्रस्त भागातून सतत दहा वर्षे फिरले आहे, त्यामुळे एक गोष्ट मी विश्वासाने सांगू शकते, की पुरामुळे लोकांचे
सगळे काही वाहून जाते पण लोकांच्या चेह:यावरील हास्य काही
पुराला वाहून नेता येत नाही. ही गोष्ट प्रत्यक्ष बघितली तरच विश्वसनीय वाटेल. मध्यमवर्गीय माणसं हे वेगवेगळ्या पातळीवर आर्थिक सुबत्ता भोगत असतात. सुखी जीवन जगण्याची त्यांना सवय होते. त्यामुळे त्यांच्यासाठी पूरस्थिती हा वेगळाच अनुभव असतो. माङो महाराष्ट्रातील लोकांना आवाहन आहे, की त्यांनी आसामात पर्यटक म्हणून न
येता पूरग्रस्त आसामी जनतेला मदतीचा हात देण्यासाठी यावे. येथे आल्यावर तुम्ही भरल्या हातांनी आणि भरल्या अंत:करणाने नक्कीच परत जाल.
आतार्पयत पुराचा फटका 16.26 लाख लोकांना व 27 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांना बसला आहे. 93 हजार हेक्टर क्षेत्रतील पिके वाहून गेली आहेत. सरकारने 162 मदत छावण्या उभारल्या आहेत आणि तेथे 2.3 लाख लोक आसरा घेत आहेत. माजुली हे ठिकाण जगातील सर्वात मोठे नदीवेष्टित बेट आहे. पुरामुळे या बेटाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. काही कुटुंबांनी नदीच्या किना:यावर अनेक दशकांपासून आसरा घेतला आहे. त्यांच्या जमिनी पुरामुळे वाहून गेल्या आहेत आणि सरकारने त्यांना नवीन जमिनीचे वाटप केलेले नाही. त्यांची स्थिती सध्या सर्वात वाईट आहे. मदत छावण्या पूरग्रस्तांनी भरलेल्या आहेत. त्यांना पुरेसे रेशनदेखील मिळत नाही. पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे दुर्भिक्ष आहे. जळण उपलब्ध नाही. मुलांच्या पोषणासाठी बेबी फूड आणि तयार खाद्यपदार्थाची नितांत आवश्यकता आहे. गवताळ जमीन तसेच जनावरेही पुरामुळे वाहून गेली आहेत. पूरस्थिती निवळल्यावर शेतक:यांना जमिनीची नांगरट करण्यासाठी अडचण जाणवणार आहे. माणसांना खायला जेथे अन्न उपलब्ध नाही तेथे जनावरांची काय अवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी.
पाण्यापासून येणा:या रोगराईंनी लोक त्रस्त आहेत, तशीच जनावरांनाही रोगाची बाधा झाली आहे. मदत छावण्यांमध्ये राहणा:या माणसांना आपण घरी केव्हा परत जाणार याची कल्पना नाही. कारण परत जाण्यासाठी त्यांना घरेच उरलेली नाहीत. अशा स्थितीत देण्यात येणारी मदत ही लोकांना तसेच जनावरांना उपजीविका करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा लोकांनी पूरग्रस्त आसामला सढळ हाताने मदत करायला हवी.
राज्य सरकारला संकटाच्या व्यवस्थापनासाठी रु. 386 कोटी एवढी रक्कम केंद्राकडून मिळाली आहे. पण त्याच्या बदल्यात पूरग्रस्त लोकांना मिळणा:या मदतीचा दर्जा सुमार आहे. संकटाचे व्यवस्थापन प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही. फक्त कागदी घोडे तेवढे नाचविले जातात. आसामची पुनर्बाधणी होण्यास वेळ लागणार आहे. पूरनियंत्रण करणो हे तर फार लांब राहिले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्याहून अधिक काळ जावा लागेल. लोकांना मदत व्हावी यासाठी सरकारी यंत्रणोने जोमाने कामाला लागायला हवे. लोकांच्या चेह:यावरचे हसू परत आणण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व भारतीयांनी आसामला मदतीचा हात द्यायला हवा. पुण्यातील ‘सरहद’ ही संस्था या पूरग्रस्तांसाठी बरेच काही करीत आहे. पण आसामच्या जनतेला तात्पुरती मदत लगेच हवी आहे. दीर्घ मुदतीची मदतसुद्धा हवी आहे.
आसाम हा आपल्या देशाचाच भाग आहे आणि तो संकटात आहे याची जाणीव सर्वानी ठेवणो आवश्यक आहे. आसाम सध्या पूर परिस्थितीने गांजला आहे. तेव्हा तेथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, लहान मुलांना बेबी फूड आणि रोगग्रस्तांना औषधे या गोष्टी तात्काळ हव्या आहेत. मुलांनी अभ्यासाची पुस्तके गमावली आहेत. स्त्रियांचे तर सर्वस्व गेले आहे. त्यांना स्वत:च्या जीवनाची नव्याने उभारणी करायची आहे. तेव्हा पैसा आणि वस्तुस्वरूपातील मदतीची आवश्यकता आहे.
डॉ. अलका सरमा
आसाममधील राजकीय कार्यकत्र्या